1 May 2025 6:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

उन्नाव बलात्कार प्रकरण संपलं..

Rape Case, Unnav Rape Case, BJP MLA

उन्नाव : काही दिवसांपूर्वीच उन्नाव बलात्कार पीडित तरुणीच्या कारचा अपघात झाला. मात्र, हा अपघात नसून घातपात आहे. कारण उन्नाव बलात्कार प्रकरणात भाजपचा आमदार कुलदीप सेंगर आरोपी आहे. त्याच्या बचावासाठी पद्धतशीरपणे पीडित तरुणीला आणि तिच्या परिवाराला संपवण्याचा कट रचण्यात आला होता.

जून २०१७ ला नोकरीसाठी तरुणी भाजप आमदार कुलदीप सेंगरच्या घरी गेली असता तिच्यावर बलात्कार करण्यात आला. याबाबत ती पोलिसांत तक्रार दाखल करायला गेली असता अजय कुमार बीश्त (योगी) सरकारच्या पोलिसांनी एफआयआर दाखल करायला नकार दिला. योगी सरकारचे पोलीस न्याय देत नसल्यामुळे पीडित परिवाराने कोर्टात धाव घेतली. न्यायासाठी कोर्टात धाव घेतली म्हणून कुलदीप सेंगरच्या भावाने आणि त्याच्या साथीदारांनी तिच्या वडिलांवर प्राणघातक हल्ला केला. मात्र, ज्यांनी हल्ला केला त्यांना अटक न करता पीडित तरुणीच्या वडिलांनाच पोलिसांनी अटक केली. पीडितेच्या तक्रारीकडे मात्र पोलिसांनी दुर्लक्ष केले.

न्याय मिळण्याऐवजी अन्याय होत असल्याने हताश झालेल्या पीडित तरुणीने ८ एप्रिलला २०१८ ला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांच्या घराबाहेर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. आत्मदहन करण्याच्या दुसऱ्याच दिवशी पीडितेच्या वडिलांचं पोलिसांच्या मारहाणीत निधन झालं. या प्रकरणातील सर्वांना संपवून केस बंद करण्याचा कट आधीच रचला गेला होता. त्यातला पहिला बळी गेला.

यानंतर सर्वच स्तरातून दबाव आल्यामुळे योगी सरकारच्या पोलिसांनी नाईलाजाने पीडितेच्या वडिलांना मारहाण केल्याचा आरोपाखाली १० एप्रिल २०१८ ला चार जणांना अटक केली. हे चारही आरोपी भाजप आमदार कुलदीप सेंगर याचे सहकारी होते. त्यानंतर १० एप्रिलच्या पीडित तरुणीच्या वडिलांच्या शव परीक्षण अहवालात त्यांच्या शरीरावर १४ जखमा असल्याचं सांगितलं.

उन्नाव बलात्कार प्रकरण यूपी पोलिसांच्या हाताबाहेर जात असल्यामुळे सीबीआयकडे सोपवण्यात आलं. यानंतर भाजप आमदार कुलदीप सेंगरवर बलात्काराचा आरोप करत अलाहाबाद उच्च न्यायालयाने अटक करण्याचे आदेश दिले. ११ जुलैला आमदार कुलदीप सेंगरचं नाव आरोपपत्रात दाखल करण्यात आलं. यानंतर दुसरं आरोपपत्र दाखल करण्यात आलं. या आरोपपत्रात कुलदीप सेंगर, त्याचा भाऊ आणि तीन पोलिसांसह अजून पाच जणांवर पीडितेच्या वडिलांची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला.

आरोपपत्र दाखल झाल्यानंतर महिनाभराने पीडितेच्या वडिलांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा साक्षीदार असलेला युनूसचा अचानक मृत्यू झाला. यावर पीडित मुलीच्या काकाने युनूसला विष घालून मारण्यात आलं, असा आरोप केला. त्याचं शवविच्छेदन देखील केलं गेलं नाही. साक्षीदारांना संपवण्याचा कटातील दुसरा बळी युनूसचा गेला. पीडितेच्या काकाने विष घालून मारल्याचा आरोप केला म्हणून त्यांना खोट्या केस मध्ये अडकवून जेल मध्ये टाकलं. चित्रपट वाटेल सर्वांना पण हे वास्तवात घडतंय, घडत होतं. या केसने उत्तर प्रदेशचा, योगी आणि भाजपचा खरा चेहरा बाहेर आला होता.

हे सर्व घडत असताना पीडित तरुणीला आणि तिच्या परिवाराला खटला मागे घेण्यासाठी कुलदीप सेंगरची माणसं धमक्या देत होती. याबाबतचं पत्र पीडित परिवाराने मुख्य न्यायाधीश आणि योगी सरकारला लिहिलं होतं. त्या पत्रांकडे दुर्लक्ष का करण्यात आला? पीडित तरुणी याबाबत सीबीआयला निवेदन देण्यासाठी २० जुलैला दिल्लीवरून गावी आली होती. त्यानंतर तिलाही अपघात घडवत मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या अपघातात तिच्या आईचा मृत्यू झाला. तर पीडित तरुणी आणि वकील गंभीर अवस्थेत आहेत.

ज्या ट्रकने कारला उडवलं त्या ट्रकचा नंबर काळ्या रंगाने का पुसला होता? अपघातावेळी तिचे सुरक्षारक्षक गौरहजर का होते? तसंच एवढं सगळं प्रकरण घडलं असताना मोदी कुठे आहेत?भाजप अध्यक्ष अमित शहा कुठे आहेत? उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी कुठे आहेत? निर्भया प्रकरणावेळी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना बांगड्या पाठवणाऱ्या स्मृती इराणी कुठे आहेत? निर्भया प्रकरणावेळी मनमोहन सिंग यांनी निर्भयाला उपचारासाठी जगातील सर्वांत चांगल्या सिंगापूरच्या माउंट एलिझाबेथ रुग्णालयात दाखल केलं होतं. मग, आता उन्नाव बलात्कार पीडित तरुणीच्या उपचारासाठी मोदी चांगल्या रुग्णालयात का पाठवत नाही आहेत?

उन्नाव पीडितेच्या अपघाताने मन सुन्न झालं आहे. जरी ती वाचली तरी कशासाठी आणि कोणासाठी जगेल? या हैवानांनी तिचं संपूर्ण कुटुंबच संपवून टाकलं. न्यायासाठी जर तिला एवढं सगळं गमवावं लागत असेल तर ती जगून करेल तरी काय? एकंदरीत हे प्रकरण संपल्यातंच जमा आहे. उत्तर प्रदेशमध्ये महिनाभरात ८०० च्या वरती बलात्काराच्या केसेस दाखल केल्या आहेत. दाखल न केलेल्या किती असतील? मोदी सरकारची वाह वाह करणारी मीडिया यावर रिपोर्टिंग करेल का? की, बोथट झालेल्या संवेदनांमुळे मुग गिळून गप्प बसतील.

उत्तर प्रदेश येथील बाराबंकी येथे पोलिसांनी आयोजिती केलेल्या बालिका जागरूकता कार्यक्रमात एका मुलीने पोलिसांना प्रश्न केला. यासर्व घटनेने हा प्रश्न अनेक तरुणींच्या मनात निर्माण झाला आहे. तो प्रश्न म्हणजे, ‘तक्रार केली म्हणून माझा अपघात झाला तर?’ या प्रश्नावर पोलिसांनी उत्तर दिलं नाही. मात्र, असा प्रश्नच मनात निर्माण होणार नाही यासाठी भारत काही करणार आहे का?

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#RapeCase(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या