अलोक वर्मांकडे राफेल, अर्थ आणि कोळसा खात्या सकट ७ महत्वाच्या फाईल्स होत्या?

नवी दिल्ली : सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलेल्या सीबीआय संचालकांकडे राफेल, अर्थ आणि कोळसा खात्या सकट ७ महत्वाच्या फाईल्स होत्या अशी माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे या सात महत्वाच्या फाईल्स अगदी शेवटच्या टप्यात असताना अलोक वर्मांकडून त्यांच्याकडील अधिकार काढून घेण्यात आले आहेत. त्यामुळे विरोधकांना या प्रकरणात वेगळाच संशय येत आहे.
सध्या देशातील राजकीय वातावरण सीबीआय विरुद्ध सीबीआय असं तापलं आहे. त्यानंतर केंद्र सरकारने ताबडतोब सीबीआय संचालक अलोक वर्मांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. अशाप्रकारे वर्मा यांच्याकडील अधिकार काढून घेताना त्यांच्या टेबलवर देशातील ७ महत्वाच्या प्रकरणांच्या फाईल्स होत्या असं समोर येत आहे.
त्या फाईल्सची माहिती पुढील प्रमाणे;
- या महत्वाच्या फाईल्सपैकी एक फाइल राफेल डील प्रकरणी आहे. याप्रकरणी माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, अरुण शौरी आणि ज्येष्ठ विधीज्ञ प्रशांत भुषण यांनी ४ ऑक्टोबर रोजी १३२ पानांचे तक्रार पत्र सीबीआयकडे दाखल केले आहे. यामध्ये फ्रान्सकडून घेण्यात येणाऱ्या राफेल विमानांच्या खरेदीतील अनियमिततेवर आक्षेप घेण्यात आला आहे. या तक्रारीची पडताळणी सध्या सीबीआयकडून करण्यात येत आहे. यावर निर्णयही घेण्यात आल्याचे सुत्रांकडून कळते.
- त्याचबरोबर दुसरे प्रकरण हे मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडियामधील लाच प्रकरणाचे आहे. यामध्ये निवृत्त हायकोर्टाचे न्यायाधीश आय. एम. कुद्दूसी यांचा समावेश आहे. याप्रकरणी न्या. कुद्दूसी यांच्यावर सीबीआयकडून आरोपपत्रही दाखल करण्यात आले असून त्यावर केवळ वर्मा यांची सही होणे बाकी आहे.
- तिसरे प्रकरण हे मेडिकल प्रवेशासंदर्भातील गैरव्यवहाराचे आहे. यामध्ये अलाहाबाद हायकोर्टाचे न्या. एस. एन. शुक्ला यांच्यावर मेडिकल प्रवेशासंदर्भात भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. न्या. शुक्ला यांना सध्या सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. या प्रकरणीही फाइल तयार असून त्यावर वर्मा यांची सही होणे बाकी आहे.
- अर्थ खात्यातील आखणी एका प्रकरणावर वर्मा सध्या काम करीत होते. भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी यासंदर्भात सीबीआयकडे तक्रार दाखल केली असून यामध्ये अर्थ आणि महसूल सचिव हसमुख अधिया यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे. त्याचबरोबर कोळसा खाण वाटप प्रकरणात पंतप्रधानांचे सचिव आयएएस अधिकारी भास्कर खुलबे यांची चौकशी सीबीआयकडून सुरु आहे.
- दिल्लीतील एका मध्यस्थ व्यक्तीवर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सीबीयाकडून छापेमारी करण्यात आली होती.
- राजकीय व्यक्तींच्यावतीने लाच घेणे आणि सार्वजनिक क्षेत्रातील वरिष्ठ पदाच्या बेकायदा नियुक्त्यांमध्ये त्याचा हात आहे. संबंधित व्यक्तीने यासंदर्भात लाच घेतली असून त्याच्याकडे ३ कोटी रुपयांची रोकड सापडली होती.
- त्याचबरोबर संदेसरा आणि स्टर्लिंग बायोटेकचे महत्वाचे प्रकरण सीबीआयकडे आहे. या प्रकरणाची चौकशी पूर्ण होत आली असून यामध्ये सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांचा सहभाग असल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी अस्थाना यांनी सुमारे ३ कोटींची लाच घेतल्याचा आरोप आहे. सीबीआयने आपल्याच क्रमांक दोनच्या या अधिकाऱ्याविरोधात गुन्हाही दाखल केला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर रेल्वे स्टॉक मालामाल करणार, शॉर्ट टर्म अपसाईड टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC