नवी दिल्ली : मोदीसरकारने आज केलेल्या उपोषणावर सामना मुखपत्रातून चौफेर टीका होत असताना शिवसेनेचे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते हे भाजपच्या खासदारांसोबत उपोषणात सामील झाले असल्याचे दिसले.
परंतु भाजपवर आणि त्यांच्या उपोषणावर सामनातून टीका होत असताना दुसरीकडे शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते भाजपच्या खासदारांसोबत उपोषणात सामील झाले होते, त्यामुळे शिवसेनेची नक्की भूमिका स्पष्ट होत नव्हती.
अखेर हे सर्व पक्ष श्रेष्ठींच्या लक्षात येताच लगेच सूत्र फिरली आणि शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी उपोषणातून काढता पाय घेतला.
