1 May 2025 7:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

भारत-चीन तणाव | भारताचे लष्करप्रमुख लडाखमध्ये दाखल

Indian Army Chief, Ladakh, India China, Marathi News ABP Maza

लडाख, ३ सप्टेंबर : भारत-चीन तणावाच्यावेळी भारतीय फौजांनी आक्रमक धोरण अवलंबले आहे. चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी व्युहरचना करण्यात येत आहे. पँगाँग त्सो तलाव भागाच्या दक्षिणेकडील अतीमहत्त्वाच्या पोस्टवर भारताने बंदोबस्तात मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. पँगाँग त्सो तलाव परिसरातली जैसे थे स्थिती बदलण्याचा पीएलएचा डाव हाणून पाडल्यावर आता भारताने इथे तैनात वाढवली आहे.

भारत आणि चीन यांच्यातला तणाव निवळण्यासाठी बुधवारीही तब्बल सात तास लष्करी चर्चा झाली. मात्र या चर्चेतूनही कोणताही तोडगा निघाला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार भारताने परिसरातल्या अनेक महत्त्वाच्या शिखरांना ताब्यात घेऊन त्यावर फौजा तैनात केल्या आहेत. त्यामुळे चीन पुन्हा बिथरला आहे.

पूर्वेकडील लडाखमधील पँगाँग तलावाच्या दक्षिण भागात चीनच्या पीएलएच्या स्थितीत बदल करण्याचा प्रयत्न केल्याच्या दोन दिवसानंतर भारतीय लष्कराने मोठ्याप्रमाणात बंदोबस्तात वाढ केली आहे. आता प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थिती फारच ताणलेली आहे. दोन्ही देशांत लष्करी चर्चा सुरू असतानाही चीन पुन्हा “चिथावणीखोर” कारवाईत करण्यात गुंतला आहे आणि पीएलएच्या द्विपक्षीय बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याचे भारताने म्हटले आहे.

दरम्यान, या भागातील नाजूक स्थिती लक्षात घेता, परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे आज सकाळी लडाखमध्ये दाखल झाले. पँगाँग सरोवरच्या दक्षिण किनाऱ्यावर सर्वाधिक तणाव आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने २९-३० ऑगस्टच्या रात्री अचानक या भागात घुसखोरी करुन एकतर्फी नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न केला. पण सतर्क असलेल्या भारतीय सैन्याने त्यांचा डाव उधळून लावला.

तणाव निवळण्यासाठी बैठकांचं सत्र सुरू असताना चिनी सैन्याचे घुसखोरीचे प्रयत्न सुरूच आहेत. त्यामुळे भारतीय जवानांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. भारतीय जवानांनी पँगाँग परिसरातील नॉर्थ फिंगर फोरवर पुन्हा कब्जा केला आहे. जूननंतर पहिल्यांदाच हा संपूर्ण परिसर पूर्णपणे भारतीय सैन्याच्या नियंत्रणाखाली आला आहे. नॉर्थ फिंगर फोर पोस्टपासून ईस्ट फिंगर फोर पोस्ट काही मीटर अंतरावर आहे. या ठिकाणी चिनी सैन्यानं ठाण मांडलं आहे.

 

News English Summary: Army chief General M M Naravane is on a two-day visit to Ladakh to review the latest operational situation amidst the heightened military tensions with China after Indian soldiers occupied heights on the southern bank of Pangong Tso-Chushul sector over the weekend.

News English Title: Indian Army Chief General Arrives In Ladakh To Take Stock Of India China Escalation Marathi News LIVE Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#IndianArmy(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या