4 May 2025 8:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

कोरोनाची बाधा होणे हा देवाचा आशीर्वाद | डोनाल्ड ट्रम्प यांचा व्हिडिओ संदेश

Catching Covid 19, Blessing from god, US President Donald Trump

वॉशिंग्टन, ८ ऑक्टोबर : कोरोनाची बाधा झालेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हिडिओ संदेश जारी करत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. करोनाची बाधा होणे हा देवाचा आशीर्वाद असल्याचे त्यांनी म्हटले. करोनाची बाधा झाल्यामुळे त्याच्याशी सामना करता येणाऱ्या औषधांची माहिती झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सोमवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. करोनाच्या आजारावर व्हाइट हाउसमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. व्हाइट हाउसमध्ये आल्यानंतर ट्रम्प यांनी पहिल्यांदा व्हिडिओ संदेश जारी केला. यामध्ये त्यांनी रुग्णालयात करण्यात आलेल्या उपचाराचे कौतुक केले. सर्व अमेरिकन नागरिकांनाही करोनावरील औषधे मोफत देण्यात येणार असल्याचे सांगितले. चीनच्या वुहानमधून कोरोना पसरला हे चीन मान्य करण्यासाठी तयार नाही आणि चीनमधून पसरलेल्या कोरोनामुळे जगभरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं सर्वच देश चीनवर नाराज आहेत.

अमेरिकेत सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. याच दरम्यान ट्रम्प यांना त्यांच्या खासगी सल्लागाराकडून कोरोनाचा संसर्ग झाला आणि त्यांच्या प्रचारसभा रद्द झाल्या. सध्या ट्रम्प यांच्यासह त्यांच्या पत्नीवर व्हाइट हाऊसमध्ये उपचार सुरू आहेत. 3 नोव्हेंबर रोजी अमेरिकेत राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे.

 

News English Summary: U.S. President Donald Trump declared that catching the coronavirus was a “blessing from God” that exposed him to experimental treatments he vowed would become free for all Americans, in a video address released on Wednesday. Trump, eager to revitalize his ailing re-election campaign two days after his release from Walter Reed military hospital, repeatedly stressed how well he felt so far in his recovery from Covid-19, the disease caused by the coronavirus. It was unclear if he was still testing positive for the virus.

News English Title: Catching Covid 19 was blessing from god said US President Donald Trump Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Donald Trump(89)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या