महत्वाच्या बातम्या
-
राजकीय भूकंप! | राफेल घोटाळ्यावरून फ्रान्सच्या आजी-माजी पंतप्रधानांची चौकशी होणार | मोदी सरकारही अडचणीत?
भारत आणि फ्रान्समधील जागतिक पातळीवरील बहुचर्चित ठरलेल्या राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीवरून आता फ्रान्समध्ये खळबळ उडाली असून चौकशीसाठी एका न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे. फ्रान्सने राफेल घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आली असून पब्लिक प्रॉसिक्यूशन सर्विसेज की फाइनेंशियल क्राइम ब्रांचने हे आदेश दिले आहेत. यामुळे पुन्हा राफेलची फाईल उघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
ICC Cricket T20 World Cup 2021 | T-20 वर्ल्ड कपच्या तारखा जाहीर
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) मंगळवारी यंदाच्या टी-२० वर्ल्डकपचे ठिकाण आणि तारीख जाहीर केली आहे. यावेळी टी-२० वर्ल्डकप यूएई आणि ओमानमध्ये आयोजित केला जाईल. १७ ऑक्टोबरला वर्ल्डकपचा पहिला सामना खेळवला जाईल. तर अंतिम सामना १४ नोव्हेंबरला होणार आहे. करोनाच्या धोक्यामुळे ही स्पर्धा भारतातून बाहेर आयोजित केली जाणार आहे. आयसीसीच्या म्हणण्यानुसार ही स्पर्धा भारतात होणार नसली, तरी बीसीसीआय या स्पर्धेचे आयोजन करेल.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईत समुद्राचं पाणी गोड होणार | इस्त्रायलसोबत सामंजस्य करार | इस्त्रायलकडून मराठीत ट्विट
इस्रायली तंत्रज्ञानाद्वारे समुद्राच्या पाण्याला गोड करण्याच्या प्रकल्पाला आता वेग मिळाला आहे. मुंबई पालिका व आय.डी.ई. वॉटर टेक्नॉलॉजीज लि. दरम्यान मालाड, मनोरी येथील दोनशे दशलक्ष लिटर नि:क्षारीकरण प्रकल्पाचा अहवाल तयार करण्याचा सामंजस्य करार सोमवारी करण्यात आला. हा प्रकल्प एक क्रांतिकारी पाऊल असून अनेक वर्षांच्या स्वप्नाला मूर्त रूप येत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोदींच्या लोकप्रियतेत घट | देशाची लोकसंख्या १२५ कोटी | फक्त २१२६ भारतीयांनी ठरवलं मोदी जगात लोकप्रिय
कोरोना संकटाशी सामना करण्यात अपयशी ठरल्याची टीका होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेत (Approval Rating) घट झाल्याचं समोर आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं गुणांकन जवळपास २० टक्क्यांनी घसरलं आहे. मोदींच्या गुणांकनात घट झालेली असली तरी इतर जागतिक नेत्यांना त्यांनी मागे टाकलं आहे. अमेरिकास्थित डेटा इंटेलिजन्स कंपनी मॉर्निंग कन्सल्टने ( Morning Consult) केलेल्या सर्व्हेक्षणात ही आकडेवारी समोर आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
अमेरिका | कोरोना लसीनंतर आता कोविड-19 च्या टॅबलेट तयार करणार | संशोधनासाठी 3 अब्ज डॉलर्सचा निधी
अमेरिकन सरकारने कोरोनावर लस तयार करण्यासाठी लस उत्पादक कंपन्यांना 18 अब्ज डॉलर्स दिले होते. आता अमेरिकाजवळ 5 लसी असून त्यांना रेकॉर्ड टाईममध्ये तयार करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर बायडेन सरकार आता कोविड 19 च्या टॅबेलट बनवण्याची तयारी करत असून यासाठी 3 अब्ज डॉलर्सची मदत जाहीर केली आहे. या गोळ्या सुरुवातीलाच कोरोनाच्या विषाणूला नष्ट करणार आहे. यामुळे लाखो लोकांचे जीव वाचणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
ब्रिटनमध्ये मे महिन्यात डेल्टा वेरिएंटमुळे बाधितांच्या संख्येत ५० टक्क्यांनी वाढ | निर्बंधांमध्ये वाढ
कोरोनावर मात करण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न करणाऱ्या ब्रिटनच्या चिंतेत वाढ झाली आहे. ब्रिटनमध्ये करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे निर्बंधांमध्ये वाढ करण्यात आली आहे. ब्रिटनमध्ये मे महिन्यात करोनाच्या डेल्टा वेरिएंटमुळे बाधितांच्या संख्येत ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. लंडनच्या इम्पिरिअल कॉलेजने केलेल्या संशोधनात ही बाब समोर आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | ख्रिस्तियानो रोनाल्डोची ६ सेंकदांची कृती | आणि कोका-कोलाला २९ हजार कोटींचं नुकसान
पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोची पत्रकार परिषद होती. या पत्रकार परिषदेला संघाचे व्यवस्थापक फर्नांडो देखील उपस्थित होते. पत्रकार परिषदेत टेबलावर कोका कोलाची बाटली ठेवण्यात आली होती. हे पाहून रोनाल्डो भडकला. त्याने त्या बाटल्या टेबलावरून बाजूला केल्या. त्यानंतर त्याने बाजूला असलेली पाण्याची बाटली हातात घेत ओरडून ‘शीत पेये नाही, पाणी प्यायची सवय करा’ असे पत्रकारांना सांगितलं.
4 वर्षांपूर्वी -
इस्रायलमध्ये महाविकास आघाडी फॉर्मुला | नेतान्याहू पायउतार | 8 पक्षांच्या मदतीने नफ्ताली बेनेट नवे पंतप्रधान
इस्रायलमध्ये नवीन सरकार स्थापन झाले असून बेनेट नफ्ताली यांनी पंतप्रधान पदाची धुरा सांभाळली आहे. विशेष म्हणजे हे सरकार आठ पक्षाच्या युतीने तयार झाले आहे. यामध्ये सरकारकडे 60 खासदार तर विरोधी पक्षाकडे 59 खासदार आहे. त्यामुळे हे सरकार कितीकाळ टिकेल याबद्दल शंका उपस्थित केले जात आहे. कारण युतीमध्ये काही मतभेद झाले तर फटका बेनेट यांना बसणार आहे. बेनेट धर्मांध असून ते पॅलेस्टाईन राज्य विचारधारेला स्विकारत नाही. या सरकारचे वैशिष्टे म्हणजे या युतीमध्ये पहिल्यांदा अरब-मुस्लिम पक्षाचा (राम) समावेश आहे. तर दुसरीकडे माजी पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचा पंतप्रधान पदाचा 12 वर्षाचा कार्यकाळ संपलेला आहे.
4 वर्षांपूर्वी -
अँटिगा अपहरणामागे भारतीय एजन्सींचा हात, भारतात राजकीय शक्तींपासून जीवाला धोका - मेहुल चौकसीच्या वकिलाचा दावा
पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील फरार आरोपी आणि हिरे व्यापारी मेहुल चौकसी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मेहुल चौकसी याला अँटिगामधून डोमिनिकामध्ये आणण्यात आले असून तेथून त्याला भारतात आणण्याची तयारी सुरु आहे. विशेष म्हणजे मेहुल चौकसी यांने डोमिनिका उच्च न्यायालयात जामीन याचिका दाखल केली होती. परंतु, न्यायालयाने ती याचिका नाकारत पळून जाण्याचा धोका असल्याचे सांगितले होते.
4 वर्षांपूर्वी -
G7 परिषद | मोदींकडून 'वन अर्थ वन हेल्थ'चा मंत्र | विरोधक म्हणाले 'धिस इज अर्थ - धिस इज अनर्थ'
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ब्रिटनमध्ये होत असलेल्या G7 परिषदेमध्ये व्हर्चुअली सहभागी झाले. यूनायटेड किंगडमनं दिलेल्या निमंत्रणाचा स्वीकार करत पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी जी-7 शिखर संमेलनात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभाग नोंदवला. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी ‘वन अर्थ वन हेल्थ’ चा मंत्र दिला. जर्मनीच्या चांसलर एंजेला मर्केल यांनी देखील यावेळी पंतप्रधान मोदी यांचं कौतुक करत त्यांच्या या विचाराला पाठिंबा दिला.
4 वर्षांपूर्वी -
दोन डोसमधील अंतर वाढवल्याने संक्रमणाचा धोका जास्त | अमेरिकन तज्ज्ञ डॉ. एन्थनी फौची यांचा दावा
कोरोना व्हॅक्सिनच्या डोसमध्ये गॅप संदर्भात अमेरिकेचे महामारी एक्सपर्ट डॉ. एन्थनी फौची यांनी चेतावणी दिली आहे. त्यांच्यानुसार, व्हॅक्सिनच्या दोन डोसमधील काळ वाढवल्याने लोकांमध्ये इन्फेक्शनचा धोका वाढू शकतो. ब्रिटनमध्ये असे आढळून आले आहे. डॉ. फौची यांनी NDTV च्या एका मुलाखतीमध्ये हे सांगितले.
4 वर्षांपूर्वी -
ऑनलाईन जाहिरात क्षेत्रातील प्रबळ स्थानाचा गैरवापर | फ्रान्समध्ये Google'ला 1953 कोटींचा दंड
आयटी क्षेत्रातील गूगल कंपनीने जगभर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. जगातील सर्वात जास्त डाटा गूगल कंपनीकडे उपलब्ध आहे. त्यामुळे ह्या कंपनीचं जगभर एकतर्फी वर्चस्व निर्माण झालं आहे. सध्याच्या आधुनिक जगात गुगलशिवाय जगणं कठीण बनलं आहे. अशातच फ्रान्सने गुगलला तब्बल 1953 कोटींचा दंड ठोठावल्याची माहिती समोर आली आहे. फ्रान्सच्या मार्केट कॉम्पिटीशन रेग्युलेटरने गूगलवर ही कारवाई केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
वुहान लॅबमध्ये एक हजार प्राण्यांच्या जनुकात बदल | प्राण्यांना विषाणूचे इंजेक्शन, ब्रिटिश पत्रकाराचा दावा
कोरोना महामारीच्या उत्पत्तीवरुन चीन जगाच्या निशाण्यावर होते. यातच आता चीनच्या वुहान लॅबमध्ये एक हजार प्राण्यांच्या जनुकात बदल करण्यात आला असल्याचा दावा करण्यात येत आहे. चीनच्या वुहान शहरातील लॅबमध्ये जनुकीय अभियांत्रिकीच्या माध्यमातून माकड आणि सशासह जवळपास 1 हजारपेक्षा जास्त प्राण्यांच्या जनुकात बदल करण्यात आला.
4 वर्षांपूर्वी -
इस्त्रायल | ट्रम्प'नंतर मोदींचे परममित्र पंतप्रधान नेतन्याहू युगाचा अस्त | इस्त्रायलमध्ये महाविकास आघाडी फॉर्मुला
मोसादसोबतच्या संघर्षानंतर इस्त्रायलमध्ये मोठा उलटफेर झाला आहे. अध्यक्ष बदलल्यानंतर आता इस्त्रायलमध्ये नरेंद्र मोदींचे मित्र पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू युगाचा अस्त झाला आहे. विरोधी पक्षांनी एकजूट होत नवीन सरकार बनविण्याची घोषणा केली आहे. यामुळे नेतन्याहू यांना बऱ्याच वर्षांपासूनची सत्ता सोडावी लागणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
ब्राझीलमध्ये कोरोनास्थितीत अपयशी ठरलेल्या राष्ट्रपतींना हटवण्यासाठी जनता रस्त्यावर | भारतीयांनी तीच आयडिया केली तर?
ब्राझीलच्या सुमारे २०० शहरांत शनिवारी निदर्शने झाली. ‘बोल्सोनारो आऊट’, ‘गो अवे बोल्सोव्हायरस’ अशा घोषणांनी ही शहरे निनादली. अडीच वर्षांपूर्वी अध्यक्षपदी विराजमान झालेल्या जाइर बोल्सोनारो यांच्याबद्दल करोनास्थितीवरून जनतेचा भ्रमनिरास झाला. त्यांची लोकप्रियता उत्तरोत्तर घटत गेली आणि जनक्षोभ वाढत गेला. त्याचा वेध घेत माध्यमांनी बोल्सोनारो यांच्या अकार्यक्षमतेवर बोट ठेवले आहे.
4 वर्षांपूर्वी -
यूट्यूबवरुन कमाई करता? | अमेरिकन कायद्यामुळे भारतीय कंटेंट क्रिएटर्सवर 24% करांचा दणका लागणार?
यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करुन कमाई करणाऱ्यांसाठी वाईट बातमी आहे. गूगल यूट्यूब कमाईवर या महिन्यापासून 24% कर लावणार आहे. ही नवीन पॉलिसी अमेरिकेव्यतिरिक्त इतर देशातील कंटेंट क्रिएटर्सवर आजपासून लागू होईल. परंतु, जानकारांचे म्हणने आहे की, भारताचे व्हिडिओ अमेरिकेत जास्त पाहिले जात नसल्यामुळे भारतीय क्रिएटर्सवर नवीन नियमचा जास्त परिणाम होणार नाही. काय आहे यूट्यूबची नवीन टॅक्स पॉलिसी? कधी झाली याची घोषणा?
4 वर्षांपूर्वी -
कोरोनाचा उगम शोधा | अन्यथा कोविड-26 आणि कोविड-32 साठी तयारी करा - शास्त्रज्ञांचा इशारा
कोरोना व्हायरस कधी आला, कुठून आला आणि कसा आला, या प्रश्नांची उत्तरे शास्त्रज्ज्ञ घेत आहेत. आतापर्यंत दोन प्रकारच्या थेअरींवर सर्वाधिक बोलले जात आहे. पहिल्या थेअरीमध्ये कुठल्यातरी प्राण्यापासून कोरोना माणसांपर्यंत आल्याचे म्हटले जात आहे, तर दुसऱ्या थेअरीमध्ये चीनच्या एखाद्या लॅबमध्ये कोरोना तयार केल्याचे म्हटले जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बाइडेन यांनी एका रिपोर्टनंतर आपल्या संस्थांना 90 दिवसांत या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे आदेश दिले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
IPL 2021 | आयपीएलचं ठिकाण ठरलं, उर्वरीत सामने यूएईत होणार - BCCI
कोरोनामुळे स्थगित झालेल्या इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलबाबत (IPL 2021 UAE) भारतीय क्रिकेट नियामक मंडळ BCCI ने मोठा निर्णय घेतला आहे. आयपीएलचे उर्वरित सामने आता संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यूएईमध्ये होणार आहेत. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी याबाबतची माहिती दिली.
4 वर्षांपूर्वी -
भारतात कोरोनामुळे प्रत्यक्षात 42 लाख मृत्यू, तर 70 कोटींपेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण - न्यूयॉर्क टाइम्स रिपोर्ट
देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत सलग चार दिवस घट झाल्यानंतर किंचितशी वाढ झाली आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत तब्बल 12 हजारांनी वाढ झाली आहे. कालच्या दिवसात 2 लाख 8 हजार 921 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. मोठ्या कालावधीनंतर एका दिवसातील रुग्णसंख्या दोन लाखांच्या खाली गेली होती, परंतु पुन्हा एकदा हा आकडा वाढला आहे. कालच्या दिवसात 4 हजार 157 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
केंद्र सरकारच्या नव्या नियमावलीविरोधात WhatsApp उच्च न्यायालयात
केंद्र सरकारच्या नवीन डिजिटल नियमांविषयी जोरदार चर्चा सुरू आहे. या नियमांना विरोध देखील होत आहे. दरम्यान, या नियमांच्या विरोधात इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप कोर्टात गेले आहे. व्हॉट्सअॅपने वापरकर्त्यांच्या गोपनीयतेवर होणाऱ्या परिणामांचा हवाला दिला आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN