2 May 2025 4:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

इंग्लंडमध्ये कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीसाठी मानवी चाचणी सुरू - ऑक्सफर्ड विद्यापीठ

Covid 19, Corona Crisis, UK Scientist, Anti Corona Vaccine

लंडन, २३ एप्रिल: जगात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सुरूच आहे. आतापर्यंत जगात कोविड -१९ च्या रुग्णांची संख्या वाढून २६,३७,६८१ झाली आहे. कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत १,८४,२२० लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ७,१७,७५९ लोकं रूग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत. अमेरिका, स्पेन, इटली, फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटन हे जगातील सर्वाधिक प्रभावित देश आहेत. अमेरिका कोरोनामुळे संक्रमित आणि मृत्यू झालेल्या लोकांच्या संख्येच्या बाबतीत रोज नवीन संकटात सापडत आहे.

दरम्यान, प्रसिद्ध ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधकांची टीम Covid-19 विरोधात लस विकसित करण्याच्या प्रोजेक्टवर काम करत आहे. ऑक्सफर्डच्या लस प्रकल्पामध्ये आदर पूनावाल यांची सिरम इन्स्टिट्यूट भागीदार आहे. ऑक्सफर्डच्या या लस प्रकल्पामध्ये जगातील एकूण सात संस्था सहभागी आहेत. मात्र कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी बनवण्यात येणाऱ्या लसीमधून पैसा कमावण्याची ही वेळ नाही. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही लस पोहोचवणे, त्यांना ही लस उपलब्ध करुन देणे ही वेळेची गरज आहे” असे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना म्हणाले.

कोरोना प्रतिबंधक लस तयार करण्यासाठी जगात एकूण १५० ठिकाणी सध्या प्रयत्न सुरू आहेत. इंग्लंडमध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये गुरुवारीच या लसीचा पहिला डोस स्वयंसेवकांना दिला जाणार आहे. कोरोना विषाणूच्या जनुकीय घटकांचा अभ्यास करून ही लस तयार करण्यात आली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठांमध्ये एकूण ५१० स्वयंसेवकांवर ही चाचणी केली जाणार आहे. या सर्वांचे वय १८ ते ५५ या दरम्यान आहे. या लसीच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका निभावणारे प्राध्यापक सरा गिलबर्ट यांनी म्हटले आहे की, मानवी चाचणी यशस्वी होण्याची ८० टक्के शक्यता आहे.

जर ही चाचणी यशस्वी झाली आणि त्यानंतर लस निर्मितीसाठी आवश्यक मंजुऱ्या वेळेत मिळाल्या तर येत्या सप्टेंबरपर्यंत या लसीचे लाखो डोस निर्माण करण्याचे आमचे ध्येय आहे, असे विद्यापीठाच्या जेनर इन्स्टिट्यूटने म्हटले आहे.

 

News English Summary: A team of researchers from the renowned Oxford University is working on a project to develop a vaccine against Covid-19. Adar Poonawal’s Serum Institute is a partner in the Oxford vaccine project. A total of seven organizations from around the world are involved in this vaccination project in Oxford. But this is not the time to make money from vaccines designed to prevent the corona virus. It takes time to make the vaccine available to as many people as possible, ”said Adar Poonawala, Chief Executive Officer, Siram Institute of India.

News English Title: Story Covid 19 vaccine trial set to begin in UK scientist says 80 percent chance of success Corona Crisis News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या