30 April 2025 6:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस, 1 शेअरवर 4 फ्री शेअर्स देणार ही कंपनी, सुवर्ण संधी सोडू नका SBI Mutual Fund | श्रीमंत करणारी SBI फंडाची योजना, महिना 5,000 रुपये SIP वर मिळेल 2 कोटी 56 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | तुमच्या कुटुंबात सरकारी आहेत का? फिटमेंट फॅक्टर + DA मर्जर; पगारात किती वाढ होईल पहा Home Loan EMI | ईएमआय वर 77 लाखांचं घर घ्यावं की SIP करावी? तुमचा अधिक फायदा कुठे आहे समजून घ्या EPFO Pension Money | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांनो, अन्यथा तुम्हालाही महिना कमी पेन्शन घ्यावी लागेल, ही अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 30 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी अलर्ट; डाऊनसाइड टार्गेट प्राईस अलर्ट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा? - NSE: IRB
x

अमेरिकेतील आगामी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीपूर्वी भारतासोबत व्यापार करार अशक्य: ट्रम्प

Story Trade Agreement between India and America, Next US Presidential Election, US President Donald Trump

वॉशिंग्टन डीसी: डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षपदाची मुदत या वर्षाअखेर संपुष्टात येत आहे. त्यापार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष निवडणुकीपूर्वी हा करार होऊ शकणार नाही, असे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रशंसा केली आहे. ते माझे आवडते असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारत दौऱ्याबद्दल आपण खूप उत्सुक आहोत, असेही त्यांनी सांगितले. कुक्कुटपालन, डेअरी उत्पादनांना भारतीय बाजारपेठेत जास्तीत जास्त प्रवेश मिळावा तसेच अन्य उत्पादनांवरील टॅक्स कमी व्हावा यासंबंधी ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यात करार व्हावा यासाठी अमेरिकेकडून प्रयत्न सुरु आहेत. पण अजूनही यामध्ये यश मिळालेले नाही.

मात्र व्यापारी संबंधांच्या विषयात भारताने अमेरिकेला चांगली वागणूक दिलेली नाही असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. भारताकडून आम्हाला चांगली वागणूक मिळालेले नाही’ असे ट्रम्प अँड्रूयूज येथील विमानतळावर पत्रकारांशी बोलताना म्हणाले. ट्रम्प यांनी भारतावर टीका केली असली तरी, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले. भारत दौऱ्यावर जाण्यास उत्सुक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ‘मला पंतप्रधान नरेंद्र मोदी भरपूर आवडतात’ असे ट्रम्प म्हणाले.

तसेच परदेश दौऱ्यादरम्यान अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसाठी फिरण्यासाठी दी बिस्ट ही अभेद्य लिमोझिन वापरली जाते. त्यांना अन्य कोणत्याही कारचा वापर करण्याची परवानगी नाही. यामुळे सीआयए अन्य कोणत्याही वाहनातून ट्रम्प यांना ताज महाल पाहण्यासाठी नेणार नाही. तर सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार इंधनावर चालणारी कोणतीही कार किंवा वाहन ताज महालच्या 500 मीटरच्या परिसरात नेण्यास बंदी आहे.

 

Web Title: Story Trade Agreement between India and America is not possible till next US Presidential Election says US President Donald Trump.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Donald Trump(89)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या