1 May 2025 2:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्समध्ये दिसणार तुफानी तेजी, संधी सोडू नका, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL Trident Share Price | 26 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, महत्वाचे संकेत, यापूर्वी 5238% परतावा दिला - NSE: TRIDENT NTPC Share Price | 461 टक्के परतावा देणारा एनटीपीसी स्टॉक पुन्हा फोकसमध्ये, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NTPC HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO RVNL Share Price | पीएसयू शेअर पुन्हा सुसाट तेजीने परतावा देणार, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL IREDA Share Price | मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार, स्वस्तात खरेदी करा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IREDA GTL Infra Share Price | पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हलच्या जवळ; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: GTLINFRA
x

VIDEO | डिविलियर्सने मारलेला चेंडू थेट मैदानाबाहेरील चालत्या कारवर

AB De Villiers, hits massive six, Moving car, Sharjah

शारजाह, १३ ऑक्टोबर : IPL 2020 Points Table युएईमध्ये सुरू असलेल्या आयपीएलच्या १३वा हंगाम अर्धा झाला आहे. स्पर्धेतील पहिला टप्पा पूर्ण झाला असून प्रत्येक संघाचे ७ सामने झाले आहेत. स्पर्धेत दोन संघांची सर्वाधिक चर्चा होत आहे. पहिला संघ म्हणजे चेन्नई सुपर किंग्ज होय जो गुणतक्त्यात शेवटून दुसऱ्या स्थानावर आहे तर दुसरा संघ म्हणजे दिल्ली कॅपिटल्स जो दुसऱ्या स्थानावर आहे.

आयपीएलच्या 13 व्या हंगामातील 28 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने कोलकाता नाईट रायडर्सला 82 धावांनी पराभूत केले. आरसीबीच्या विजयाचा नायक ठरलेला आक्रमक फलंदाज एबी डिविलियर्सने या सामन्यात विस्फोटक फलंदाजी केली. त्याने 33 चेंडूत नाबाद 73 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने मैदानावर चौकार आणि षटकारांचा पाऊस पडला. या खेळीदरम्यान त्याने मैदानाबाहेर एक षटकार मारला आणि चेंडू रस्त्यावरून जाणाऱ्या कारवर जाऊन आदळला. डिविलियर्सने मारलेल्या या षटकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

16 व्या षटकांत मारला लांबलचक षटकार:
महत्त्वाचे म्हणजे डिविलियर्सने या सामन्यात आयपीएल कारकीर्दीतील 36 वे अर्धशतक पूर्ण केले. 16 व्या षटकांत केकेआरचा वेगवान गोलंदाज कमलेश नागरकोटी गोलंदाजी करत होता, षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर डिविलियर्सने लांबलचक षटकार ठोकला, चेंडू मैदानाबाहेर गेला आणि रस्त्यावरून जाणाऱ्या कारवर जाऊन आदळला. डिविलियर्सने मारलेल्या या षटकाराची लांबी 86 मीटर होती.

डिविलियर्सने खेळलेल्या या विस्फोटक खेळीच्या जोरावर प्रथम फलंदाजी करणाऱ्या बेंगलोर संघाला 194 धावांची मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले. प्रत्युत्तरादाखल कोलकाताला अवघ्या 112 धावा करता आल्या. डिविलियर्सने केलेल्या या खेळीमुळे त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. कोलकाताकडून युवा फलंदाज शुबमन गिलने सर्वाधिक 34 धावा केल्या. कोलकाताचा विस्फोटक फलंदाज आंद्रे रसलने काही मोठे फटके खेळले पण तोही जास्त काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. बंगलोरचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्याने चार षटकांत केवळ 12 धावा देऊन कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिकला बाद केले.

 

News English Summary: Royal Challengers Bangalore defeated Kolkata Knight Riders by 82 runs in the 28th match of the 13th season of the IPL. Offensive batsman AB de Villiers, the hero of RCB’s victory, batted explosively in the match. He hit an unbeaten 73 off 33 balls. He rained fours and sixes on the field during the game. During the game, he hit a six off the field and the ball hit a car on the road. The video of the six hit by de Villiers is going viral on social media.

News English Title: AB De Villiers hits massive six on moving car at Sharjah during RCB Vs KKR IPL 2020 sports updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#IPL2020(28)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या