
CIBIL Score | प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात कधीतरी पर्सनल लोन घेण्याची गरज भासतेच. जेव्हा लोन घेण्याचे सर्व मार्ग बंद होतात तेव्हा व्यक्ती पर्सनल लोन घेण्याचा विचार करतो. आता पर्सनल लोन कोण देणार तर तुम्ही बँकेकडून लोन घेऊ शकता. जर बँकेकडून लोन मिळालं नाही तर फिनटेक प्लॅटफॉर्मवरील कंपन्यांकडून लोन घेऊ शकता.
पर्सनल लोन घेत असाल तर…
परंतु तुम्ही एखाद्या फिनटेक कंपनीकडून लोन उचलत असाल तर, तुम्ही तुमचा इएमआय चुकून सुद्धा चुकवला नाही पाहिजे. कारण की याचा थेट परिणाम तुमच्या सिबिल स्कोरवर पाहायला मिळतो. त्याचबरोबर अनेक व्यक्ती या तीन मोठ्या चुका करून स्वतःचं नुकसान देखील करून घेतात. नेमक्या कोणत्या चुका पाहूया.
कस्टमर केअरचा विचार न करणे
तुम्ही ज्या कंपनीकडून पर्सनल लोन घेत आहात ती कंपनी तुम्हाला कस्टमर केअर सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकते की नाही या गोष्टीचा विचार करणे अत्यंत गरजेचे आहे. जर तुम्हाला लोन संदर्भात कोणत्या अडचणी आल्या तर तुम्ही कोणाशी संपर्क साधाल या गोष्टीचा विचार आधीच करणे गरजेचे आहे. कंपनीचा कस्टमर केअर नंबर असलाच पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही ज्या फिनटेक कंपनीकडून लोन घेत आहात ती कंपनी एखाद्या मेट्रो सिटीमध्ये लोकेटेड असावी.
एप्लीकेशनमध्ये जास्तीचे डाऊनलोड पाहून लोन घेण्याचा विचार करणे
गुगल कंपनीने मागील दोन वर्षांतच 4700 खोटे लोन ॲप प्ले स्टोअर वरून काढून टाकले आहेत. गुगल कंपनीने काढलेल्या या ॲपमध्ये अनेक ॲप असे होते ज्यांचे डाऊनलोड लाखोंच्या घरांमध्ये होते. जास्तीचे डाऊनलोड पाहून आपण एखाद्या फिनटेक कंपनीच्या ॲपला बळी नाही पडलं पाहिजे. कारण की या गोष्टीमुळे तुम्ही खूप मोठ्या गोत्यात येऊ शकता.
फिनटेक आरबीआयला रजिस्टर नसूनही लोन घेण्याचा विचार करणे
एनबीएफसी किंवा फिनटेक आरबीआयला रजिस्टर नसतील तर लोन घेणे टाळावे. भारतीय रिझर्व बँकेची रजिस्टर नसलेल्या फिनटेक कंपनीकडून तुम्ही चुकून सुद्धा लिहून घेऊ नका नाहीतर तुमचे नुकसान होऊन पश्चाताप होऊ शकतो.