
Instant Loan | कधी कोणावर कोणते संकट येईल याचा काही नेम नाही. कोणत्याही व्यक्तीला अचानक जास्त पैशांची गरज भासू शकते. दरम्यान सर्व सेविंग्स मोडून सुद्धा पैशांची कमतरता जाणवते. अशावेळी कोणताही व्यक्ती उधार किंवा लोन घेण्याचा विचार करतोच. परंतु काही कारणांमुळे त्याला लोन मिळाले नाही किंवा कोणाकडून उधारीवर पैसे मिळाले नाही तर, तो संकटाशी दोन हात करायला कुठेतरी कमी पडतो आणि निराश होऊन बसतो. परंतु आता चिंता करण्याची काही गरज नाही आता तुम्हाला तुमच्या हिशोबाने आणि तुमच्या आवडीचे लोन घेता येणार आहे. हे लोन नेमके कोणते आणि कशा पद्धतीने घेता येईल जाणून घेऊ.
1) ॲडव्हान्स सॅलरी लोन :
ॲडव्हान्स सॅलरी लोनमध्ये आपण आगाऊ रक्कम घेऊ शकतो. जर तुम्ही नोकरदार असाल आणि तुम्हाला अचानक पैशांची गरज भासत असेल तर तुम्ही ॲडव्हान्स सॅलरी लोन घेऊ शकता. हे लोन तुम्हाला बँकांकडून किंवा वित्तीय संस्थांकडून मिळू शकते. या लोनची विशेष गोष्ट म्हणजे तुम्ही हे लोन इएमआयवर फेडू शकता. परंतु सर्वसामान्य व्यक्तींना या लोनचं व्याजदर महागात पडू शकते. कारण की, हे लोन तुम्हाला 24% ते 30% च्या व्याजदरावर दिले जाते.
2) गोल्ड लोन :
असुरक्षित लोन, प्रॉपर्टी लोन यांच्या तुलनेत गोल्ड लोनचा व्यवसाय वाढीला लागला आहे. यामध्ये कार्पोरेट लोन देखील इंक्लुडेड आहे. या सर्व लोनच्या तुलनेत तुम्हाला गोल्ड लोन स्वस्त पडू शकते. गोल्ड लोनसाठी जास्त झिगझिक करावी लागत नाही. तुम्ही दिलेल्या सोन्याच्या हिशोबानेच लोन दिले जाते. त्याचबरोबर यामध्ये एक क्रेडिट स्कोर वगैरे यांसारख्या गोष्टी जास्त मॅटर करत नाही.
3) PPF-LIC पॉलिसीवर लोन :
एलआयसी आणि पीपीएफ यांसारख्या दीर्घकाळ चालणाऱ्या स्कीमवर तुम्हाला अगदी आरामात लोन मिळू शकते. जर तुम्ही अशा पद्धतीच्या दीर्घकाळ चालणाऱ्या स्कीममध्ये गुंतवणूक केली असेल आणि ही स्कीम तुम्हाला बंद करायची नसेल तर, यामधून तुम्हाला लोन मिळणं अतिशय सोपं आहे. या लोनच्या पाच वर्षांच्या मॅच्युरिटी पिरियडपर्यंतच तुम्हाला लोन मिळू शकते. सहाव्या वर्षाला तुम्हाला अंशिक काढत घ्यावी लागेल.
4) कारवर लोन :
जर तुमच्याकडे लोन घेण्याचा कुठलाही पर्याय उरला नसेल परंतु तुमच्याजवळ कार असेल तर तुम्ही कारवर लोन घेऊ शकता. यासाठी लोन हवं असणाऱ्या व्यक्तीला फायनान्स कंपनी किंवा बँकेच्या वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरावा लागेल. हे ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये तुम्हाला कारचे सर्व डॉक्युमेंट्स आणि माहिती कारणांसकट द्यावी लागेल. त्यानंतर फायनान्स कंपनी आणि बँक तुमच्या कारचं व्यवस्थित पद्धतीने आकलन करून त्यांनी ठरवलेली रक्कम तुम्हाला देण्यात येईल. जर तुमच्या कार मॉडेलवर ड्रायव्हिंग असेल तर, तुम्हाला लोन मिळू शकणार नाही.