Personal Loan EMI | ‘या’ कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती

Personal Loan EMI | कोणताही व्यक्तीवर कधीही मोठे संकट येऊ शकते. अशावेळी लोक मित्र-मैत्रिणींकडे उधारीवर पैसे मागतात. ज्यांच्याकडे कोणताच ऑप्शन उरत नाही ते थेट बँकेमध्ये वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी धाव घेतात. वैयक्तिक कर्ज हे अगदी सहजरित्या उपलब्ध होणारे कर्ज आहे. फक्त वैयक्तिक कर्जाचे व्याजदर हे इतर कर्जांच्या व्याजदरापेक्षा जास्त असते.

तुम्ही गरजेसाठी वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर ठीक आहे. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आयुष्यात काही ना काही अडचणी निर्माण होत असतात. एखाद्याच्या आयुष्यात अचानक इमर्जन्सी निर्माण होते तर, काहींना बिझनेसमध्ये लॉस झाल्यामुळे त्याचबरोबर आर्थिक संकट आल्यामुळे वैयक्तिक कर्ज घेण्याची वेळ येते. परंतु काही व्यक्ती या महत्त्वाच्या कारणांसाठी वैयक्तिक कर्ज घेत नाहीत. आज आपण हेच जाणून घेणार आहोत की, कोणता कारणांसाठी वैयक्तिक कर्ज घेणे नुकसानदायक ठरू शकते.

महागड्या गरजा भागवण्यासाठी :
काही व्यक्ती स्वतःच्या महागड्या गरजा भागवण्यासाठी वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार करतात. परंतु ही चूक तुम्हाला भविष्यात अत्यंत महागात पडू शकते. काही व्यक्ती महागडे कपडे, महागडी पर्स आणि इतरही महागड्या वस्तू खरेदी करण्यासाठी वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार करतात. तुम्ही वारंवार या गोष्टी करत असाल तर भविष्यात वित्तीय समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

वैयक्तिक कर्ज घेऊन उधारी फेडू नका :
तसं पाहायला गेलं तर प्रत्येकच व्यक्ती गरज लागल्यानंतर आपल्या जवळच्या व्यक्तींकडून उधार पैसे घेण्याचा प्रयत्न करतात. हे पैसे परत देण्यासाठी वैयक्तिक कर्ज घेतात. परंतु असं करणं चूक आहे. तुम्ही तुमची उधारी फेडण्यासाठी वैयक्तिक कर्ज घेऊ शकत नाही. अन्यथा तुम्ही एका कर्जातून मुक्त होऊन दुसऱ्या कर्जामध्ये अडकाल.

वैयक्तिक कर्ज घेऊन स्टॉक मार्केट आणि शेअर बाजारात गुंतवणूक करू नका :
सध्या स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याचा ट्रेंड सुरू आहे. बहुतांश व्यक्ती ट्रेडिंग करताना देखील पाहायला मिळत आहेत. तुम्ही तुमचे पैसे स्टॉक मार्केटमध्ये किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवा परंतु पैसे नसून देखील वैयक्तिक कर्ज घेऊन पैसे गुंतवणे महागात पडू शकते. त्यामुळे या गोष्टीची काळजी.