शिवसेना आ. वैभव नाईकांच्या कार्यपद्धतीला कंटाळून उपजिल्हा प्रमुख अभय शिरसाट काँग्रेसमध्ये

मुंबई, १८ फेब्रुवारी: शिवसेनेतील पक्षांतर्गत वादाला कंटाळलेले उपजिल्हा प्रमुख अभय शिरसाट यांनी अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईत बुधवारी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव जगताप यांच्या उपस्थितीत अभय शिरसाट यांच्या पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. त्यांच्या जाण्याने आगामी काळात कुडाळमध्ये शिवसेनेला खिंडार पडण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून अभय शिरसाट यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले जाते.
मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यातच अभय शिरसाट यांनी तत्कालीन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, खासदार राजीव सातव आणि अशोक चव्हाण यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच अभय शिरसाट काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकत काँग्रेसचा झेंडा हाती धरला आहे.
तत्पूर्वी भाजपच्या ७ नगरसेवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला होता. मागील 5 वर्षांपासून नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीला आम्ही कंटाळलो होतो. त्यामुळे आम्ही शिवसेनेत प्रवेश करणार आहे. गेल्या 5 वर्षांत नितेश राणेंनी काही आश्वासनं दिली होती. ती पूर्ण केली नाही. तसेच त्यांची कार्यपद्धती चुकीची होती. नगरपरिषद ही पहिल्यांदा झाली होती. पण तिचा विकास नितेश राणे करू शकले नाही, अशी टीकाही शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांनी केली होती.
News English Summary: Sub-district chief Abhay Shirsat, fed up with the Shiv Sena’s infighting, has finally joined the Congress. Abhay Shirsat’s inauguration ceremony was held in Mumbai on Wednesday in the presence of state president Nana Patole, former chief minister Prithviraj Chavan and Manikrao Jagtap. With his departure, Shiv Sena is likely to face a rift in Kudal in the near future. It is said that Abhay Shirsat joined the Congress after getting fed up with the working style of Shiv Sena’s Kudal-Malvan MLA Vaibhav Naik.
News English Title: Big setback for Shivsena in Konkan Kudal Abhay Shirsat joins congress news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON