8 December 2021 7:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Man Infraconstruction Ltd | झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील या स्मॉलकॅप स्टॉकने 300 टक्के रिटर्न दिला | वाचा सविस्तर Gen Bipin Rawat Chopper Crash | हेलिकॉप्टर अपघातात जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीसह १३ जणांचा मृत्यू Mastek Ltd | आशिष कचोलियांच्या पोर्टफोलिओतील हा मल्टीबॅगर स्टॉक नवीन ब्रेकआउटसाठी तयार | तुमच्याकडे आहे? Indo Count Industries Ltd | या स्टॉकमध्ये 1 वर्षात 40 टक्के रिटर्नची संधी | ICICI ब्रोकरेजचा खरेदी कॉल Closing Bell | शेअर बाजारात तेजी | सेन्सेक्समध्ये 1000 अंकांची उसळी | निफ्टीही प्रचंड वाढला India GDP Fitch Forecast | फिच रेटिंगने भारताच्या आर्थिक वाढीचा अंदाज कमी केला Bharti Airtel Ltd | या स्टॉकमध्ये 22 टक्के रिटर्नचे संकेत | ब्रोकरेजचा खरेदीचा कॉल
x

Special Recipe | मराठमोळी झणझणीत कांद्याची भाजी - पहा रेसिपी

Kandyachi Bhaji recipe

मुंबई, २८ जुलै | केवळ महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशात कांद्याची भाजी अत्यंत आवडीने खाल्ली जाते. खरे तर ही कांद्याची भाजी महाराष्टातची मानली जाते आणि ग्रामीण महाराष्ट्रात तर कांद्याची भाजी म्हणजे आवडीचा पदार्थ म्हणावा लागेल. पण आता कांद्याची भाजी पूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध झाली आहे. कांद्याची भाजी बनविण्यास खूपच सोप्पी आहे. आम्ही सांगितल्याप्रमाणे कांद्याची भाजी करून पहा.

संपूर्ण साहित्य:
2 मोठे कांदे
2 चमचे शेंगदाणे कूट
20 ग्रॅम चिंच
20 ग्रॅम गूळ
2 चमचे लाल तिखट
1 चमचा हळद
4-5 लसूण पाकळ्या
1/2 आलं
मीठ चवीनुसार
1 चमचा गरम मसाला
1 चमचा कोथिंबीर
फोडणीसाठी तेल,जीरे ,मोहरी, हिंग कडीपत्ता
1 चमचा खसखस

संपूर्ण कृती:
१. सर्व साहित्य एकत्र करून घ्या,मग कांदा उभा चिरुन पाण्यात धुवून पाणी काढून निथळून घ्या

२. एक कढई गॅसवर ठेवून फोडणी करून घ्या त्यात आलं, लसूण, कडीपत्ता, कांदा घाला,कांदा तेलात परतुन झाला की त्यात लाल तिखट, मीठ,हळद,गरम मसाला,कुट घाला,मग चिंचेंचा कोळ व गूळ घाला

३. भाजी हलवुन झाकण लावून एक 5 मिनिटे वाफ काढा मग तयार झाली आपली कांद्याची भाजी तयार,सर्व्ह करताना कोथिंबीर घाला

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Kandyachi Bhaji recipe in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(151)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x