15 December 2024 4:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा
x

रायगड: राष्ट्रवादीला खिंडार, आमदार अवधूत तटकरे शिवबंधन बांधणार

mla awadhut tatkare, ncp, shriwardhan, shivsena

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांच्या आधी भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधल्या अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्ष आणि सेनेमध्ये प्रवेश केला. त्यामुळे विधानसभा निवडणुकांच्या आधी एनसीपी-काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे. आता एनसीपीला आणखी एक धक्का बसणार आहे. एनसीपीचे आमदार अवधूत तटकरे हे सोमवारी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

मागील काही दिवसांआधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे जवळचे सहकारी आणि खासदार माजिद मेमन हे मेट्रो भूमिपूजनच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होत असलेल्या या कार्यक्रमाला माजिद मेमन उपस्थित राहिल्याने ते देखील भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर आहेत की काय, अशी चर्चा सुरू झाली होती.

दरम्यान, पक्ष बदलाची चर्चा सुरू होताच माजिद मेमन यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. ‘मी पक्ष बदलणार नाही. शरद पवारांचा मी विश्वासू सहकारी त्यामुळे राष्ट्रवादी सोडण्याचा प्रश्नच नाही,’ असा खुलासा माजिद मेमन यांनी केला होता. मेमन यांनी भारतीय जनता पक्ष प्रवेशाच्या चर्चा फेटाळल्या असल्या तरी मेट्रो भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

सुनील तटकरे आणि अवधूत तटकरे यांच्यात वाद असल्याचे बोलले जाते. सुनील तटकरे यांची विधान परिषदेवर वर्णी लागल्यानंतर त्यांनी आमदारकीवर दावा केला होता. तेव्हापासून त्यांच्यात वादाची ठिणगी पडल्याचे समजते. त्यातच सुनील तटकरे यांची मुलगी अदिती तटकरे आगामी विधानसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अवधूत तटकरे यांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

मागील काही दिवसांपूर्वी सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय राष्‍ट्रवादी काँगेसचे जिल्‍हा सरचिटणीस रघुवीर देशमुख यांनी शिवसेनेत प्रवेश केला. महाडचे आमदार भरत गोगावले यांनी शिवबंधन बांधून त्‍यांचे शिवसेनेत स्‍वागत केले. विकास हवा असेल तर शिवसेना-भाजप युतीशिवाय पर्याय नसल्‍याचे पक्ष प्रवेशानंतर रघुवीर देशमुख म्‍हणाले होते. मागील विधानसभा निवडणुकीत श्रीवर्धन मतदारसंघातून अवधूत तटकरे यांचा निसटता विजय मिळवला होता. या निवडणुकीत अवधूत तटकरे यांना ६१,०३८ मते मिळाली. तर शिवसेनेचे रवी मुंडे यांना ६०९६१ मते मिळाली आहेत.

हॅशटॅग्स

#SunilTatkare(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x