21 November 2019 2:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

कणकवली: राणेंनी टीका टाळल्याने, उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष

Uddhav Thackeray, MP Narayan Rane, Shivsena, MLA Nitesh Rane

कणकवली: शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे आज सिंधुदुर्गात दोन प्रचार सभा घेणार आहेत. कणकवलीत सतीश सावंत आणि वैभव नाईक यांच्या प्रचारासाठी तर सावंतवाडीत दीपक केसरकर यांच्या प्रचारासाठी या सभा आहेत. कणकवलीत भाजपाचे नितेश राणे आणि शिवसेनेचे सतीश सावंत हे आमने सामने असल्यामुळे उध्दव यांची कणकवलीतली सभा विशेष महत्वाची आहे.

मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कणकवलीत नितेश राणे यांच्यासाठी सभा घेवून शिवसेनेवर जराही टिका न करता नितेश राणेना ८०% मतं मिळतील असा दावा केला होता. शिवाय नारायण राणेनीही शिवसेनेशी कटुता संपवायला आपण तयार आहोत अस म्हटलं होतं. पण राणे आणि शिवसेनेचं भांडण पाहता उध्दव ठाकरे कणकवलीच्या सभेत काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.

त्याआधी माजी खासदार नीलेश राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये यावेळी विलीन करण्यात आला. यावेळी झालेल्या सभेत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर टीका केली नाही तसेच राणेंनेही टीका करणे टाळले. राणेंची सभा झाल्यानंतर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची सभा आहे.

भाजपच्या अधिकृत उमेदवाराविरोधात शिवसेनेचा उमेदवार असतानाही मुख्यमंत्र्यांनी दिलेला सल्ला पाळत राणे कुटुंबातल्या कोणीही शिवसेनेवर टीका केली नाही. मात्र उद्धव ठाकरे हे कणकवलीतल्या सभेत राणेंवर बरसणार का, याबाबत आज उत्सुकता आहे. राज्यात भाजप शिवसेनेत युती असली तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र युती नाही. उद्धव ठाकरेंच्या तळकोकणात दोन सभा आहेत. दुपारी चार वाचता कणकवलीत तर संध्याकाळी सात वाजता सावंतवाडीमध्ये सभा होणार आहे.

हॅशटॅग्स

#Narayan Rane(50)#UddhavThackeray(86)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या