21 November 2019 7:28 AM
अँप डाउनलोड

मोदींच्या नव्या भारतात उपासमारीची स्थिती पाकिस्तानपेक्षाही भीषण: ग्लोबल हंगर इंडेक्स रिपोर्ट

Hunger Index, global hunger index report

नवी दिल्लीः भारतात उपासमारीची समस्या अधिक गंभीर झाल्याचं ग्लोबल हंगर इंडेक्समधून (जीएचआय) समोर आलंय. जीएचआयमध्ये भारताची घसरण झालीय. ११७ देशांच्या यादीत भारत १०२व्या क्रमांकावर फेकला गेलाय. दक्षिण आशियाई देशांमधील हा सर्वांत खालचा क्रमांक आहे. दक्षिण आशियातील इतर देश हे ६६ ते ९४ व्या स्थानावर आहेत. भारत या यादीत ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिकेच्याही मागे आहे. तर पाकिस्तान या यादीत ९४व्या क्रमांकावर आहे.

२०१५च्या अहवाल ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारत ९३व्या क्रमांकावर होता. त्यावेळी दक्षिण आशियामध्ये पाकिस्तान हा एकमेव देश होता जो या जीएचआयमध्ये भारताच्याही मागे होता. पण पाकिस्तानने यंदा भारताला मागे टाकत ९४ वे स्थान मिळवले आहे. २०१४ ते २०१८ या कालावधीत मिळवलेल्या आकडेवारीवर हा ग्लोबल हंगर इंडेक्स बनवण्यात आला आहे. विविध देशांमधील कुपोषित मुलांची लोकसंख्या, वजनाखालील किंवा त्यापेक्षा कमी वयाखालील मुलांची टक्केवारी आणि बालमृत्यू दर यावर आधारीत ही आकडेवारी आहे.

दरम्यान, या क्रमवारीत नेपाळने खूप चांगली प्रगती केली आहे. तर भारतामुळे ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये दक्षिण आशियाची स्थिती आफ्रिकेमधील उपसहारा क्षेत्रापेक्षा वाईत झाली आहे. या अहवालानुसार भारतात ६ ते २३ महिने वयोगटातील केवळ ९.६ टक्के मुलांनाच किमान योग्य आहार उपलब्ध होतो. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या नव्या अहवालात हा आकडा केवळ ६.४ टक्के असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

देशातील भुकेच्या स्थितीवरून देशांना ० ते १०० गुण दिले जातात. यामध्ये ० गुण हे सर्वोत्तम समजले जातात. त्याचा अर्थ देशात भुकेची स्थिती नाही, असा होतो. तर १० पेक्षा कमी गुण असणे म्हणजे त्या देशात भुकेची स्थिती फारशी गंभीर नाही असा अर्थ होतो. तर २० ते ३४.९ गुण भुकेचे गंभीर संकट दर्शवतात. ३५ ते ४९.९ गुण परिस्थिती आव्हानात्मक असल्याचे दर्शवतात. तर ५० किंवा त्यापेक्षा अधिक गुण हे भुकेची परिस्थिती भयावह असल्याचे दर्शवतात.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1044)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या