11 May 2025 2:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Motherson Sumi Wiring Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मोठ्या टार्गेट प्राईसह तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: MSUMI Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्सबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: TATATECH Rama Steel Share Price | 9 रुपयांचा पेनी स्टॉक फोकस मध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: RAMASTEEL Infosys Share Price | IT शेअर मालामाल करणार; रॉकेट तेजीत होईल कमाई, स्वस्तात खरेदी करा - NSE: DATAPATTNS Data Patterns Share Price | रॉकेट तेजीत आहे हा शेअर, 4.35 टक्क्यांनी वाढला, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: DATAPATTNS BPCL Share Price | होय! तब्बल 44 टक्के परतावा देईल हा सरकारी कंपनीचा शेअर, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: BPCL National Pension Scheme | पगारदारांना महिना 1000 रुपये गुंतवणुकीतून प्रति महिना 1 लाख रुपये फिक्स पेन्शन मिळणार
x

राज्यात दिवसभरात ६४९७ नवे कोरोना रुग्ण, १९३ रुग्णांचा मृत्यू

Maharashtra, Corona Virus, Covid 19

मुंबई, १३ जुलै : राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आज राज्यात दिवसभरात 6497 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील आतापर्यंतचा कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 60 हजार 924 इतका झाला आहे.

आज सोमवारी राज्यात 193 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर राज्यात एकूण 10,482 जण दगावले आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर 4.02 टक्के इतका आहे. सद्यस्थितीत राज्यात 1 लाख 5 हजार 637 ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

महाराष्ट्रातील करोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट ५५.३८ टक्के झाला आहे. तर महाराष्ट्रातील मृत्यू दर ४.२ टक्के झाला आहे. आत्तापर्यंत १३ लाख ४२ हजार ७९२ नमुन्यांपैकी २ लाख ६० हजार ९२४ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्याच्या घडीला राज्यात ६ लाख ८७ हजार ३५३ लोक होम क्वारंटाइन आहेत. तर ४१ हजार ६६० लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. सध्याच्या घडीला राज्यात १ लाख ५ हजार ६३७ केसेस अॅक्टिव्ह आहेत असंही महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे.

 

News English Summary: The number of corona patients in the state is increasing rapidly. Today, 6497 new corona patients have been found in the state during the day. As a result, the number of corona victims in the state so far has reached 2 lakh 60 thousand 924.

News English Title: 6497 Covid19 Cases 4182 Discharged 193 Deaths Reported In Maharashtra Today News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या