वणी : यवतमाळ मधील वणी शहरातील २२ वर्षीय विद्यार्थिनीवर भाजप नगरसेवक धीरज दिगंबर पाते वय वर्ष २९ याने मैत्री करून तिच्याशी प्रेम संबंध प्रस्थापित केले. तिच्या वयाचा तसेच अज्ञानाचा गैरफायदा घेत सतत ५ वर्ष लैंगिक अत्याचार करत होता. त्यानंतर तरुणीचे सर्व खोटे कागदपत्र तयार करून या तरुणीला लग्न करण्यासाठी भाजप नगरसेवक धीरज दिगंबर सतत ब्लॅकमेल करत होता.
त्या पीडित विद्यार्थिनीने आणि तिच्या भेदरलेल्या कुटुंबाने शनिवारी या प्रकरणी पोलिसात रीतसर तक्रार दाखल केली. त्यानंतर वणी पोलिसांनी नगरसेवक धीरज पाते विरुद्ध गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर आरोपी धिरजला बेड्या ठोकण्यात आल्याने संपूर्ण वणी शहरात खळबळ माजली आहे.
आरोपी धीरज याचा खोटेपणा जेव्हा पीडित विद्यार्थिनीच्या लक्षात आला तेव्हा पीडितेनं घडला सर्व प्रकार तिच्या कुटुंबियांना सांगितलं आणि पोलिसांमध्ये रीतसर तक्रार दाखल केली. आरोपी पीडितेवर लग्न करण्यासाठी प्रचंड दबाव आणून तिला वारंवार धमक्या देऊन दबाव टाकत होता. महत्वाचं म्हणजे तिला ब्लॅकमेलिंग करण्यासाठी तिची सर्व खोटे कागदपत्र तयार करून घेण्यात आली होती. तसेच तिच्या नवे बनावट फेसबुक अकाऊंट सुद्धा त्याने बनवल होत.
अनेक वर्षांपासून होणाऱ्या या अत्याचाराने ती विद्यार्थिनी भेदरली होती आणि अखेर सर्व सहन शक्तीच्या बाहेर गेल्याने तिने घडला सर्व प्रकार तिच्या पालकांना सांगितला. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी भाजप नगरसेवक धीरज दिगंबर याच्याशी संपर्क साधून तिची सर्व कागदपत्र मागितली असता त्याने थेट ५ लाख रुपयांची मागणी तिच्या कुटुंबीयांकडे केली आणि पैसे न दिल्यास मुलीची बदनामी करण्याची धमकी सुद्धा तिच्या कुटुंबियांना दिली होती.
 
						 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		