28 March 2024 4:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल? Reliance Share Price | होय! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पैसे दुप्पट करणार, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राइस जाहीर Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव प्रचंड महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील वाढीव दर तपासून घ्या
x

पेट्रोल-डिझेल दरवाढीला राज्य सरकार जबाबदार, फडणवीस आणि दरेकरांचा आरोप

BJP MLA Praveen Darekar, Devendra Fadnavis, Petrol diesel price hike

सिंधुदुर्ग, 29 जून : पेट्रोल आणि डिझेलच्या दराचा भडकला उडाला आहे. दरवाढीविरोधात देशभरात तीव्र पडसाद उमटत आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढीला राज्य सरकार जबाबदार आहे, दावाच विधान परिषदेचे भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

प्रवीण दरेकर सध्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहे. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना राज्यातील पेट्रोल डिझेल दरवाढीवरचे खापर त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर फोडलं. ‘इंधन दरवाढीचा निर्णय हा पेट्रोल कंपन्या घेत असतात. राज्य सरकार जे कर लावते, त्यामुळे दरवाढ होत असते. भाववाढीचा नीट अभ्यास केला पाहिजे. राज्य सरकार पेट्रोल आणि डिझेल दरवाढीतून राजकारण करत आहे.’ असा आरोपच दरेकर यांनी केला.

दुसरीकडे, काँग्रेसने इंधन दरवाढीविरोधात जे आंदोलन सुरु केलं आहे ते बेगडी आहे अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. अमरावतीत त्यांनी रुग्णालयांना आणि क्वारंटाइन सेंटर्सना भेटी दिल्या. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांना काँग्रेसच्या आंदोलनाबाबत प्रश्न विचारण्यात आला. ज्यावर त्यांनी काँग्रेसचं आंदोलन बेगडी असल्याचं म्हटलं आहे.

“पेट्रोल-डिझेलचे दर आता कंपन्यांच्या हाती आहेत. ते सरकारच्या नियंत्रणातून मुक्त करण्याचा निर्णय काँग्रेसच्या राजवटीतच झाला. इंधन हे जीएसटीच्या कक्षेत नसल्याने त्यावर व्हॅट आकारला जातो. २०१८ मध्ये अशीच वेळ आली होती, तेव्हा आपल्या सरकारने ५ रूपयाने दर कमी केला होता. आता राज्य सरकारने अर्थसंकल्पात १ रूपया आणि आता २ रूपये व्हॅट वाढविला. एकूण 3 रूपये राज्य सरकारने वाढवले आहेत त्यामुळे त्यामुळे काँग्रेसचे इंधन दरवाढीविरोधातील आंदोलन हे बेगडी आहे”.

 

News English Summary: Petrol and diesel prices have skyrocketed. There is a strong reaction across the country against the hike. BJP MLA Praveen Darekar has claimed that the state government is responsible for the petrol-diesel price hike.

News English Title: BJP MLA Praveen Darekar has claimed that the state government is responsible for the petrol diesel price hike news latest updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x