26 July 2021 4:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Special Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी
x

हिंदुत्वासाठी आजही शिवसेनाच समोर येते | हिंदुत्व आणि मराठी हे दोन्ही विषय शिवसेनेसाठी महत्त्वाचे - संजय राऊत

Shivsena Hindutwa

मुंबई, १९ जून | शिवसेनेचा आज ५५वा वर्धापन दिन असून त्यानिमित्ताने पक्षाच्या नेतेमंडळींकडून आणि इतर राजकीय पक्षांकडून देखील शिवसेनेला शुभेच्छा दिल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या गेल्या ५५ वर्षांच्या प्रवासाविषयी भूमिका मांडली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

१०-२० जागा जास्त जिंकल्या म्हणून कोणी मोठा होत नाही. सत्ता येत जात असते. आम्ही तर बराच काळ विरोधी पक्षात राहिलो. मात्र तरीही पक्ष टिकला. शिवसेना मुंबई-ठाण्याची वेस ओलांडेल, असंही कोणाला वाटलं नव्हतं. मात्र आम्ही महाराष्ट्रभर पोहोचलो आणि ५५ वर्षे टिकलो,’ असं संजय राऊत यांनी एका वृत्तवहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं.

फडणवीस यांनी शंभरहून अधिक जागा जिंकून दाखवल्या. पण बाळासाहेब ठाकरे असतानाही शिवसेनेला हा करिश्मा करून का दाखवता आला नाही? असा प्रश्न राऊत यांना विचारण्यात आला. ‘ममता बॅनर्जींसमोर पश्चिम बंगालमध्ये कोणाचंही आव्हान नाही. तिथे काँग्रेस जवळपास नाहीच. तमिळनाडूत दोन प्रबळ प्रादेशिक पक्ष आहेत. तिथे काँग्रेसला संधी नाही. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष-बहुजन समाज पक्ष आहे. बिहारमध्ये लालू प्रसाद यादव बराच काळ सत्तेत होते. पण महाराष्ट्रात तशी परिस्थिती नाही,’ असं राऊत यांनी सांगितलं.

तसेच हिंदुत्वासाठी आजही शिवसेनाच समोर येते, असं राऊत म्हणाले. “आजही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंच्या विचारधारेवरच पुढे जात आहे. मराठी माणसाचा विषय शिवसेनेने दूर केलेला नाही. हिंदुत्व आणि मराठी हे दोन्ही विषय शिवसेनेसाठी महत्त्वाचे राहिले आहेत. आज हिंदुत्वाचा बुलंद आवाज म्हटलं की जगभरातल्या हिंदुंसमोर शिवसेनाच येते. शिवाय मराठी माणसाला आजही शिवसेनाच आपला आधार वाटते”, असं राऊत म्हणाले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: Shivsena MP Sanjay Raut On 55th Anniversary Of Shivsena Hindutwa And National Politics news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1120)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x