26 November 2022 8:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Mutual Fund | टाटा म्युच्युअल फंडमधील टॉप 10 स्किमची लिस्ट सेव्ह करा, 3 वर्षात पैसे दुप्पट करा आणि मालामाल व्हा Horoscope Today | 27 नोव्हेंबर 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Numerology Horoscope | 27 नोव्हेंबर, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल?, तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या Bhediya Box Office Collection | बॉक्स ऑफिसवर 'भेडिया'ची दमदार ओपनिंग, 1 दिवसात किती कोटींचा गल्ला? Paytm Share Price | खरं की काय? पेटीएमचा स्टॉक पुन्हा दुपटीने वाढणार? तज्ज्ञ असं सांगत असण्यामागे नेमकं कारण काय? Vikram Gokhale | मराठी, हिंदी चित्रपटसृष्टी तसंच नाट्यसृष्टीतही अढळपद निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंच निधन Mutual Fund Calculator | बँक FD चिल्लर झाली, SIP गुंतवणुकीतून 2 कोटी रिटर्न मिळेल, हा पैशाचा फंडा फॉलो करा
x

शिवसेनेची खास ऑफर | पेट्रोल मोफत मिळवा तो देखील नारायण राणेंच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर?

Shivsena MLA Vaibhav Naik

कणकवली, १९ जून | शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात पुन्हा ठिणगी उडण्याची शक्यता आहे. शाब्दिक आरोप-प्रत्यारोप, वाद आणि राडे करुन झाल्यानंतर आता शिवसेना-भारतीय जनता पक्ष यांच्यात पुन्हा एकदा जुंपण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेच्या वर्धापनदिनी आमदार वैभव नाईक यांनी एका अनोख्या उपक्रमाचे आयोजन करुन भारतीय जनता पक्षाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेनेचा आज 55 वा वर्धापनदिन आहे. यानिमित्ताने आमदार वैभव नाईक यांनी स्वस्त दरात पेट्रोल वाटपाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे हे पेट्रोल वाटप भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर होणार होतं. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला धोबीपछाड देण्याचा कार्यक्रमच वैभव नाईक यांनी आखला होता.

त्यानुसार सर्वसामान्य नागरिकांना 100 रुपयांत 2 लिटर पेट्रोल (प्रति वाहन) देण्यात येणार आहे. तर भारतीय जनता पक्षाच्या सदस्यत्वाचे ओळखपत्र दाखवणाऱ्यांना प्रत्येकी 1 लीटर पेट्रोलचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. वैभव नाईक यांच्या या उपक्रमाची समाज माध्यमांवर चांगलीच चर्चा रंगली आहे. यावरुन शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या समर्थकांमध्ये पुन्हा एकदा जुंपण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले होते वैभव नाईक?
शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक पोस्टर ट्विट करुन शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापनदिनानिमित्त स्वस्त दरात पेट्रोल वाटपाची घोषणा केली होती. त्यानुसार सर्वसामान्य नागरिकांना कुडाळ येथील भारत पेट्रोल पंपावर १०० रुपयांत दोन लीटर पेट्रोल (प्रति वाहन) आणि भाजप सदस्यत्वाचे ओळखपत्र दाखवणाऱ्यांना प्रत्येकी १ लीटर पेट्रोल मोफत दिलं जाणार असल्याचं नमूद केलं होतं. आज सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत हे वाटप होणार होतं.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: Shivsena MLA Vaibhav Naik offer Petrol and diesel distribution in cheap rates at Konkan news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1169)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x