30 April 2025 4:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

आधी पालकमंत्रीच आरोग्यमंत्री होते, खासदार डॉक्टरच आहेत, तरी KDMC'ची आरोग्यसेवा थर्डक्लासच

Minister Eknath Shinde, MLA Raju patil

ठाणे, २४ जून : ठाणे जिल्ह्यातील करोना रुग्णांची वाढती संख्या व तुटपुंजी उपाययोजना लक्षात घेऊन ठाणे महापालिका आयुक्तांसह चार आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मात्र खरी गरज आहे ती पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनाच आता बदला अशी मागणी भाजप आणि मनसेने केली आहे.

मनसे आमदार राजू पाटील यांनी कल्याण-डोंबिवलीत वाढते रुग्ण आणि केडीएमसीची आरोग्य सेवा यावरुन पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे या पिता-पुत्रांवर घणाघाती टीका केली आहे. राजू पाटील म्हणतात की, केडीएमसीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून युतीचीच सत्ता आहे. जवळजवळ २० हजार कोटींच्यावर बजेट या काळात मंजुर झाले. परंतु आरोग्य सेवेच्या नावाने बोंबाबोंबच आहे. मागच्या सरकारमध्ये डोंबिवलीचे आमदार वैद्यकिय शिक्षण मंत्री, पालकमंत्री हेच आरोग्यमंत्री पण होते आणि खासदार तर डॉक्टरच आहेत. तरी केडीएमसीची आरोग्यसेवा थर्डक्लासच राहिली असा आरोप त्यांनी केला आहे.

तसेच खरंतर एखादे वैद्यकिय महाविद्यालय व दोन्ही शहरात एक एक सुसज्ज दवाखाना सहज उभारता आले असते. त्यामुळे भाजपाने पण आता जबाबदारी झटकण्याचे काम करू नये. या दोन्ही शहरांची दुर्दशा करण्यात दोन्ही पक्षांचा वाटा समान आहे. एकीकडे सत्ताधारी आरोग्यसेवा तयार करू शकले नाहीत म्हणून सध्या करोडो रुपये खर्च करून खाटा टाकायची कामं करत आहे. तर दुसरीकडे गेल्या २५ वर्षापासून युतीत असलेली भाजपा काही महिन्यापूर्वी वेगळी काय झाली जणू आम्ही त्यांच्यातले नाहीच अशा अविर्भावात जबाबदारी झटकण्याचे काम करत आहेत. लॉकडाऊनला विरोध करून नंतर होणाऱ्या प्राणहानी वरून राजकारण करण्याचे जर कोणी मनात आणत असेल तर ते माणूसकीला धरून होणार नाही असं सांगत राजू पाटील यांनी शिवसेनेसोबत भाजपावरही टीकास्त्र सोडलं आहे.

दुसरीकडे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी वैयक्तिक मदत करण्यावर भर देऊन ठोस शासकीय व्यवस्था निर्माण करण्यात सपशेल नापास ठरले असून त्यामुळेच आज चार आयुक्तांची बदली करण्याची वेळ आल्याचे संजय केळकर म्हणाले. ठाणे जिल्हा रुग्णालय व कळवा येथील छत्रपती शिवाजी वैद्यकीय महाविद्यालयाची अवस्था दयनीय आहे. एवढे वर्षे ठाणे महापालिकेत सत्तेवर असून व गेली अनेक वर्षे मंत्री असून एकनाथ शिंदे यांनी ठाणेकरांच्या व जिल्ह्यातील आरोग्यासाठी काहीही ठोस केलेले नसल्याने त्यांना आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बदलावे आणि ठाणे वाचवावे असे अविनाश जाधव म्हणाले.

 

News English Summary: Considering the increasing number of corona patients in Thane district and inadequate measures, four commissioners including Thane Municipal Commissioner have been transferred. However, BJP and MNS have demanded that only Guardian Minister Eknath Shinde should be replaced.

News English Title: Change The Guardian Minister Eknath Shinde Why Do You Change The Commissioner Ask BJP And MNS News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#RajuPatil(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या