1 May 2025 5:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, हि आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATAMOTORS Vodafone Idea Share Price | मोठी बातमी, पेनी स्टॉकमध्ये दिसू शकते मोठी तेजी, महत्वाची अपडेट आली - NSE: IDEA Vedanta Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल असलेला शेअर खरेदी करा; मोठा परतावा मिळेल - NSE: VEDL HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्समध्ये दिसणार तुफानी तेजी, संधी सोडू नका, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL Trident Share Price | 26 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, महत्वाचे संकेत, यापूर्वी 5238% परतावा दिला - NSE: TRIDENT NTPC Share Price | 461 टक्के परतावा देणारा एनटीपीसी स्टॉक पुन्हा फोकसमध्ये, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NTPC
x

गॅस पेटवणं सोपं, पण गोरगरीबाच्या घरची चूल आधी पेटली पाहिजे: मुख्यमंत्री

PM Narendra Modi, CM Uddhav Thackeray

औरंगबाद: सत्तास्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी तिथल्या उद्योजकांच्या प्रदर्शनाला भेट दिली. या भेटीमध्ये मुख्यमंत्र्यांनी दोन महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. यामध्ये पहिली घोषणा म्हणजे औरंगाबादच्या बिडकिन भागामध्ये ५०० एकर जमिनीवर अन्नप्रक्रिया उद्योग उभारण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. शिवाय या ५०० एकरपैकी १०० एकर हे फक्त महिला उद्योजिकांसाठी राखीव ठेवण्याचा देखील शब्द मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. ‘२०२०च्या जून महिन्यात या प्रकल्पाचं भूमिपूजन करायचं. त्यानंतर मध्ये कुठेही ते काम अडू नये, याची काळजी आपल्याला करायची आहे. नाहीतर फक्त भूमिपूजनाच्या पाट्या आपल्याला जागोजागी दिसतात’, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

राज्यातील गोरगरीब जनेतेच्या दैनंदीन समस्या अनेक आहेत. गॅस पेटवणं सोपं असतं पण गोरगरीबाच्या घरची चूल आधी पेटली पाहिजे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला. औरंगबादमध्ये ‘ऍडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो-२०२०’चे उदघाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ‘राज्यातील अनेक राजकीय अडचणींवर मात करुन हे सरकार स्थापन झालं आहे. हे शेतकऱ्यांचं सरकार असून मला राज्यातील शेतकऱ्यांना केवळ कर्जमुक्त नव्हे, तर चिंतामुक्त करायचं आहे’, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“उद्योजकांसमोर अनेक अडचणी आहेत. अडचणींचा सामना करून उद्योजकांनी मोठं विश्व उभं केलं आहे. जर त्यांच्यासमोरील अडचणी दूर केल्या तर उद्योजक आणखी मोठं विश्व उभारू शकतील,” असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. “आम्ही संकटावर मात करून हे सरकार उभं केलं आहे. उद्योजकांना प्रेरणा देणारं हे सरकार असेल. देशात, जगात, देशात आर्थिक मंदी आहे म्हणून रडत बसलो तर आपण लढू शकणार नाही आणि रडणारे तसं नीट जगूही शकणार नाही. लढतो तो जगतो. महाराष्ट्राला लढण्याची परंपरा आहे,” असंही ते यावेळी म्हणाले.

 

Web Title:  Chief Minister Uddhav Thackeray in Aurangabad Maha Expo 2020 criticizes PM Narendra Modi.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या