1 May 2025 3:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्समध्ये दिसणार तुफानी तेजी, संधी सोडू नका, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL Trident Share Price | 26 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, महत्वाचे संकेत, यापूर्वी 5238% परतावा दिला - NSE: TRIDENT NTPC Share Price | 461 टक्के परतावा देणारा एनटीपीसी स्टॉक पुन्हा फोकसमध्ये, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NTPC HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO RVNL Share Price | पीएसयू शेअर पुन्हा सुसाट तेजीने परतावा देणार, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL IREDA Share Price | मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार, स्वस्तात खरेदी करा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IREDA GTL Infra Share Price | पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हलच्या जवळ; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: GTLINFRA
x

भोसरी जमीन क्लीनचिट प्रकरण | फडणवीसांची प्रकरण दडपण्याप्रकरणी ED'ने चौकशी का करु नये? - काँग्रेस

Eknath Khadse

मुंबई, ०७ जुलै | राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली आहे. 2016 मध्ये पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी व्यवहारप्रकरणी तपास करत असलेल्या ईडीने चौधरी यांची रात्रभर कसून चौकशी केल्यानंतर ही कारवाई केली. ईडीच्या या कारवाईमुळे येत्या काळात एकनाथ खडसे यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

भारतीय जनता पक्षाला रामराम करत एकनाथ खडसे राष्ट्रवादीमध्ये आले होते. यानंतर ईडीने भोसरी जमीन व्यवहारप्रकरणी एकनाथ खडसे यांना नोटीस बजावली. पुढे ईडीने तपास सुरू ठेवला. ईडीने खडसे यांचे जावई चौधरी यांना मंगळवारी चौकशीसाठी बोलावले होते. रात्री उशिरापर्यंत चौधरी यांच्याकडे चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांना अटक केली आहे.

तत्पूर्वी म्हणजे मे २०१८ मध्ये भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणी तत्कालीन भाजपचे नेते एकनाथ खडसे यांना फडणवीस सरकारच्या काळात मोठा दिलासा मिळाला होता. सदर प्रकरणाची चौकशी करणाऱ्या पुणे एसीबीनं क्लीन खडसेंना क्लीन चिट दिली होती. खडसे यांच्याकडून पदाचा गैरवापर झाला नाही आणि त्यामुळे शासनाचं कोणतंही नुकसान झालेले नाही, असं एसीबीनं अहवालात म्हटलं होतं. तो अहवाल एसीबीकडून पुणे कोर्टात सादर करण्यात आला होता. खडसेंविरोधातील कोणताही आरोप सिद्ध झालेला नाही, असंही या अहवालात एसीबीनं नमूद केलं होतं.

पुणे एसीबीने न्यायालयात अंतिम अहवाल सादर केला होता. या अहवालात एकनाथ खडसेंना क्लीन चिट देण्यात आली होती. भोसरीतील भूखंड खरेदी करताना खडसेंनी पदाचा कोणताही गैरवापर केला नाही. शिवाय या भूखंड खरेदीमुळे शासनाचा महसूल बुडाला नाही, असं एसीबीने अहवालात नमूद केलं होतं. त्यामुळे खडसेंसह त्यांची पत्नी मंदाकिनी, जावई गिरीश दयाराम चौधरी यांना मोठा दिलासा मिळाला होता. दरम्यान, याप्रकरणी आम्ही कोर्टात अहवाल सादर केला आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून त्याबद्दल अधिक बोलणार नाही, असं एसीबीचे अधीक्षक संदीप दिवाण यांनी सांगितलं होतं.

भोसरी येथील भूखंड खरेदी प्रकरणी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या पत्नी, जळगाव जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे व जावई गिरीश चौधरी यांच्यावर भोसरी जमीन खरेदी प्रकरणी आरोप करण्यात आले होते. भूखंड खरेदी प्रकरणात दबावतंत्र वापरल्याचा आरोपही एकनाथराव खडसे यांच्यावर झाला होता. आरोपानंतर पक्षाने खडसेंना विचारणा केली आणि त्यानंतर खडसे यांनी राजीनामा दिला. इतक्या वर्षांची पक्षनिष्ठा आणि वरिष्ठांचा हात असल्यावर आपण चौकशीतून सहज बाहेर पडू असा विश्वास खडसेंना होता परंतु सारं काही उलटच घडले. चौकशीसाठी समिती नेमण्यात आली. झोटींग समितीने आपला अहवाल सादर केला.

अहवाल जाहीरपणे मांडण्यात आला नसला तरी खडसेंना त्यात क्लीनचिट मिळाल्याचे सांगण्यात आले. मुळात सर्व प्रकरण शांत झाले असे वाटत असले तरी खडसेंना मात्र मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. भाजप सोडल्यावर ईडीच्या चौकशीचा त्रास होणार याची कल्पना त्यांना अगोदरच होती. राष्ट्रवादीत प्रवेश करताना त्यांनी आपल्या भाषणात याबाबत बोलूनही दाखवले होते. तुम्ही लावली तर मी सीडी लावेल अशी धमकी वजा सूचना खडसेंनी दिली होती. गेले काही महिने सर्व सुरळीत राहिले पण मंगळवारी रात्री खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना मुंबईत ईडीच्या पथकाने ताब्यात घेतले.

दरम्यान, एकीकडे फडणवीसांच्या काळात खडसेंना क्लीनचिट देताना घोटाळा, पदाचा गैरवापर किंवा राज्याच्या महसुलाचं कोणतही नुकसान झाली नाही असं म्हटलं गेलं. विशेष म्हणजे संपूर्ण चौकशीत ते कुठेही पुराव्यानिशी सिद्ध झालं नाही असं म्हटलं गेलं. त्याच विषयाला अनुसरून काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आता उलट दावा करत फडवीसांना कोंडीत पकडले आहे. सावंत यांनी ट्विट करताना म्हटलंय की, “एकनाथ खडसे यांना ACB व झोटींग आयोग चौकशीनंतर फडणवीस सरकारने क्लीन चिट दिली. पण खडसेंनी पक्ष बदलला आणि त्यांची मोदी सरकारने ED चौकशी लावली व त्यांच्या जावयाला अटक केली. वाझेची नियुक्ती कोणी केली याची चौकशी सीबीआय’ला हवी, मग फडणवीस यांची प्रकरण दडपण्यासाठी इडीने चौकशी का करु नये?

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Congress spokesperson Sachin Sawant demanded ED enquiry of Devendra Fadnavis over Bhosari Land clean chit to Eknath Khadse news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या