3 May 2025 1:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

माझ्या माहितीप्रमाणे सामान्य माणसापेक्षा तळीरामांना कोरोना लवकर होतो | मला जनतेचे आशीर्वाद - फडणवीस

Devendra Fadnavis

मुंबई, १९ एप्रिल: देशात आणि राज्यात सध्या कोरोनामुळे सामान्य लोकं धास्तावलेली आहे. कोरोनाचा कहर एवढा वाढला आहे की आरोग्य यंत्रणा देखील अपुरी पडत आहे. त्यात रेमडेसिविर इंजेक्शन्स आणि ऑक्सिजनचा तुटवडा झाल्याने रुग्ण आणि त्यांचेच कुटुंबीय देखील चिंतेत आहेत. त्यात भाजप केंद्राकडे मदत मागायची सोडून राज्य सरकार कसं अडचणीत येईल याचीच आखणी करताना दिसत आहेत. त्यामुळे शिवसेनेचे आमदार देखील संतापल्याचं पाहायला मिळत आहे.

रेमडेसिविरवरून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये झालेला संघर्ष तीव्र झाला असताना शिवसेनेचे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले होते. फडणवीस यांच्यावर टीका करताना गायकवाड यांनी पातळी सोडली होती. ‘तुमच्या सरकारमुळे लाखो लोक मरतील त्याचं काय? ज्याचा घरातला माणूस मरतो, ज्याच्या घरात जीव जातो, त्याला समजतं की कोरोना काय आहे? मला कोरोनाचे जंतू सापडले असते तर मी देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोंबून टाकले असते,’ असं गायकवाड म्हणाले होते.

दरम्यान, संजय गायकवाड यांच्या टीकेचा समाचार घेताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘’संजय गायकवाड यांनी रात्रीची उतरली नसताना पत्रकार परिषद घेतली असावी. मात्र मी त्यांना विनंती करतो की, माझ्या घशात कोरोनाचे किटाणू घालण्याआधी त्यांनी हँडग्लव्हज घालावेत आणि चेहऱ्यावर नीट मास्क लावावा. कारण काय आहे की, मला जनतेचे आशीर्वाद आहेत. त्यामुळे मला काही होणार नाही. मात्र माझ्या माहितीप्रमाणे सामान्य माणसापेक्षा तळीरामांना कोरोना लवकर होतो,’’ असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

 

News English Summary: MLA Sanjay Gaikwad must have held a press conference when he was not up at night. However, I urge them to wear handgloves and a face mask before putting corona germs in my throat. Because what is, I have the blessings of the masses. So nothing will happen to me. But as far as I know, Taliram has a corona sooner than a normal person, “said Devendra Fadnavis.

News English Title: Devendra Fadnavis reply to Shivsena MLA Sanjay Gaikawad over his statement news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या