2 May 2025 12:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

धुळे-नंदुरबार | भाजपचे उमेदवार अमरीश भाई पटेल यांचा ३३२ मतांनी विजय

Dhule and Nandurbar, BJP candidate Amrish Patel, Won with 332 votes

धुळे, ३ डिसेंबर: धुळे आणि नंदुरबार स्थानिक स्वराज संस्थेच्या विधान परिषदेच्या पोट निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे मोठा फरकाने बाजी मारली आहे. भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार अमरीश पटेल यांनी ३३२ मतं घेत एकतर्फी विजय मिळवला आहे. ४३७ पैकी ४३४ मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी ४ मतं बाद झाली तर ३३२ मतं अमरीश पटेल यांनी मिळवत मोठा विजय मिळवला आहे.

महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील यांना फक्त ९८ मतं मिळाली. विशेष म्हणजे संख्याबळाचा विचार करता हि निवडणूक तुल्यबळ ठरली असती, मात्र महाविकास आघाडीने भारतीय जनता पक्षासमोर सपशल शरण पत्करल्याचे चित्र निवडणुकीत दिसून आले. आघाडीच्या उमेदवाराला संख्याबळ असूनही मतांची तीन आकडी संख्या गाठता आली नाही, यावरून किती मोठ्या प्रमाणात आघाडीची मतं भारतीय जनता पक्षाकडे वळली हे स्पष्ट होते.

दरम्यान राज्यात पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आज मतमोजणी सुरु झाली असून सोलापूरमध्ये मतमोजणीसाठी दोन दिवस लागणार असल्याचे सांगितले जात आहे. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी 8 वाजता सुरुवात झाली. विलासनगर येथील शासकीय गोदामात असलेल्या मजमोजणी स्थळी सकाळी सहा वाजता सर्व अधिकारी व कर्मचारी दाखल झाले. सर्वांना पुन्हा त्यांची जबाबदारी समजावून देण्यात आली. त्यानंतर सुरक्षा कक्षाचे सील तोडून मतपेट्या मतमोजणी कक्षात हलविण्यात आल्या.

 

News English Summary: The Bharatiya Janata Party (BJP) has won the Dhule and Nandurbar local body by-elections by a wide margin. Bharatiya Janata Party’s official candidate Amrish Patel has won with 332 votes. Out of 437, 434 voters had cast their votes. Out of which 4 votes were cast, while Amrish Patel got 332 votes and got a big victory.

News English Title: Dhule and Nandurbar BJP candidate Amrish Patel has won with 332 votes news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या