19 April 2024 7:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

आज कुठे २-३ तासांसाठी बाहेर आलात | लगेच स्वतःची तुलना मोदी साहेबांशी करू नका

PM Narendra Modi, Devendra Fadnavis, CM Uddhav Thackeray

सोलापूर, १९ ऑक्टोबर : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत, पुढील २-३ दिवसांत माहिती गोळा करण्याचं काम होईल. त्यानंतर सरकारकडून जे शक्य आहे ते करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिले आहे. विदर्भ पूर, निसर्ग चक्रीवादळ येथेही मदत केली आहे, परतीच्या पावसाचं संकट टळलं नाही, आणखी काही दिवस अतिवृष्टी होऊ शकते असा इशारा हवामान खात्याने दिला आहे, त्यामुळे नुकसान किती होतेय याचा अंदाज आला आहे, सरकार लवकरच मदत करेल अशी ग्वाही उद्धव ठाकरेंनी दिली. सोलापूरमधील नुकसानग्रस्त झालेल्या भागाची पाहणी करताना उद्धव ठाकरेंनी हे आश्वासन दिले.

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी काही शेतकऱ्यांना मदतीचा धनादेश देखील यावेळी दिला. उद्धव ठाकरेंच्या या पाहणी दौऱ्यानंतर शेतकऱ्यांना देखील समाधान वाटल्याचे सोलापूरमधील काही शेतकऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. उद्धव ठाकरेंनी मदतीचं आश्वासन दिलं आहे. तसेच काही शेतकऱ्यांना धनादेश देखील दिला आहे. पाहणीसाठी मुख्यमंत्री आले बरं वाटलं, पण आता लवकरात लवकर गावाचं पुनर्वसन व्हावं, अशी मागणी सोलापूरमधील गावकऱ्यांनी केली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एकाच दिवशी पूरग्रस्त भागांच्या दौऱ्यावर निघाले असताना थेट बांधावरूनच या दोघांत वाकयुद्ध रंगलं आहे. मुख्यमंत्र्यांनी शेलक्या शब्दांत फडणवीसांच्या टीकेला उत्तर दिल्यानंतर पुन्हा एकदा फडणवीसांनी पलटवार केला

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संवेदनशील परिस्थितीत अतिशय थिल्लरपणा करत आहेत’, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिले. ‘इतक्या दिवसांतून आज दोन-तीन तासांसाठी बाहेर आला आहात तर लगेचच स्वतःची तुलना मोदी साहेबांशी करू नका’, असा टोलाही फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. सरकार चालवायला दम लागतो, असे नमूद करताना केंद्राने कोणतेही पैसे थकवले नसून राज्याचा जीएसटी कमी जमा झाल्याने त्याची भरपाई केंद्र सरकार करून देत आहे, असेही फडणवीस म्हणाले.

 

News English Summary: Devendra Fadnavis responded to Chief Minister Uddhav Thackeray’s criticism in such a sensitive situation. “If you have come out for two-three hours today after so many days, don’t immediately compare yourself with Modi,” Fadnavis told the Chief Minister. Fadnavis also said that the Center is not wasting any money and the state government is compensating for the low GST collection.

News English Title: Do not compare yourself with PM Narendra Modi said Devendra Fadnavis to CM Uddhav Thackeray News updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x