13 December 2024 12:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

माझ्या प्रयत्नाने का होईना कुणाची तहान भागत असेल तर ते पुण्यही महत्वाचं - मुख्यमंत्री

Aurangabad, development work, CM Uddhav Thackeray

औरंगाबाद, १२ डिसेंबर: मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे (Chief Minister Uddhav Thackeray) आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत (Aurangabad Water Supply Scheme). यादरम्यान त्यांनी औरंगाबादचं प्रत्येक घर बदलणारवाऱ्या ‘पाणी पुरवठा योजनेचं उद्घाटन केलं. गरवारे स्टेडियम वरील भव्य शामियान्यात हा उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. या योजनेअंतर्गत औरंगाबादकरांना 24 तास पाणी उपलब्ध होणार आहे. या योजनेने औरंगाबादेतील प्रत्येक घरात पुरेसं पाणी पोहोचेल असं आश्वासन देण्यात आलं आहे. या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अनेक विषयांवर भाष्य केले.

“निवडणुका आल्या म्हणून मी विकास कामे करायला आलो नाही. कोविडमुळे ही कामे रखडली होती. आता थोडा प्रार्दुभाव कमी झाला आहे. त्यामुळे आता कामं वेगानं होतील. महामार्गांचं काम पूर्ण झालं तर औरंगाबादचा विकास अधिक वेगाने होईल”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. “औरंगाबादमधील पाणी पुरवठा योजना रखडली होती. कुणामुळे रखडली होती हे माहीत नाही. पण माझ्या प्रयत्नाने का होईना कुणाची तहान भागत असेल तर ते पुण्यही महत्वाचं आहे”, असंही ते पुढे म्हणाले.

पाणी पुरवठा योजनेवर भारतीय जनता पक्षाचा आक्षेप:
या योजनेवर भारतीय जनता पार्टीने आक्षेप घेतला आहे. 1680 कोटीतले 630 कोटी रुपये औरंगाबाद महापालिका भरु शकणार नाही. त्यामुळे ही योजना पूर्णत्त्वाला जाऊ शकणार नाही, अशी भीती भाजपने व्यक्त केली आहे. महापालिकेच्या वाट्याचे 630 कोटी राज्य सरकारने भरावेत अशी मागणी भाजपने केली आहे.

औरंगाबाद महापालिका निवडणुकांच्या तोंडावर उद्धव ठाकरे जम्बो कामाचं उद्घाटन करत आहेत. त्यामुळे शिवसेना महापालिका निवडणुकांची रंगीत तालीम सुरु करत अल्यासाची चर्चा सध्या रंगू लागली आहे.

 

News English Summary: Chief Minister Uddhav Thackeray is visiting Aurangabad today (Aurangabad Water Supply Scheme). Meanwhile, he inaugurated a water supply scheme that will replace every house in Aurangabad. The inaugural function was held in a grand pavilion at Garware Stadium. Under this scheme, water will be available to Aurangabad residents 24 hours a day. The scheme promises to provide adequate water to every household in Aurangabad.

News English Title: Aurangabad development work says CM Uddhav Thackeray news updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x