1 May 2025 7:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

वंचित बहुजन आघाडीच्या चिन्हासमोरील बटन दाबलं तरी मत भाजपला - प्रकाश आंबेडकरांचा आरोप

BVP, vanchit bahujan aaghadi, prakash ambedkar, bjp, narendra modi, bjp maharashtra, sushil kumar shinde, congress

सोलापूर: सध्या महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यातील १० लोकसभा मतदारसंघांसाठी मतदार प्रक्रिया सुरु आहे. याच निवडणूक प्रक्रिये दरम्यान महाराष्ट्रात कित्तेक ठिकाणी ई.व्ही.एम. मध्ये बिघाड झाल्याने सकाळी 9 वाजेपर्यंत केवळ 0.85 टक्केच मतदान नोंदवण्यात आले. दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा मतदार संघांमध्ये सोलापूरचा देखील समावेश आहे.

सोलापूरमध्ये काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे व भाजपाचे डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य आणि वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर अशी तिहेरी लढत आहे. राज्यात दुसऱ्या टप्प्यात ई.व्ही.एम. मध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी समोर येत असतानाच आता सोलापूरमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर आणि त्यांचा मुलगा सुजात आंबेडकर यांनी गंभीर आरोप केले आहेत.

सोलापूरमधील एका मतदान केंद्रावर ई.व्ही.एम. मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या चिन्हासमोरील बटण दाबले तरी कमळालाच म्हणजे (भाजपाला) मत जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. या आरोपानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ई.व्ही.एम. सील करुन नवीन यंत्र दिल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

प्रकाश आंबेडकर यांचा मुलगा सुजात आंबेडकर यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत ते म्हणाले सोलापूरमधील एका मतदान केंद्रावर वंचित बहुजन आघाडीच्या चिन्हासमोरील बटण दाबले तरी भाजपालाच मत जात आहे. तर प्रकाश आंबेडकर यांनी देखील अशी घटना घडल्याचे सांगत हा प्रकार लक्षात आल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी मशीन सील करुन नवीन यंत्र पाठवल्याचे स्पष्ट केले.

परंतु सोलापूरमधील जिल्हाधिकाऱ्यांनी अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे सांगत प्रकाश आंबेडकर यांचे आरोप निराधार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या