2 May 2025 9:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

महाविकास आघाडीत मतभेद; काँग्रेसचे नेते दोन दिवसांत उद्धव ठाकरेंना भेटणार

cabinet minister Ashok Chavan, Mahavikas Aghadi, Balasaheb Thorat

मुंबई, १४ जून: निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे आज शनिवारी एक दिवसाच्या कोकण दौऱ्यावर जात आहेत. सकाळी ८.३० वाजता महसूलमंत्री हे शासकीय निवासस्थान रॉयलस्टोन येथून मोटारीने निघून ९.०० वाजता भाऊचा धक्का येथे पोहोचतील त्यानंतर रोरो बोटीने मांडवा जेट्टी येथे जातील तेथून मोटारीने अलिबाग तालुक्यातील नागांव व चौल गावाला भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करतील त्यानंतर काशीद व नंतर मुरुड येथे भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतील.

दरम्यान, याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकण दौरा केला होता. त्यानंतर शरद पवार यांनी दोन दिवस कोकणचा दौरा केला. पवारानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही दौरा करत राज्य सरकावर टीका केली. राज्याची प्रत्यक्षात मदत वादळग्रस्तांपर्यंत पोहोचली नसल्याचा आरोप केला आहे. आता काँग्रेसचे मंत्री थोरात कोकण दौऱ्यावर जात आहेत.

विधान परिषदेच्या ९ जागांवरून काँग्रेस नाराज झाला होता. तिसरा उमेदवार देण्यासाठी काँग्रेसचे नेते आग्रही होते. ९ जागांसाठी ही निवड़णूक होणार होती. मात्र, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर कायम राहण्यासाठी ही निवडणूक महत्वाची होती. यामुळे काँग्रेसची मनधरणी करण्यात आल्याने त्यांच्या उमेदवाराने माघार घेतली होती. यामुळे निवडणूक बिनविरोध झाली होती. आता पुन्हा राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या जागावरून काँग्रेसमध्ये नाराजी पसरली आहे.

विधान परिषदेच्या १२ जागांचे आणि महामंडळांच्या नियुक्त्या समान करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. यासाठी गेल्या गुरुवारी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली होती. आज काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री राज्याचे कॅबिनेट मंत्री अशोक चव्हान यानी महाविकास आघाडीमध्ये काही मुद्द्यांवरून मतभेद असल्याचे मान्य केले आहे. ”महाविकास आघाडीमध्ये काही मतभेद असून आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी प्रयत्नशील आहोत. त्यांच्याशी यावर चर्चा करण्यात येणार आहे. पुढील दोन दिवसांत त्यांची भेट होण्याची शक्यता आहे, असे अशोक चव्हान यांनी सांगितले.

 

News English Summary: The Congress has demanded equalization of 12 seats in the Legislative Council and appointments to corporations. For this, a meeting of Congress leaders was held last Thursday. Today, former Congress chief minister and state cabinet minister Ashok Chavan has admitted that there are differences in the Mahavikas Aghadi on some issues.

News English Title: Former Congress chief minister and state cabinet minister Ashok Chavan has admitted that there are differences in the Mahavikas Aghadi on some issues News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या