20 June 2021 3:30 PM
अँप डाउनलोड

मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारच कायदा करू शकतं | भाजप खासदारांनी पुढाकार घ्यावा अन्यथा त्यांना ठोकणार - हर्षवर्धन जाधव

Maratha reservation

औरंगाबाद, ०७ मे | सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्याचा निर्णय दिला. यानंतर राज्य सरकारवर विरोधी पक्षाने टीकेची तोफ डागली. तसेच, मराठा समाजही मोठ्या प्रमाणात आक्रमक झाला. मराठा समाजातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. यावरुनच माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी भारतीय जनता पक्षाला इशारा दिला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा अन्यथा त्यांना ठोकणार असा रोखठोक इशारा माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दिला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जेव्हा मराठा समाजाला आरक्षण मिळालं, त्यावेळीचं हे आरक्षण टिकणार नसल्याचं मी म्हणालो होतो. त्यामुळे आता जर मराठा समाजाला आरक्षण हवे असेल तर, त्यासाठी केंद्र सरकारलाच कायदा करावे लागणार आहे. त्यामुळे भाजपच्या खासदारांनी केंद्राकडे यासाठी मागणी करावी, अन्यथा त्यांना हे महागात पडेल असही जाधव म्हणाले आहेत.

दुसरीकडे मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा आलेला निकाल धक्कादायक आहे. पण मराठा समाजाला आरक्षण देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असं सांगतानाच वेळ आल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षीय शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊ, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.

 

News English Summary: The Supreme Court ruled to cancel the Maratha reservation. Opposition groups called for a boycott of the assembly. Also, the Maratha community became very aggressive. There is an angry reaction from the Maratha community. This is why former MLA Harshvardhan Jadhav has warned the Bharatiya Janata Party.

News English Title: Former MLA Harshvardhan Jadhav warned BJP MPs over Maratha reservation news updates.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(186)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x