27 April 2024 7:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

VIDEO | लसीकरणासाठी गर्दी-धक्काबुक्की, सोशल डिस्टन्सिगचे पालन न केल्याने पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज

Vaccination

बीड, २९ एप्रिल | कालच्या २४ तासांत ३ लाख ६० हजार ९६० नवे करोना रुग्ण आढळले असून यासोबत देशातील करोना रुग्णसंख्या १ कोटी ७९ लाख ९७ हजार २६७ इतकी झाली आहे. तर दुसरीकडे ३२९३ रुग्णांच्या मृत्यूमुळे आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २ लाख १ हजार १८७ वर पोहोचली आहे. दरम्यान देशात गेल्या २४ तासात २ लाख ६१ हजार १६२ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आतापर्यंत १ कोटी ४८ लाख १७ हजार ३७१ जणांनी करोनावर मात केली आहे. मात्र देशात कोरोना वेगाने पसरतोय आणि देशाची चिंता वाढताना दिसतेय.

दरम्यान, राज्यात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. उस्मानाबादेत देखील कोरोनाची प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. बीड जिल्ह्यात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. त्यामुळे झपाट्याने वाढत असलेल्या कोरोनापासून आपला बचाव व्हावा यासाठी नागरिक लसीकरणानवर भर देत आहेत. नागरिक लस घेण्यासाठी धावपळ करू लागल्याचे चित्र बीड जिल्ह्यात आहे.

मात्र लसीचा तुटवडा असल्याने आज जिल्ह्यात केवळ तीन ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु होते. अन्य १२७ लसीकरण केंद्र लसी अभावी बंद होती. त्यामुळे बीड येथील येळंब घाट येथील लसीकरण केंद्रावर नागरिकाची गर्दी मोठ्या प्रमाणात पहायला मिळाली. गर्दी कमी करण्यासाठी आणि सोशल डिस्टन्सिगचे पालन करता यावे यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला असल्याचे पहायला मिळाले आहे. पोलिसांनी लाठीचार्ज करताच नागरिक पळू लागल्याच देखील पहायला मिळाले.

 

News English Summary: Due to shortage of vaccines, vaccination centers are started in only three places in the district today. Another 127 immunization centers were closed due to lack of vaccines. Due to this, a large crowd was seen at the vaccination center at Yelamb Ghat in Beed. Police have been found to have used mild caning to reduce crowds and enforce social distance. Citizens were seen fleeing as soon as the police charged the baton.

News English Title: Huge crowds for vaccinations at Beed news updates.

हॅशटॅग्स

#Vaccination(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x