20 May 2022 10:22 AM
अँप डाउनलोड

राम शिंदे यांचा धनगर समाजाच्या आरक्षाबाबत खुलासा

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ च्या निवडणुकीपूर्वी धनगर समाजाला आरक्षण देण्याची ग्वाही दिली होती. ती आज पर्यंत पूर्ण झाली नसली तरी २०१९च्या निवडणुकीपूर्वी ती मागणी पूर्ण होईल अशी पुन्हां राम शिंदे यांनी ग्वाही दिली आहे.

धनगर समाजाला दिलेलं आरक्षणाचं आश्वासन पूर्ण होण्यास थोडा उशीर झाला आहे असं ही राम शिंदे म्हणाले. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता येऊन सुद्धा अद्याप धनगर समाजाला आरक्षण मिळत नसल्याने समाजात भाजप विरुद्ध नाराजी पसरत आहे हे मान्य करून पक्षाला घरचा आहेर दिला आहे. परंतु २०१९ च्या निवडणुकीपूर्वी ती ग्वाही पूर्ण केली जाईल असा आशावाद सुद्धा राम शिंदे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

पुण्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त निमित्त कार्यकर्त्यांची बैठक राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका मांडली. महाराष्ट्र शासनाने ‘बार्टी’ या संस्थेला धनगर आरक्षणाबाबत संशोधनाचे काम सोपविले आहे अशी माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. परंतु त्यांच्या अहवालानुसार धनगर समाजाला आरक्षण देणे शक्य नसल्याचे नमूद करण्यात आले होते.

त्यानंतर राज्य शासनाने ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’ या संस्थेकडे धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत नवा संशोधन अहवाल देण्याची जवाबदारी सोपविली आहे असं ते म्हणाले. ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’ कडून मिळणार अहवाल सकारात्मक असेल अशी अशा त्यांनी बोलताना व्यक्त केली. तसेच सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची मागणी होत, त्यासाठी लवकरच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे राम शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(688)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x