30 April 2025 5:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

संदीप देशपांडे यांची मुख्यमंत्री आणि संजय राऊतांवर बोचरी टीका... काय म्हणाले

MNS Sandeep Deshpande

मुंबई, १९ मे | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे हे कायम ठाकरे सरकारवर टीका करत असतातच. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही काम टीका करताना संदीप देशपांडे दिसतात. आता पुन्हा एकदा देशपांडेंनी राऊतांवर टीका केली आहे. आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

शिवसेना संजय राऊत म्हणजे सेक्रेड गेम्स या वेबसिरीजमधील तिवारीच्या पात्राप्रमाणे आहेत. त्यांना ‘अहं ब्रह्मास्मि’चा भास होतो, ते त्याच थाटात वावरत असतात, असा टोला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी लगावला. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निदान मुंबईत तरी पाहणी करण्यासाठी बाहेर पडावे, अशी टीकाही देशपांडे यांनी केली.

यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींच्या गुजरात दौऱ्यावर खोचक टिप्पणी करणाऱ्या शिवसेनेचा समाचार घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांचे स्वत:च्या राज्यावर प्रेमही आहे. पण आमचे मुख्यमंत्री मुंबईत राहूनही घराबाहेर पडत नाहीत, असा टोला संदीप देशपांडे यांनी लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तौक्ते चक्रीवादळाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्रातही यावे. म्हणजे ते भारताचे पंतप्रधान आहेत, असे वाटेल.

 

News English Summary: Maharashtra Navnirman Sena general secretary Sandeep Deshpande is always criticizing the Thackeray government. Sandeep Deshpande is also seen criticizing Shiv Sena MP Sanjay Raut. Now, once again, Deshpande has criticized Raut. He spoke to the media at a press conference in Mumbai today.

News English Title: MNS general secretary Sandeep Deshpande criticized CM Uddhav Thackeray and Sanjay Raut news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#SandeepDeshpande(21)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या