19 July 2019 9:41 AM
अँप डाउनलोड

पालघर मनसेकडून हाथगाड़ी खेचक कामगारांना छोटी भेट देऊन कामगार दीन साजरा

पालघर मनसेकडून हाथगाड़ी खेचक कामगारांना छोटी भेट देऊन कामगार दीन साजरा

पालघर : आज महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिन सर्वत्र साजरा केला जात असताना पालघर मनसेकडून देखील कामगार दिन अनोख्याप्रकारे साजरा करण्यात आला. राज्यभरात आज मोठ्या प्रमाणावर एक असा कामगार आहे जो रोज उन्हा तान्हात दिवसभर राबत असतो. मात्र समाजाच्या मूळ प्रवाहापासून नेहमीच दुर्लक्षित राहतो. मात्र अशाच दुर्लक्षित असलेल्या कामगार वर्गासोबत पालघर मनसेने अनोख्याप्रकारे कामगार दिन साजरा केला आहे.

पालघर जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर्फे रोज दिवसभर स्वतःच्या मेहनतीने आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवणाऱ्या मेहनती आणि कष्टाळू हाथगाड़ी खेचक कामगारांचा नॅपकिन, पेय जल बॉटल आणि त्यासोबत ठंड पेय देऊन त्यांच्यासोबत कामगार दिन साजरा केला आणि त्यांच्या मेहनतीचा सन्मान केला. त्यामुळे पालघरमधील स्थानिक लोकांनी या उपक्रमाचं कौतुक केलं आहे.

अनुरूप मराठी वधू - वर मोफत ऑनलाईन नोंदणी

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(348)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या