मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. पहिल्या यादीत एकूण २७ उमेदवार आहेत असून अनेक नवोदितांना सुवर्ण साधी मिळावी आहे. त्यात माहीम मतदारसंघातून माजी आमदार नितीन सरदेसाई यांच्या ऐवजी संदीप देशपांडे यांना संधी देण्यात आली आहे.

दरम्यान यामध्ये कसाब मतदारसंघातून अजय शिंदे यांना संधी देण्यात आली आहे. कालच राज ठाकरे यांचा एकूण कल पाहता मनसे विधानसभा निवडणुकीत पूर्ण शक्तीनिशी उतरणार असल्याचे संकेत मिळाले होते. त्यानुसार आज उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. नितीन भोसले आणि प्रकाश भोईर या माजी आमदारांना देखील पुन्हा संधी देण्यात आली असून अनेक नगरसेवकांना आमदार बनण्याची संधी चालून आली आहे. त्यात अशोक मूर्तडक, वसंत मोरे आणि संजय तुर्डे यांची नावं आहेत.

लवकरच दुसरी यादी देखील जाहीर करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे, कारण उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ४ ऑक्टोबर आहे आणि ५ ऑक्टोबर रोजी अर्जाची छाननी प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर ५ तारखेपासून राज ठाकरे यांच्या सभांचा धडाका लागणार आहे.

 

मनसे उमेदवारांची पहिली यादी जाहीर