26 April 2024 9:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Old Vs New Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीतून नव्या टॅक्स प्रणालीकडे कोणी जावे? डिक्लेरेशन पूर्वीच समजून घ्या Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा
x

वडाळा: भाजपाची कालिदास कोलंबकरांना उमेदवारी; सेनेच्या श्रद्धा जाधव बंडखोरीच्या तयारीत

Kalidas Kolambkar, Sharadha Jadhav, BJP Mumbai, Shivsena

मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आज आपल्या १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर, दक्षिण कराडमधून अतुल भोसले यांना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात उतरवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, तब्बल १२ विद्यमान आमदारांचा पत्ता कापण्यात आला आहे.

निवडणूक आयोगाने विधानसभेच्या तारखा जाहीर केल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसने रविवारी ५१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यामुळे आता भारतीय जनता पक्ष कोणत्या उमेदवारांना रिंगणात उतरवणार याची चर्चा सुरू झाली आहे. भारतीय जनता पक्षाने ९० टक्के उमेदवारांची नावं निश्चित केली असल्याची माहिती आहे. दरम्यान ब्राह्मण समाजाचा तीव्र विरोध असताना देखील चंद्रकांत पाटलांना कोथरूड येथून उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे महिलांबाबत अत्यंत संतापजनक वक्तव्य करणारे घाटकोपरचे आमदार राम कदम याना पुन्हा तिकीट दिल्याने समाज माध्यमांवर संताप व्यक्त करण्यात येतो आहे.

दरम्यान, वडाळा मतदारसंघातून नुकतेच काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले कालिदास कोळंबकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेनेच्या माजी महापौर श्रद्धा जाधव बंडखोरीच्या तयारीत असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. वडाळा विधानसभा मतदारसंघ भाजपाच्या वाट्याला जात असल्याने माजी महापौर श्रद्धा जाधव नाराज आहेत. आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी श्रद्धा जाधव यांनी खासदार राहुल शेवाळेंसह मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट देखील घेतली होती. वडाळा विधानसभा शिवसेनेच्या वाट्याला न आल्यास श्रद्धा जाधव बंडाच्या तयारीत होत्या आणि त्यासाठीच त्यांनी मातोश्रीवर फेऱ्या मारल्या होत्या.

 

 

 

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x