2 May 2025 7:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

हे काय? चक्क कट्टर हिंदुत्ववादी व एमआयएम एकाच खोलीत, स्क्रिप्ट देताना?

Devendra Fadanvis, Tulsi Joshi, Raj Thackeray

औरंगाबाद : सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभर सभा घेत भाजप, नरेंद्र मोदी आणि अमित शहांविरोधात जोरदार प्रचार सुरु केला आहे. संपूर्ण प्रचारात व्हिडिओ पुराव्यानिशी नरेंद्र मोदी आणि अमित शहांची पोलखोल होत असल्याने भाजपचे नेते देखील राज ठाकरे यांना वेगवेगळ्या मार्गाने लक्ष करत आहेत. त्यात राज ठाकरे हे बारामतीच्या काकांच्या सांगण्यावरून सर्वकाही करत आहेत आणि त्यांची स्क्रिप्ट बारामतीवरून येते असा खोचक टोला देखील लगावला आहे.

दरम्यान, नुकतीच सोलापूर येथे राज ठाकरेंची जाहीर सभा पार पडली. त्यानंतर लोकसभेच्या प्रचारासाठी पश्चिम महाराष्ट्रातील उमेदवारांच्या प्रचारासाठी आलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार योगायोगाने ज्या हॉटेलमध्ये वास्तव्यास होते, त्याच हॉटेलमध्ये राज ठाकरे वास्तव्यास असल्याने भाजपच्या हाती आयतं कारण मिळालं. वास्तविक सोलापूर शहर हे काही मट्रो शहर नसल्याने मोजकीच तारांकित हॉटेल्स उपलब्ध असतात आणि लोकसभा सुरु असल्याने अनेक पक्षाचे नेते मंडळी एकाच ठिकाणी प्रचाराच्या निमित्ताने वास्तव्यास असल्याने दिसत आहे. परंतु राज्य भाजपने लगेच ट्विट करत त्याचे भांडवल केल्याचे पाहायला मिळाले.

परंतु मनसेचे पालघरचे महाराष्ट्र सैनिक तुसली जोशी यांनी एक फेसबुक पोस्ट टाकून भाजपाला टोला लगावला आहे. भाजपने सध्या प्रचारात कट्टर हिंदुत्ववाद बाहेर काढला असून अल्पसंख्यांक समाज त्याच्या रडार असल्याचे दिसते. परंतु नेमका त्याच विषयाचा धागा पकडून तुलसी जोशी यांनी देवेंद्र फाडावीशी यांचा एमआयएम’चे आमदार वारीस पठाण आणि इम्तियाज जलील यांच्या बरोबरच्या गुफ्तगुचा फोटो शेअर करत भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

महाराष्ट्र भाजपने काय ट्विट केलं आहे?

काय म्हटलं आहे तुलसी जोशी यांनी त्यांच्या ट्विट’मध्ये?

 

Web Title: MNS party worker Tulsi Joshi from Palghar answer to BJP and Fadanvis over Meet with MIM MLAs.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या