5 February 2023 11:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PURE EV ecoDryft Bike | प्योर ईवी इकोड्रायफ्ट इलेक्ट्रिक बाइक, फुल चार्ज 135 किमी रेंज, कीमत आणि फीचर्स पहा My EPF Money | नोकरदारांनो! ईपीएफओचे नियम बदलले, पैसे काढण्यापूर्वी पहा किती टॅक्स आकारला जाणार Ration Card Updates | रेशनकार्डमध्ये नव्या सदस्याचे नाव जोडायचयं, महत्वाची अपडेट, आत्ताच ही काळजी घ्या LIC Share Price | हिंडेनबर्गमुळे अदानी ग्रुप हादरला, एलआयसी शेअर्सला सुद्धा मोठा फटका बसणार? तुमचे पैसे बुडणार? Gold ETF Investment | गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक, मिळतील अनेक फायदे आणि वेगाने संपत्ती वाढेल Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे दर जबरदस्त कोसळले, रविवारी खरेदीपूर्वी तुमच्या शहरातील आजचे नवे दर पहा My Salary Slip | पगारदार व्यक्ती आहात? तुमच्या पगाराच्या स्लिपमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश असतो माहिती आहे? लक्षात ठेवा
x

यशोमती ठाकूर यांच्या बोलण्याचा विपर्यास केला जातोय | अजित पवारांवरील आरोपांवर सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण

MP Supriya Sule

मुंबई, २२ ऑगस्ट | राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. दरम्यान, अजित पवार यांच्याकडून आम्हाला साथ दिली जात नसल्याचा ठपका यशोमती ठाकूर यांनी यावेळी ठेवला होता. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्या आणि लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांनी या आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहेत. अजित पवार सहकार्य करत नाही असे जरी बालविकास मत्र्यांनी म्हटले असले तरी त्यांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढू नये असे आवाहन सुळे यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे.

यशोमती ठाकूर यांच्या बोलण्याचा विपर्यास केला जातोय, अजित पवारांवरील आरोपांवर सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण (MP Supriya Sule explanation on allegations by Yashomati Thakur) :

यशोमती ठाकूर यांच्या बोलण्याचा विपर्यास केला जातोय:
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, राज्याच्या बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलेल्या भाषणाचा विपर्यास केला जातोय. जर यशोमती ठाकुर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे काही मागणी केली असेल तर ते यावर विचार करतील. राज्य सरकार याप्रती संवदेनशील असल्याने हा विषय लवकर हाताळला जाईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यशोमती ठाकूर काय म्हणाल्या होत्या? (MP Supriya Sule explanation on allegations by Yashomati Thakur)

राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर कार्यक्रमादरम्यान राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले होते. बालसंगोपन निधी अनुदानात वाढ करण्याच्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री अजित पवार साथ देत नसल्याचं त्यांनी म्हटलं होत. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालूक्यात आयोजित अन्यायग्रस्त शेतकरी संवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाला राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरातदेखील उपस्थित होते. दरम्यान, यशोमती ठाकुर यांनी बाळासाहेब थोरात यांच्याकडे तक्रार करत हे आरोप केले होते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: MP Supriya Sule explanation on allegations by Yashomati Thakur news updates.

हॅशटॅग्स

#SupriyaSule(32)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x