19 July 2019 9:41 AM
अँप डाउनलोड

५ वर्ष पिकविमा कंपन्यांची कार्यालये मुंबईत, शिवसेनेला फसवणूक-लूट विधानसभा आल्यावर दिसली

५ वर्ष पिकविमा कंपन्यांची कार्यालये मुंबईत, शिवसेनेला फसवणूक-लूट विधानसभा आल्यावर दिसली

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काल औरंगाबाद आणि नाशिकच्या दुष्काळी दौऱ्यावर होते. दरम्यान शनिवारी औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेनेकडून पीकविमा निवारण केंद्राची उभारणी करण्यात आली. यावेळी आयोजित छोटेखानी सभेत शेतकऱ्यांना नडाल तर तुमची मुंबईतील कार्यालये बंद करू, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी पीक विमा कंपन्यांना दिला होता.

यावर विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते आणि एनसीपीचे नेते धनंजय मुंडे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ट्वीट करत त्यांनी “गेल्या ५ वर्षांपासून पिकविमा कंपन्यांचे कार्यालये मुंबईत आहेत, तेव्हापासून शेतकऱ्यांची या कंपन्या फसवणूक, लूट करत आहेत. परंतु शिवसेनेला केवळ निवडणुकीच्या तोंडावरच कार्यालये बंद करण्याचे सुचते का? उद्धवजी आम्हा शेतकऱ्यांना इतकही भोळं समजू नका”अस विधान केले आहे. दरम्यान, काल औरंगाबाद जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर आज उद्धव ठाकरे अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज ते जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

नेमकं काय ट्विट केलं आहे धनंजय मुंडे यांनी?

मराठी विवाह II अनुरूप मराठी वधू - वर मोफत ऑनलाईन नोंदणी

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या