महत्वाच्या बातम्या
-
महाविकास आघाडी सरकार पडणारा अजून जन्माला यायचा आहे | हे येरा गबाळ्याचे काम नाही - उपमुख्यमंत्री
राज्यात एकीकडे कोरोनाची स्थिती गंभीर होत चालली असताना दुसरीकडे मात्र पंढरपूर मंगळवेढा निवडणूकीचा धुरळा उडाला आहे. १७ एप्रिलला पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूक पार पडणार असून राष्ट्रवादी आणि भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. या पंढरपूर पोटनिवडणुकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. राज्यातील आघाडी सरकार पाडणारा अजून जन्माला यायचा आहे. सरकार पाडणे कोणा येरा गबाळ्याचे काम नाही, अशा शब्दांत अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पहिल्यांदाच थेट निशाणा साधला आहे.
4 वर्षांपूर्वी -
.. तरीही गर्दी झाल्यास अत्यावश्यक सेवाही बंद करा, मुख्यमंत्र्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यात कठोर निर्बंध लागू झाल्यानंतर देखील लोकल ट्रेनमधल्या गर्दीमध्ये फारसा फरक दिसून येत नाही. स्थानकात प्रवेशासाठी कोणतेही निर्बंध लावले गेलेले नाहीत. आधीच्या लॉकडाऊन प्रमाणे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर बॅरिकेटिंग दिसून आली नाही. तिकीट खिडक्यांवर देखील सर्वांना टिकीट दिली जात आहे. तसेच आरपीएफ आणि जीआरपी देखील प्रवाशांचे आय कार्ड किंवा क्यू आर कोड तपासताना आढळून आले नाहीत. याचे कारण म्हणजे राज्य सरकारकडून रेल्वेला कोणत्याही प्रकारचे आदेश अजूनही प्राप्त झालेले नाहीत.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती | डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बी.ए, बीएस्सी व बीकॉमसह अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या परीक्षा २ मे पर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. तसेच इतर अभ्यासक्रमाची परीक्षाही २७ एप्रिलऐवजी ५ मे पासून सुरू होणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
सुप्रिया सुळेंनी ‘ब्रीच कॅंडी’च्या गेटवरुन पंढरपूरची सभा गाजवली
एकीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सध्या मुंबईच्या ब्रीच कॅंडी रुग्णालयात एडमिट आहेत. २ दिवसांपूर्वी त्यांच्यासह शस्त्रक्रिया झाल्याने सध्या ते रुग्णालयात आहेत. तर दुसरीकडे.पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक तोंडावर आली आहे. आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या रिक्त जागी त्यांच्या मुलाला म्हणजे भगीरथ भालके यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपशासित राज्यांमध्येही कोरोनाचे संकट भीषण | रोहित पवारांनी झापलं
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 15 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केलीय. यावेळी मुख्यमंत्र्यांनी हातावर पोट असलेले मजूर आणि छोट्या व्यवसायिकांसाठी आर्थिक पॅकेज देऊ केलंय. परंतु, हे पॅकेज म्हणजे तोंडाला पानं पुसण्याचं काम असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलीय.
4 वर्षांपूर्वी -
भाजपाची भूमिका भगीरथ भालकेंच्या विरोधात नाही तर महाविकासआघाडी सरकार विरोधात - पडळकर
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत प्रचार शेवटच्या टप्यात आहे आणि त्यामुळे दोन्ही बाजूने जोरदार टीका होऊ लागली आहे. आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारवर जोरदार आणि खालच्या भाषेत टीका केली. राज्यातील राष्ट्रवादीचे नेते बाजारबुणगे आहेत. आघाडी सरकार पांढऱ्या पायाचे असून बलात्कारी आहे, असा घणाघाती हल्लाच पडळकर आणि दरेकरांनी आज केला.
4 वर्षांपूर्वी -
Alert | रेमडेसिविर जीव वाचवणारं औषध नाही | फार फार तर काय होईल? - टास्क प्रमुखांची माहिती
राज्यात करोनाबाधितांची संख्या अत्यंत झपाट्याने वाढत आहे. दररोज मोठ्या संख्येने करोनाबाधिता आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूच्या संख्येतही भर पडतच आहे. आज तर करोनाबाधितांच्या संख्येने आजपर्यंतचा उच्चांक गाठल्याचं दिसून आलं. दिवसभरात राज्यात तब्बल ६० हजार २१२ करोनाबाधित वाढले असून, २८१ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर १.६६ टक्के एवढा आहे.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र लॉकडाऊन | मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणा फसव्या आहेत - चंद्रकांत पाटील
राज्यात पंधरा दिवसांच्या संचारबंदीच्या नावाखाली प्रत्यक्षात लॉकडाऊन लागू करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गरीब गरजू वर्गाला मदत केल्याचा आव आणला असला तरी प्रत्यक्षात अत्यंत तुटपुंजी तरतूद करून जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत, अशी तीव्र प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली.
4 वर्षांपूर्वी -
राज्य आणि लोकं संकटात | राज ठाकरेंच्या पंतप्रधानकडे मागण्या | भाजप टीका करण्यात व्यस्त
राज्यात वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या आणि लसीचा होत असलेला तुटवडा यामुळे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रं लिहिलं आहे. यात त्यांनी राज्याला स्वतंत्रपणे लस खरेदी करू देण्याच्या मागणीसह पाच मागण्या केल्या आहेत. राज्याच्या संकट काळात एकीकडे राज ठाकरे काय करता येईल आणि काय करायला पाहिजे यावर केंद्रित झालेले असताना भाजप नेते अवास्तव मागण्या करून केवळ टीका आणि राजकारण करण्यात व्यस्त असल्याचं पाहायला मिळालं आहे.
4 वर्षांपूर्वी -
जिवंत असलेल्यांना इस्पितळं नाहीत अन मृतांना स्मशान | आणि पंतप्रधान भाषणं देत आहेत
देशात कोरोनाचा वेग सलग वाढवणारा आहे. सोमवारी 1 लाख 60 हजार 694 नवीन रुग्ण आढळले. 96,727 बरे झाले आणि 880 जणांचा मृत्यू झाला. हा सलग दुसरा दिवस होता जेव्हा नवीन रुग्ण 1 लाख 60 हजारांपेक्षा जास्त आढळले. रविवारी 1 लाख 59 हजार 914 रुग्णांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र लॉकडाऊन | दुर्बल घटकांच्या मदतीसाठी ५ हजार ४७६ कोटींचे पॅकेज
देशभरात कोरोना संसर्ग वेगाने वाढतोय. वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे अनेक ठिकाणी लॉकडाऊनची परिस्थिती तयार झालीय. महाराष्ट्रातही तिच परिस्थिती आहे. महाराष्ट्रात जवळपास लॉकडाऊन लागणार हे निश्चित झालंय. त्यामुळे संपूर्ण देशाचं महाराष्ट्राकडे लक्ष आहे. विशेष म्हणजे देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या आर्थिक गणितांवरही याचा मोठा परिणाम होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याआधीच राज्यात विकेंड लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यूचा निर्णय घेतलेला आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्य लॉकडाऊन | सरकारकडून सर्व दुर्बल व गरीब घटकांना निर्बंध काळात 'आर्थिक' दिलासा
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात १ मे पर्यंत कठोर निर्बंध लागू केले. यानुसार बुधवार, १४ एप्रिल रोजी रात्री 8 वाजेपासून १ मे २०२१ सकाळी ७ वाजेपर्यंत १४४ कलमांन्वये संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे विनाकारण सार्वजनिक ठिकाणी जाण्यासाठी कोणास परवानगी असणार नाही.
4 वर्षांपूर्वी -
राज्यात 1 मेपर्यंत कडक निर्बंध लागू | संचारबंदीत काय सुरू आणि काय बंद?
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात १ मे पर्यंत कठोर निर्बंध लागू केले. यानुसार बुधवार, १४ एप्रिल रोजी रात्री 8 वाजेपासून १ मे २०२१ सकाळी ७ वाजेपर्यंत १४४ कलमांन्वये संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे विनाकारण सार्वजनिक ठिकाणी जाण्यासाठी कोणास परवानगी असणार नाही. सर्व काही आस्थापने, सार्वजनिक स्थाने, उपक्रम, सेवा बंद राहतील. कोविड नियमांचे उल्लंघन केल्यास व्यक्तीस १ हजार आणि आस्थापनांना १० हजार दंड करण्यात येईल.
4 वर्षांपूर्वी -
'करेक्ट कार्यक्रम' हा शब्द देखील चोरल्यासारखा वाटतो - जितेंद्र आव्हाड
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. करेक्ट कार्यक्रम हा शब्द प्रयोगावरुन सध्या राजकारणात ज्या घडामोडी घडत आहेत त्यावरुन विरोधी पक्ष आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. यावरुनच राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देवेंद्र फडणवीस यांना सुनावले आहे.
4 वर्षांपूर्वी -
Lockdown Updates | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार
राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असताना दिसत आहे. राज्यात लॉकडाऊन संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यापूर्वीच इशारा दिलेला होता. गेल्या दोन दिवसांपासून यावर मंत्रिमंडळाच्या बैठका सुरू आहेत. दरम्यान आजच राज्यातील लॉकडाऊनविषयी महत्त्वाची घोषणा केली जाऊ शकते असे संकेत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
म्हाडा मुंबईत काम करणाऱ्या महिलांसाठी हॉस्टेल उभारणार | सुप्रिया सुळेंची मागणी पूर्णत्वाला
मुंबईत विविध क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणी आणि महिलांसाठी एक महत्वाची बातमी आहे. येत्या काही दिवसांत ताडदेवमध्ये 1 हजार महिलांसाठी (वर्किंग वुमन्स) हॉस्टेल उभं करण्यात येणार आहे. तशी घोषणा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलीय. तीन दिवसांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईत काम करणाऱ्या तरुणी आणि महिलांसाठी हॉस्टेलबाबत निर्णय घेण्याची मागणी केली होती. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांत जितेंद्र आव्हाड यांनी सुळे यांच्या मागणीची पुर्तता केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Lockdown | लॉकडाऊनची घोषणा बुधवारी होऊ शकते | पण अंमलबजावणी २ दिवसांनी? - सविस्तर
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासठी 12 ते 13 दिवसांचा लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे, असे वक्तव्य राज्याचे ग्रामविकासमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी केले. लॉकडाऊनची घोषणा बुधवारी होऊ शकते. पण लोकांची ऐनवेळी गैरसोय होऊ नये म्हणून लॉकडाऊनची अंमलबजावणी मात्र दोन दिवसांनी होईल, अशी शक्यताही आता वर्तविण्यात येत आहे.
4 वर्षांपूर्वी -
Lockdown Updates | मुख्यमंत्री आजच निर्णय घेणार, नियमावलीही आजच तयार होणार - अस्लम शेख
राज्यात सोमवारी एकूण ५१,७५१ नवे रुग्ण, तर २५८ रुग्णांचा मृत्यू झाला. यातील १३३ रुग्ण एकट्या विदर्भातील आहेत. मराठवाड्यात ८७ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ३४ लाख ५८,९९६ रुग्णांची नोंद झाली असून २८,३४,४७३ रुग्ण बरे झाले.
4 वर्षांपूर्वी -
राजकारण सुरु राहिल, लोकांचा जीव महत्त्वाचा - आदित्य ठाकरे
राज्यात सोमवारी एकूण ५१,७५१ नवे रुग्ण, तर २५८ रुग्णांचा मृत्यू झाला. यातील १३३ रुग्ण एकट्या विदर्भातील आहेत. मराठवाड्यात ८७ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ३४ लाख ५८,९९६ रुग्णांची नोंद झाली असून २८,३४,४७३ रुग्ण बरे झाले.
4 वर्षांपूर्वी -
पुणे | लॉकडाऊनचा निर्णय लवकर जाहीर करा | संपूर्ण लॉकडाऊन झाला तरच पाठिंबा - व्यापारी
राज्यात सोमवारी एकूण ५१,७५१ नवे रुग्ण, तर २५८ रुग्णांचा मृत्यू झाला. यातील १३३ रुग्ण एकट्या विदर्भातील आहेत. मराठवाड्यात ८७ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ३४ लाख ५८,९९६ रुग्णांची नोंद झाली असून २८,३४,४७३ रुग्ण बरे झाले.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH
-
NTPC Green Energy Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करणार, मिळेल मजबूत परतावा - NSE: NTPCGREEN
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअर पुन्हा पटरीवर, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस, अपडेट नोट करा - NSE: IRFC