महत्वाच्या बातम्या
-
पवारांना वारंवार मातोश्रीवर हेलपाटे मारायला लावण्याची वेळ आणणे योग्य नव्हे
भाजपने यावरून मातोश्री दौऱ्यावरून महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. प्रणव मुखर्जीं यांना राष्ट्रपती करायचे होते तेव्हा २००४ साली सोनिया गांधी यांनी सांगितल्यामुळे, शिवसेनेची मते मागायला शरद मातोश्रीवर गेले होते. त्यानंतर थेट आत्ता व गेल्या आठवड्यात तर दोन-तीन वेळा पवार मातोश्रीवर गेले आहेत. हे काही बरोबर नसून या वयात त्यांचा मान ठेऊन, त्यांनाच भेटायला गेले पाहिजे होते. वारंवार पवार यांना मातोश्रीवर हेलपाटे मारायला लावण्याची वेळ आणणे योग्य नसल्याचे मत व्यक्त करीत, भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लक्ष केले़.
5 वर्षांपूर्वी -
पुण्यातील भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांना कोरोनाची लागण
पुण्यातील भाजपाच्या आमदार मुक्ता टिळक यांना करोना व्हायरसची लागण झाली आहे. मुक्ता टिळक आणि त्यांच्या आईचा करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. स्वत: मुक्ता टिळक यांनी टि्वट करुन त्यांचा करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली.
5 वर्षांपूर्वी -
लागा तयारीला, महाविकास आघाडी सरकारचा १० हजार पोलीस शिपाई भरतीचा निर्णय
अनलॉकची प्रक्रिया सुरू केल्यानंतर देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशातच देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईबाबत एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्तीतही फडणवीस रोज फिरतायंत, अन उद्धव ठाकरे मातोश्रीतच - चंद्रकांत पाटील
चीनमधून सुरू झालेलं कोरोना व्हायरस नावाचं संकट जगाच्या कानाकोपऱ्यात धडकलं. भारतातही कोरोनाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. अनेक टप्प्यांच्या लॉकडाऊननंतरही भारतातील कोरोनाची साखळी तोडण्यात यश आलेलं नाही. अनलॉकची प्रक्रिया सुरू केल्यानंतर देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशातच देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईबाबत एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
जावईशोध! Zoom App चीनी कंपनीचं, भाजप पुणे शहर अध्यक्षांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
Zoom App हे मूळचं अमेरिकन कंपनीचं असून, सदर कंपनीचं कार्यालय अमेरिकेतील कॅलिफोर्नियात आहे. तसेच सदर कंपनी अमेरिकेच्या नॅसडॅकवर देखील लिस्टेड आहे. काही दिवसांपूर्वी भारत सरकारने ५९ चिनी अँप्सवर सुरक्षेच्या कारणावरून बंदी आणण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आजही अनेकांना कोणतं अँप नेमकं कोणत्या देशाशी संबंधित आहे याची कल्पना नसावी आणि यामध्ये भाजपचे नेतेच आघाडीवर असल्याचं समाज माध्यमांवर पाहायला मिळतं.
5 वर्षांपूर्वी -
खळबळ वगैरे काही नाही ही फक्त त्यांची वळवळ - निलेश राणे
शरद पवारांना यावं मातोश्रीवर लागलं अशी परिस्थिती नाही,अधूनमधून ते मुख्यमंत्र्यांना भेटत असतात. कोणत्याही प्रकारचे मतभेद सरकारमध्ये नाहीत. जशी बाहेर पावसाची रिपरिप सुरू आहे ना,तशी काही लोक बातम्यांची रिपरिप करत असतात. पवार साहेब भेटले पण इतर विषयांसाठी भेटले, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण : पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशावर बुधवारी अंतरिम आदेश
मराठा आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत कोणताही निर्णय दिला नाही, तर येत्या बुधवारी पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशाबाबत अंतरिम आदेशावर सुनावणी होईल, असे सांगितले. त्याचबरोबर मराठा आरक्षणाचं प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या मोठ्या खंडपीठाकडे जाणार की नाही, याबाबत मुख्य न्यायमूर्तींसमोर सुनावणी होईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच सर्वोच्च न्यायालयाने व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कोणत्याही प्रकारे निकाल देऊ शकत नाही असे मत व्यक्त केले. न्यायालय नियमित सुरु झाल्यावर मराठा आरक्षण सुनावणीवरील निकाल देता येणार असल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे.
5 वर्षांपूर्वी -
भोंगळ कारभार, कोरोना रुग्ण जिवंत असताना मृत्यू झाल्याचा कुटुंबियांना कॉल
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईने कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत आता चीनलाही मागे टाकले असल्याचे धक्कादायक वास्तव आकडेवारीने समोर आले आहे. चीनमध्ये कोरोनाबाधितांची एकूण संख्या ८५ हजार ३२० आहे, तर मुंबईत ही संख्या ८५ हजार ७२४ झाली आहे. चीनमध्ये ४ हजार ६४८ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून मुंबईतील कोरोनाबळींची संख्या ४ हजार ९३८ आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नगरसेवकाच्या कुटुबीयांची पवारांनी भेट घेतली
माजी विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांचं हृदय विकाराच्या झटक्यानं २५ जून रोजी निधन झालं. दत्ता साने यांना कोरोनाची लागण झाल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यादिवशी पहाटे 5 वाजताच्या सुमारास चिंचवड इथल्या खासगी रुग्णालयात निधन झालं आहे. साने यांना 25 जून रोजी कोरोनाची लागण झाली होती.
5 वर्षांपूर्वी -
आज मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी
मराठा आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. मराठा आरक्षणाचं प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या मोठ्या खंडपीठाकडे जाणार की नाही, याचे उत्तर आज मिळणार आहे. त्याचबरोबर मागच्या वेळी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमात मराठा आरक्षणाला स्थगिती द्यायला नकार दिला होता. परंतु सोबतच याचे भवितव्य अंतिम निकालावर अवलंबून असेल असेही सांगितले होते. त्यामुळे वैद्यकीय पदव्युत्तर परीक्षा अभ्यासक्रमात मराठा आरक्षणाच्या विरोधी याचिकांवर सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
सरकारचे किती दिवस शिल्लक हे ज्योतिष फडणवीसच सांगू शकतात - प्रकाश आंबेडकर
अकोला येथे आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ‘केंद्र सरकारने ओबीसींसाठी राखीव असलेल्या वैद्याकीय जागेवर या प्रवर्गातील विद्यााथ्र्यांना प्रवेश दिला नाही. या धोरणामुळे २०१७ पासून ते आजपर्यंत ११ हजार विद्यााथ्र्यांना फटका बसला. देश पातळीवरील ‘ऑल इंडिया फेडरेशन ऑफ ऑधर बॅकवर्ड क्लासेस’नी ही आकडेवारी जाहीर केली.
5 वर्षांपूर्वी -
आज राज्यात ५३६८ नव्या कोरोना रुग्णांची वाढ; २०४ रुग्णांचा मृत्यू
राज्यात आज कोरोनाबाधितांच्या आकड्यात ५ हजार ३६८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून विक्रमी आकडे समोर येत असताना आज आलेली आकडेवारी जरा दिलासा देणारी ठरली आहे. तसेच, आज २०४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर एकूण बाधितांचा आकडा २ लाख ११ हजार ९८७ झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
फक्त गोंधळ! महास्वयंम रोजगार पोर्टल असताना अजून 'महाजॉब्स' पोर्टल लाँच
राज्यातील स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी निर्माण करून देणाऱ्या ‘महाजॉब्स’ या वेबपोर्टलचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थिती हा सोहळा पार पडला. राज्यातील मराठी तरुणांना रोजगार मिळावा या उद्देशाने हे पोर्टल तयार करण्यात आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
रुग्णांची लूट, रुग्ण व्यवस्थापनही कमतरता, ठाण्यात २-३ रुग्ण बेपत्ता - फडणवीस
ठाण्यात बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून मुंबईपेक्षा ठाण्याची परिस्थिती अधिक गंभरी होत जात आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्याला भेट दिली. या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारला महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
पुणे हादरलं! महापौरानंतर उपमहापौर, ६ नगरसेवकांना कोरोना; खासदार-आमदार क्वारंटाईन
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी ताजी असताना आता भाजपचे पुण्यातील हडपसर विधानसभेचे माजी आमदार योगेश टिळेकर यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. योगेश टिळेकर यांनी स्वत: ट्वीट करून आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले होते. ‘दोन दिवसापूर्वी ताप व कणकण आल्याने माझी व मुलाची COVID-19 ची तपासणी करून घेतली असतात तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला’ असल्याचं टिळेकर यांनी सांगितलं होते.
5 वर्षांपूर्वी -
हे खरच सरकार नाही सर्कस आहे - आ. नितेश राणे
पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश रद्द करण्यात आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकारवर जोरदार टीका केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
राऊतांनी १२ आमदारांची काळजी करण्यापेक्षा कोरोना रुग्णांची काळजी करावी - फडणवीस
संजय राऊत यांनी रोखठोक सदरात लिहिलेल्या लेखावरून रविवारी दिवसभर राजकीय वर्तुळात सरकार अस्थिरेच्या चर्चेनं डोकं वर काढलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील महाविकास सरकार पाडण्याची तयारी होत असल्याचा धक्कादायक दावा केला होता. सरकार पाडण्यासाठी पैजा लागल्या आहेत, असं राऊत म्हणाले होते. या विधानावरून राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राऊत यांना सल्ला दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
कार्यपद्धती निश्चित झाल्यावर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरु करण्याचा विचार
राज्यातील हॉटेल्स लवकरच सुरु होणार आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीसाठी या व्यवसायाच्या कार्यपद्धतीवर सध्या काम सुरु आहे, ती अंतिम झाल्यास या व्यवसायालाही मिशन बिगिन अगेन अंतर्गत इतर उद्योग-व्यवसायांप्रमाणे सुरुवात होईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. राज्यातील हॉटेल्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये ते बोलत होते. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, पर्यटन प्रधान सचिव वल्सा नायर सिंह सहभागी होते.
5 वर्षांपूर्वी -
भाजपाचे माजी आमदार योगेश टिळेकर कोरोना पॉझिटिव्ह
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी ताजी असताना आता भाजपचे पुण्यातील हडपसर विधानसभेचे माजी आमदार योगेश टिळेकर यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. योगेश टिळेकर यांनी स्वत: ट्वीट करून आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले आहे. ‘दोन दिवसापूर्वी ताप व कणकण आल्याने माझी व मुलाची #COVIDー19 ची तपासणी करून घेतली असतात तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला’ असल्याचं टिळेकर यांनी सांगितलं.
5 वर्षांपूर्वी -
युतीच्या सत्ताकाळात सुद्धा भाजप-शिवसेना नेत्यांचे असे पक्ष प्रवेश व्हायचे - अंकुश काकडे
महाविकासआघाडीमध्ये सुरू असलेल्या कुरबुरींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचीकाल भेट घेतली होती.
5 वर्षांपूर्वी
लॉकडाऊनबाबत प्रशासनातील अधिकारी मंत्र्यांशी चर्चा न करताच निर्णय घेत असल्याची तक्रार महाविकासआघाडीच्या नेत्यांची आहे. लॉकडाऊनचा निर्णयही परस्पर जाहीर करण्यात आल्यामुळे मंत्र्यांमध्ये नाराजी आहे. त्यासंदर्भात पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये मुंबईतील जुन्या महापौर बंगल्यावर बैठक झाली.
राहुन गेलेल्या बातम्या
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH
-
Mazagon Dock Share Price | मल्टिबॅगर शेअर रेकॉर्ड हाय लेव्हलवर, आता मोठ्या तेजीचे संकेत, टार्गेट अपडेट - NSE: MAZDOCK
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL