महत्वाच्या बातम्या
-
काही लोक टीव्हीवर येण्यासाठी, बातम्या होण्यासाठी अशी वक्तव्य करतात - आ. रोहित पवार
भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांबाबत धक्कादायक विधान केल्याने समाज माध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं होतं की, “शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे असं माझं मत आहे. गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्राचं नेतृत्त्व ते करत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. ती ते पुढंही चालू ठेवतील. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही.
5 वर्षांपूर्वी -
पतंजलीच्या 'कोरोनिल'ला महाराष्ट्रात बंदी..राज्य सरकारचा निर्णय
कोरोनाचा झपाट्याने प्रादुर्भाव होत आहे. जगात चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, जगात कोरोनावर ठोस कोणतेच औषध तयार करण्यात यश आलेले नाही. मात्र, योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजलीने कोरोनावर औषध निर्माण केलेचा दावा करण्यात आला आहे. पंतजलीने कोरोनावर ‘कोरोनिल’ हे औषध तयार केले आहे. त्याबाबत पत्रकार परिषद घेऊन हे औषध बाजारात आणले. मात्र, पंतजलीसह बाबा रामदेव यांना केंद्र सरकारने दणका देत औषध विक्रीवर निर्बंध घातले.
5 वर्षांपूर्वी -
आज राज्यात कोरोनाचे ३८९० नवे रुग्ण, डिस्जार्ज मिळणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली
देशभरात कोरोनाग्रस्तांची सर्वाधिक संख्या असलेल्या महाराष्ट्रासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यात एकाच महिन्यात दहा दिवसांच्या अंतराने एकाच दिवशी ४१६१ एवढ्या विक्रमी संख्येत कोरोनाच्या बरे झालेल्या रुग्णांना आज घरी सोडण्यात आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाराज मंडळींना प्रवेश नसेल, तर मुख्यमंत्र्यांनी आषाढी एकादशीची महापूजा करु नये - पडळकर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आषाढी एकादशीची महापूजा करु नये, अशी मागणी भाजपचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. शेतकरी कुटुंबाला महापूजेचा मान देण्याचे पडळकर यांनी सुचवले. पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीची शासकीय महापूजा करण्याचा मान दरवर्षी मुख्यमंत्र्यांना सपत्नीक देण्याची परंपरा आहे.
5 वर्षांपूर्वी -
आधी पालकमंत्रीच आरोग्यमंत्री होते, खासदार डॉक्टरच आहेत, तरी KDMC'ची आरोग्यसेवा थर्डक्लासच
ठाणे जिल्ह्यातील करोना रुग्णांची वाढती संख्या व तुटपुंजी उपाययोजना लक्षात घेऊन ठाणे महापालिका आयुक्तांसह चार आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मात्र खरी गरज आहे ती पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनाच आता बदला अशी मागणी भाजप आणि मनसेने केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना, गोपीचंद पडलकरांचं धक्कादायक विधान
भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांबाबत धक्कादायक विधान केल्याने समाज माध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे की, “शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे असं माझं मत आहे. गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्राचं नेतृत्त्व ते करत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. ती ते पुढंही चालू ठेवतील. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. फक्त छोट्या समूह घटकांना भडकवून आपल्या बाजूने करुन घ्यायचं आणि नंतर त्यांच्यावरच अन्याय करायचे त्यांची भूमिका आहे”.
5 वर्षांपूर्वी -
परप्रांतीय मजूर परतत आहेत, रोहित पवारांचं मराठी तरुणांना मनसे आवाहन
लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर पुण्यात १४४ रेल्वेगाड्यातून ३० हजार मजूर पुण्यात परतले आहेत. 22 हजार थेट पुणे रेल्वे स्टेशनवर तर 8963 जण लोणी, दौंड, उरुळी कांचन अशा स्थानकांवर उतरले आहेत. लॉकडाउनच्या काळात 139 रेल्वे गाड्यातून 1 लाख 80 हजार मजूर मुळगावी गेले होते. पण, आता पुण्यात मोठ्या संख्येनं मजूर परत येत आहे. पुणे -पटणा, मुंबई- बंगलोर, भोपाळ-गोवा, मुंबई-भुवनेश्वर, मुंबई-हैदराबाद, मुंबई-गदग या गाड्या जेव्हा परत फिरतात तेव्हा या गाड्यातून साधारण २००० प्रवासी रोज परत येत आहे, अशी माहिती माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
त्या पहाटेच्या शपथविधीचे शिल्पकार अमित शाह - फडणवीस
राज्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर मोठं राजकीय नाट्य रंगलं होतं. तब्बल महिनाभर चालेल्या राजकीय घडोमोडीमुळे नागरिकांना दररोज नवं चित्र बघायला मिळत होतं. मात्र, पडद्यामागील घटनांचा नेमका अंदाज येत नव्हता. नोव्हेंबर २०१९ मध्ये झालेल्या सत्ता स्थापनेतील कुरघोड्यामध्ये एक घटना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिव्हारी लागली. एका मुलाखतीत फडणवीस यांनी त्याविषयीची सल व्यक्त केली.
5 वर्षांपूर्वी -
त्यावेळच्या राजकीय घडामोडीवर खरं पुस्तक मी लिहणार, सगळा घटनाक्रम डोक्यात - फडणवीस
राज्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर मोठं राजकीय नाट्य रंगलं होतं. तब्बल महिनाभर चालेल्या राजकीय घडोमोडीमुळे नागरिकांना दररोज नवं चित्र बघायला मिळत होतं. मात्र, पडद्यामागील घटनांचा नेमका अंदाज येत नव्हता. नोव्हेंबर २०१९ मध्ये झालेल्या सत्ता स्थापनेतील कुरघोड्यामध्ये एक घटना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिव्हारी लागली. एका मुलाखतीत फडणवीस यांनी त्याविषयीची सल व्यक्त केली.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात चीन, दक्षिण आफ्रिका, कॅनडा व बांग्लादेशपेक्षाही जास्त कोरोनाबाधित
देशात गेल्या २४ तासांत करोनाचे १४ हजार ९३३ रुग्ण आढळले. त्यामुळे देशभरातील करोना रुग्णांची एकूण संख्या ४ लाख ४० हजार २१५ वर पोहोचली.गेल्या २४ तासांत ३१२ करोनाबळींची नोंद झाली. त्यामुळे मृतांची एकूण संख्या १४ हजार ११ झाली आहे. आत्तापर्यंत २ लाख ४८ हजार १९० रुग्ण बरे झाले. करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.७७ टक्क्यांवर पोहोचले आहे. देशभरात १ लाख ७८ हजार ११४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
5 वर्षांपूर्वी -
ट्रॉलिंगसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून प्रचंड फेक अकाऊंट - फडणवीस
देवेंद्र फडणवीस यांनी एका युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत विविध मुद्द्यांवर चर्चा केली. राज्यातील सध्याची कोरोना परिस्थिती, राजकारण, देशाची आर्थिक परिस्थिती आणि सोशल मीडियावर ट्रोलिंगवरही त्यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली.
5 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे यांच्या मातोश्रीविरुद्धच्या बंडासाठी राऊत जबाबदार होते, विखे पाटलांचा गौप्यस्फोट
सामना अग्रलेखात केलेल्या टीकेचा भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी संजय राऊत यांचा आपल्या शैलीत समाचार घेतला आहे. थोरातांची कुरकुर नाहीच! विखेंची टुरटुर! या मथळ्याखाली सामनाच्या अग्रलेखात विखे पाटील यांच्यावर टीका करण्यात आली होती. या टीकेला विखे पाटील यांनी पत्राद्वारे जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे. या पत्रात त्यांनी राज ठाकरे यांच्या बंडासाठी संजय राऊत जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. मातोश्रीविरुद्ध बंड करण्यासाठी कृष्णकुंजला कुणाची चिथावणी होती आणि वेळेवर कोणी यू-टर्न घेतले, हा इतिहास लोकांना माहिती आहे. मी त्याविषयी वेगळे काय सांगणार, असे विखे-पाटील यांनी म्हटले आहे.
5 वर्षांपूर्वी -
बाळासाहेब थोरात भाजपात प्रवेश करणार होते, विखे पाटलांचा गौप्यस्फोट
सामना अग्रलेखात केलेल्या टीकेचा भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी संजय राऊत यांचा आपल्या शैलीत समाचार घेतला आहे. थोरातांची कुरकुर नाहीच! विखेंची टुरटुर! या मथळ्याखाली सामनाच्या अग्रलेखात विखे पाटील यांच्यावर टीका करण्यात आली होती.
5 वर्षांपूर्वी -
अर्धी नाळ शिवसेनेसोबत आणि अर्धी नाळ शरदाच्या चांदण्यात भिजतेय - विखे पाटील
सामना अग्रलेखात केलेल्या टीकेचा भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी संजय राऊत यांचा आपल्या शैलीत समाचार घेतला आहे. थोरातांची कुरकुर नाहीच! विखेंची टुरटुर! या मथळ्याखाली सामनाच्या अग्रलेखात विखे पाटील यांच्यावर टीका करण्यात आली होती.
5 वर्षांपूर्वी -
आज राज्यात ३ हजार ७२१ कोरोना रुग्णांची नोंद
राज्यात आजही तब्बल 3721 नव्या Covid-19 रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातल्या रुग्णांची एकूण संख्या 1,35,796वर गेली आहे. आज 62 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातल्या एकूण मृत्यूंची संख्या 6283 झाली आहे. तर 1962 रुग्ण आज बरे होऊन घरी गेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या वाढीचा वेग प्रचंड वाढला आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. तर पावसाळ्यात आणखी रुग्ण वाढण्याची भीती मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी व्यक्त केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोळसा खाण: केंद्राच्या 'त्या' निर्णयाला राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंचा विरोध
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या उत्तर दिशेस बफर क्षेत्रास लागून असलेल्या ‘बंदर कोल ब्लॉक’ ला कोल इंडियातर्फे लिलाव करण्यात येणाऱ्या ४१ कोल ब्लॉकच्या यादीतून वगळण्यात यावे.या मागणीसाठी इको-प्रो तर्फे मूक निदर्शन करण्यात आली. कोल इंडियातर्फे लिलाव करण्यात येणाऱ्या ४१ कोल ब्लॉकच्या यादीत, बंदर कोल ब्लॉकचा समावेश असल्याने ताडोबा-बोर-मेळघाट वन्यप्राणी कॉरिडोर-भ्रमण मार्ग संकटात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
काँग्रेसच्या थोरातांची चिंता, पण ग्रामीण भागतल्या जुन्या शिवसेनेच्या नेत्यांना विचारत नाही
सामना संपादकीयमधून भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर आज टीका करण्यात आली आहे. पूर्वी थोरातांची कमळा चित्रपट गाजला होता. आता विखे पाटलांची कमळा अशा एक चित्रपट आला आणि पडला. काँग्रेसची खाट कुरकुरतेय की नाही ते पाहू, पण विखेंची टूक अॅण्ड ट्रॅव्हल कंपनी बंद पडली आहे. मात्र त्यांची टुरटूर सुरु आहे अशा शब्दांत राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर सामना संपादकीयमधून यांना टोला लगावण्यात आला आहे. यावेळी अप्रत्यक्षपणे नारायण राणे यांच्यावरही टीका करण्यात आली आहे. यावरुन आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना इशारा देत टीका केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
ठाकरे सरकारकडून चिनी कंपन्यांसोबतच्या ३ मोठ्या करारांना स्थगिती...रद्द नाही
मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० मध्ये स्वाक्षरी करण्यात आलेले चीनच्या कंपन्यांसोबतचे तीन करार महाविकास आघाडी सरकारने रोखले आहेत. या करारांनुसार चीनच्या कंपन्यांकडून महाराष्ट्रात ५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार होती. केंद्र सरकारसोबत चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आला आहे. गलवान खोऱ्यातील हिंसक घटनेपूर्वीच या करारांवर स्वाक्षरी करण्यात आली होती. परराष्ट्र मंत्रालयाने यापुढे चीनच्या कंपन्यांसोबत कोणतेही करार करू नये, असा सल्ला दिला होता, अशी माहिती राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे - फडणवीस
कोरोनामुळे मुंबईसह महाराष्ट्रातील परिस्थिती दिवसेंदिवस हलाखीची होत आहे, असं सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं असून, त्यात राज्यातील एकूण स्थिती मुख्यमंत्र्यांच्या निर्दशनास आणून दिली आहे. विशेषतः फडणवीस यांनी मुंबईतील वाढत्या मृत्यूदराबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
केवळ ४८ तासांत १४० पोलिसांना कोरोनाची लागण
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. कोविड योद्धेही कोरोनाचे शिकार बनत आहेत. गेल्या ४८ तासांत १४० पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली असून एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये तेजीचे संकेत; मिळेल मजबूत परतावा - NSE: ADANIPOWER
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH
-
Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही; 22 टक्के अपसाईड परतावा मिळेल - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL