महत्वाच्या बातम्या
-
मी पक्ष सोडला म्हणून थोरातांना संधी मिळाली, त्यांची कर्तबगारी काय? - विखे पाटील
राज्यात सत्ता स्थापन होऊन सहा महिने लोटले आहेत. राज्यात सत्तेत सहभागी असलेला काँग्रेस पक्ष नाराज असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी सुरू झाली होती. त्यावर लगेच पडद्या पडला. मात्र, यावरून भाजपाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला आहे. “स्वतःच्या स्वार्थासाठी काँग्रेसचे नेते लाचार झाले असून, मी पक्ष सोडला म्हणून बाळासाहेब थोरात यांना अध्यक्ष पद मिळाले. त्यांची स्वतःची कर्तबगारी काय?”, अशी टीका विखे पाटील यांनी केली.
5 वर्षांपूर्वी -
शिवसैनिक म्हणजे तुम्ही किंवा मुलगा पंतप्रधान बनणार आणि जॅकेट शिवायला टाकली खासदारांनी
शिवसेनेचा काल ५४वा वर्धापन दिन पार पडला. दरवर्षी अफाट उत्साहात आणि थाटात साजरा होणारा हा वर्धापन दिन काल कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल दुपारी साडेबारा वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिवसेना नेते, उपनेते, जिल्हाप्रमुख आणि अन्य पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांशी संवाद साधला होता.
5 वर्षांपूर्वी -
वडील ST महामंडळातील निवृत्त वाहक, मुलगा रविंद्र शेळके झाला उपजिल्हाधिकारी
राज्य सेवा मुख्य परीक्षा 2019 निकाल काल लागला. प्रसाद चौगुले याने बाजी मारत राज्यात पहिला क्रमांक पटकावला. तर पर्वणी पाटील मुलींमध्ये पहिली आली आहे. ही राज्यसेवेची सर्वात मोठी बॅच होती. या बॅच मध्ये ४२० अधिकारी झाले आहेत. विद्यार्थ्यांना गेली अनेक दिवस या निकालांची प्रतिक्षा होती. 13 ते 15 जुलै 2019 रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती.
5 वर्षांपूर्वी -
स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील वाद मिटला; राजू शेट्टींचा विधानपरिषदेचा मार्ग मोकळा
विधान परिषदेवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी विधान परिषद निवडणुकीची ब्याद नकोच, अशी भूमिका घेतली होती. यावरून संघटनेमध्ये सारे काही आलबेल नसल्याचे दिसत होते. कोल्हापूरमध्ये झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांच्या व्यापक हितासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना एकसंघ ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला व हा वाद मिटविण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात ३८२७ नवे कोरोना रुग्ण, १४२ जणांचा मृत्यू
महाराष्ट्रात आज ३८२७ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये १४२ रुग्णांचा करोनाची लागण होऊन मृत्यू झाला आहे. तर मागील २४ तासांमध्ये १९३५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात सध्याच्या घडीला ५५ हजार ६५१ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत तर ६२ हजार ७७३ करोनाबाधित रुग्ण हे बरे होऊन घरी गेले आहेत. मागील चोवीस तासांतील आकडेवारीनंतर महाराष्ट्रातली करोनाग्रस्तांची एकूण संख्या ही १ लाख २४ हजार ३३१ इतकी झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
साताऱ्याचा प्रसाद चौगुले MPSC परीक्षेत राज्यात प्रथम
राज्य सेवा मुख्य परीक्षा 2019 निकाल लागला लागला आहे. प्रसाद चौगुले याने बाजी मारत राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. तर पर्वणी पाटील मुलींमध्ये पहिली आली आहे. ही राज्यसेवेची सर्वात मोठी बॅच होती. या बॅच मध्ये 420 अधिकारी झाले आहेत. विद्यार्थ्यांना गेली अनेक दिवस या निकालांची प्रतिक्षा होती. 13 ते 15 जुलै 2019रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती.
5 वर्षांपूर्वी -
सरकारी नियम पायदळी, कोविड टेस्टची किंमत २५०० होऊनही लॅब्सकडून ४ हजाराची आकारणी
कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. त्यानुसार खासगी लॅब्सना कोरोना चाचणीसाठी जास्तीत जास्त २२०० रुपयेच आकारता येतील. यापूर्वी कोरोनाच्या टेस्टसाठी साधारण ४४०० रुपये आकारले जात होते. खासगी लॅब्समध्ये यावर इतर कर लागून कोरोना टेस्टची किंमत बरीच जास्त होती.
5 वर्षांपूर्वी -
BA, B.Sc आणि B.Com परीक्षा होणार नाहीत, उदय सामंत यांची माहिती
बीए, बीएएसस्सी आणि बीकॉमच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा होणार नाहीत. तसंच अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा होणार नाहीत अशी घोषणा आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. एटीकेटी संदर्भात येत्या दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल असंही उदय सामंत यांनी म्हटलं आहे. अत्यंत महत्त्वाचा असा हा निर्णय घेण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेंकडे आम्ही उद्याचे देशाचे पंतप्रधान म्हणून पाहतोय - खा. संजय राऊत
शिवसेनेचा आज ५४वा वर्धापन दिन आहे. दरवर्षी अफाट उत्साहात आणि थाटात साजरा होणारा हा वर्धापन दिन आज कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज दुपारी साडेबारा वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिवसेना नेते, उपनेते, जिल्हाप्रमुख आणि अन्य पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांशी संवाद साधला.
5 वर्षांपूर्वी -
शिवसैनिकाला पंतप्रधान बनवण्याचे माझे स्वप्न आहे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
शिवसेनेचा आज ५४वा वर्धापन दिन आहे. दरवर्षी अफाट उत्साहात आणि थाटात साजरा होणारा हा वर्धापन दिन आज कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज दुपारी साडेबारा वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिवसेना नेते, उपनेते, जिल्हाप्रमुख आणि अन्य पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांशी संवाद साधला.
5 वर्षांपूर्वी -
मी विचारधारा बदललेली नाही आणि मी डगमगणार नाही - मुख्यमंत्री
मी विचारधारा बदललेली नाही. मुख्यमंत्री झाल्यापासून आपल्यात थोडा संपर्क कमी झाला आहे. पण अंतर कमी झालेले नाही. आता गाव तिथं शाखा व घर तिथं शिवसैनिक कार्यक्रम राबवायचा आहे. स्वत:ची काळजी घेवून लोकांची मदत करा, किती संकटे आली तरी मी डगमगणार नाही. माझे स्वप्न नाही पंतप्रधान बनण्याचे,परंतु शिवसैनिकाला पंतप्रधान बनवण्याचे स्वप्न आहे असे सांगत मास्क तोंडावर आला असला तरी आपला आवाज कुणी दाबू शकत नाही.
5 वर्षांपूर्वी -
लॉकडाउनमुळे ९ चिनी अधिकारी पुण्यात अडकले, त्यातील एक कोरोना पॉझिटिव्ह
महाराष्ट्रातील कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होतेय. काल (गुरुवारी) एका दिवसात राज्यात कोरोनाच्या 3 हजार 752 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर 100 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 20 हजार 504वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 5 हजार 751 इतका झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
पुणे: परिस्थितीला कंटाळून एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या
एकाच कुटुंबातील चौघांच्या आत्महत्येने पुणे जिल्हा हादरला आहे. आपल्या दोन चिमुरड्यांना गळफास दिल्यानंतर दाम्पत्याने स्वतःचं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना सुखसागर नगर परिसरात घडली आहे. अतुल दत्ता शिंदे (वय 33), जया अतुल शिंदे (वय 32), ऋग्वेद अतुल शिंदे (वय 6) आणि अंतरा अतुल शिंदे (वय 3) अशी आत्महत्या केलेल्या सदस्यांची नावे आहेत.
5 वर्षांपूर्वी -
स्वाभिमानीमध्ये अंतर्गत वाद वाढल्याने राजू शेट्टींची विधानपरिषद आमदारकीतून माघार?
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी हे राष्ट्रवादीकडून विधानपरिषद आमदार होण्याची शक्यता आहे. राजू शेट्टी यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची बारामतीत जाऊन भेट घेतल्यानंतर तर या चर्चेनं अधिकच वेग पकडला आहे. मात्र अशातच आता ही आमदाराकीची चर्चा राजू शेट्टी यांच्यासाठी नवी डोकेदुखी ठरणार की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण स्वाभिमानीचे दोन मोठे नेते या मुद्द्यावरून नाराज झाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात आज ३३०७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. मुंबईत कोरोना रुग्णांच्या आकडेवारीने ६० हजारांचा टप्पा पार केला आहे. मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढून आता २९ दिवसांवर पोहचला आहे. तर रुग्ण वाढीचा सरासरी दर आणखी कमी होऊन आता 2.43 टक्क्यांवर आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना रिपोर्ट रुग्णांना मिळणार नाही, आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं कारण...
कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूच्या संख्येत अचानक वाढ झाली. तब्बल १३२८ मृत्यूंची नव्याने नोंद झाली. त्यात गेल्या २४ तासांत नोंदल्या गेलेल्या ८१ कोरोनाबाधितांची भर पडली. त्यामुळे कोरोना मृत्यूंचा आकडा एकदम १४०९ ने वाढला आहे. त्यामुळे राज्यात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. तर जन्म आणि मृत्यू नोंदविण्याचे जे निकष आहेत त्यानुसारच नोंदणी करण्यात येत असल्याचं राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी सांगितलं.
5 वर्षांपूर्वी -
MPSC स्थगित परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
कोरोना विषाणु संसर्गामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्थगित करण्यात आलेल्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा १३ सप्टेंबर, दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ११ ऑक्टोबर आणि अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा १ नोव्हेंबर होणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
फेरपडताळणी: कोविड मृत्यूंची संख्या १३२८ ने वाढली, फडणवीस सरकारवर बरसले
कोरोनामुळे राज्यात नेमके किती मृत्यू झाले आहेत याची संख्या दडवण्यात येत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना केला होता. यासंबंधी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रही लिहिलं होतं. त्यानंतर २४ तासांच्या आत ठाकरे सरकारने फेरपडताळणी करत COVID-19 च्या मृत्यूंची वस्तुस्थिती सांगणारे आकडे जाहीर केले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
व्यवस्थित माहिती मिळवून अग्रलेख लिखाण असावं - बाळासाहेब थोरात
‘खाट कितीही कुरकुरली तरी कुणी चिंता करु नये’, अशा शब्दात शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून काँग्रेसच्या नाराजीनाट्यावर निशाणा साधण्यात आला आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली. ‘आम्ही आघाडीसोबत आहोत. उद्धव ठाकरेंसमोर भूमिका मांडू. आमचे मुद्दे जनतेच्या हिताचे आहेत’, असे त्यांनी म्हटले.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाग्रस्त कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर कोकण रेल्वेचे ५२ कर्मचारी क्वारंटाईन
मागील २४ तासांत राज्यात कोरोनामुळे सर्वाधिक रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. आजच्या आकडेवारीनुसार राज्यात २७८६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर १७८ जणांचा मृत्यू झाला. मृतांचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. यामध्ये मुंबईतील ५८ जणांचा समावेश आहे. त्यामुळे आता मुंबईसह राज्यातील आरोग्य यंत्रणेसमोरील आव्हान आणखी बिकट झाले आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये तेजीचे संकेत; मिळेल मजबूत परतावा - NSE: ADANIPOWER
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH
-
Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही; 22 टक्के अपसाईड परतावा मिळेल - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL