महत्वाच्या बातम्या
-
आर्थिक संकटाशी लढतानाच आपण मोडून पडू की काय, याचीच अधिक भीती - आ. रोहित पवार
अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली आहे. लॉकडाऊन शिथिल केल्याने नागरिकांनी योग्य ती काळजी घेऊन घरा बाहेर पडायला हवं, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी एका फेसबुक पोस्टद्वारे केलं आहे. यावेळी त्यांनी अर्थव्यवस्थेवरही भाष्य केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
राजू शेट्टी यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून आमदारकीचा प्रस्ताव
एकीकडे राज्यात कोरोनाचं संकट आ वासून उभं असताना दुसरीकडे राजकीय घडामोडी मात्र वेगाने घडत आहेत. ६ जून रोजी विधानपरिषदेतल्या राज्यपाल नियुक्त १२ जागा रिक्त झाल्यानंतर त्या जागांवर नव्या सदस्यांच्या नियुक्तीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सत्ताधारी महाविकास आघाडीतल्या तिनही पक्षांमध्ये या जागांसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहेत.
5 वर्षांपूर्वी -
मी अनेकदा बारामतीत गेलो, मला तिथेही समुद्र दिसला नाही – फडणवीस
निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आजपासून दोन दिवस कोकणचा दौऱ्यावर आहेत. या दोन दिवसांत रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत विविध ठिकाणी ते भेटी देऊन नुकसानीची पाहणी करतील.
5 वर्षांपूर्वी -
पालघर लिंचिंग चौकशी प्रकरणी सुप्रीम कोर्टाची केंद्र आणि महाराष्ट्र सरकारला नोटीस
महाराष्ट्रातील पालघर येथे दोन साधूंच्या हत्येच्या चौकशीची मागणी करण्याता आली आहे. साधुंच्या हत्या प्रकरणी सीबीआय किंवा एनआयएमार्फत ही चौकशी करण्यात यावी यासाठी याचिका करण्यात आली आहे. या याचिकेनंतर आज सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि महाराष्ट्र सरकारसह अन्य पक्षांना नोटीस बजावली आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ९४ हजार ४१ वर
महाराष्ट्रात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९४०४१ पर्यंत वाढली आहे. गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात ३४३८ नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. महाराष्ट्रातील कोरोना येथे गेल्या २४ तासांत १४९ मृत्यू झाले आहेत. महाराष्ट्रातील कोरोना येथे मृतांचा आकडा आता ३४३८ आहे. महाराष्ट्रात बुधावाारी १८७९ रूग्णांना बरे झाल्यानंतर सुट्टी देण्यात आली.
5 वर्षांपूर्वी -
...त्यामुळे फडणवीसांच्या ज्ञानात भर पडेल', शरद पवारांचा टोला
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या कोकणाच्या दौऱ्यावर आहेत. निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शरद पवार कोकणात आले आहेत. दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसदेखील कोकणाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. फडणवीसांच्या या प्रस्तावित कोकण दौऱ्यावर पवारांनी निशाणा साधला.
5 वर्षांपूर्वी -
....अन्यथा पुन्हा लॉकडाउन करावा लागू शकतो, मुख्यमंत्र्यांचा इशारा
राज्य सरकारने ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत लॉकडाउन शिथील करण्यास सुरुवात केली आहे. राज्य सरकारने दुकानं, गार्डन यांच्यासाठी वेळेची मर्यादा देत सुरु करण्याची परवानगी दिली असून खासगी कार्यालयांनाही ठराविक मनुष्यबळासोबत काम करण्यास संमती दिली आहे. त्यामुळे ३० जून नंतर लॉकडाउन पूर्णपणे उठवला जाणार का ? असा प्रश्न विचारला जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
महाराष्ट्र…कोरोना रुग्ण…बेड्स…राज्य सरकारचं वास्तव उघड
5 वर्षांपूर्वी -
बहिण-भावाच्या हत्येने औरंगाबादमध्ये खळबळ
मंगळवारी रात्री उघडकीस आलेल्या दुहेरी हत्याकांडाने पूर्ण औरंगाबाद हादरले आहे. बहिण-भावाची गळा चिरुन हत्या करण्यात आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. जिल्ह्याच्या सातारा परिसरातील एमआयटीजवळ ही घटना घडली. सौरभ खंदाडे आणि किरण खंदाडे अशी मृत युवकांची नावं असून त्यांच्या हत्येप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
ठाण्यातील राष्ट्रवादीचे नगरसेवक मुकुंद केणी यांचं कोरोनामुळे निधन
ठाण्यात कोरोना व्हायरसचा उद्रेक झाला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक मुकुंद केणी यांचे निधन झाले आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
5 वर्षांपूर्वी -
Unlock महाराष्ट्र सरकारची चिंता वाढवणार, आज २२५९ नवे कोरोना रुग्ण
अनलॉक नंतर वर्दळ वाढल्याने आता महाराष्ट्राची चिंता वाढली आहे. महाराष्ट्रात २२५९ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या ९० हजार ७८७ झाली आहे. आत्तापर्यंत ४२ हजार ६३८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ४४ हजार८४९ रुग्ण सध्याच्या घडीला ऍक्टिव्ह आहेत. मागील २४ तासांमध्ये १२० मृत्यूंची नोंद झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यातील प्रशासन आणि महापालिकांच्या मदतीला केंद्राची उच्चस्तरीय पथकं तैनात
राज्यात कोरोनाचे एकूण २५५३ नवे रुग्ण सापडल्याने एकूण बाधितांचा आकडा ८८ हजार ५२८ वर पोहोचला आहे. तर, आज एकूण १०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाने ही माहिती दिली. आज दिवसभरात १६६१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४० हजार ९७५ वर पोहोचली आहे. त्यामुळे राज्यात सद्या एकूण ४४ हजार ३७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
5 वर्षांपूर्वी -
निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शरद पवार कोकण दौऱ्यावर
‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज मंगळवारपासून दोन दिवस कोकण दौऱ्यावर आहेत. चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात सर्वात जास्त नुकसान झालं आहे.
5 वर्षांपूर्वी -
होम कोरंटाईनच्या संपर्कात आल्याने सेनेचे सिब्बल अनिल परब यांनी काळजी घ्यावी - आ. नितेश राणे
राज्यातील कोकणात देखील कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. त्यात कोकणासाठी कोरोना टेस्टसाठी देखील विशेष सोय नाही आणि त्यामुळे अडचणी वाढत आहेत. मोठ्या प्रमाणावर लोकांना होम कोरंटाईन करण्यात आलं आहे. मात्र आता भाजपचे आमदार नितेश राणे यांनी एक फोटो ट्विट करताना धक्कादायक माहिती दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात नव्या २५५३ रुग्णांची भर, १०९ रुग्णांचा मृत्यू, संख्या ८८ हजारांच्याही पुढे
आज राज्यात कोरोनाचे एकूण २५५३ नवे रुग्ण सापडल्याने एकूण बाधितांचा आकडा ८८ हजार ५२८ वर पोहोचला आहे. तर, आज एकूण १०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाने ही माहिती दिली. आज दिवसभरात १६६१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४० हजार ९७५ वर पोहोचली आहे.
5 वर्षांपूर्वी -
चांगलं काम करणारे भाजपामध्येच असतात याचा आम्हाला आनंद....सेनेचा आभारी
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून अभिनेता सोनू सूदवर करण्यात आलेल्या टीकेनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी यावरुन शिवसेनेला खोचक टोला लगावला. शिवसेनेला ठाम विश्वास आहे की, सोनू सूद हे भाजपचे आहेत. या गोष्टीचा मला आनंदच वाटला. कारण, चांगले काम करणारी लोकं भाजपमध्येच असतात, अशी टिप्पणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना वाढत असताना २० हजार परप्रांतीय नागरिक पुन्हा मुंबई-पुण्यात परतले
लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर जीव वाचविण्यासाठी मिळेल त्या वाहनांनी गावाकडे गेलेले परप्रांतीय नागरिक महाराष्ट्रात पुन्हा परतू लागले आहेत. लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर परराज्यात गेलेले मजूर पुन्हा मुंबई, पुणे आणि महाराष्ट्रात परतत आहेत. अवघ्या चार दिवसात परराज्यातून आलेल्या रेल्वेमधून अंदाजे २० हजार लोक महाराष्ट्रात परतले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
पहिले जे शिवसैनिक करायचे..तेच सोनू आता करतो आहे - आ. नितेश राणे
बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याच्या ‘मातोश्री’भेटीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत त्याला जोरदार टोला लगावला. ‘अखेर सोनू सूद महाशयांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा पत्ता सापडला…मातोश्रीवर पोहोचले’, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ८५,९७५ वर; मुंबईत एका दिवसात १,४२१ नवे रुग्ण
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतेय. काल राज्यात ३ हजार ७ नवीन रुग्णांची भर पडल्याने एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ८५ हजार ९७५ वर पोहचला आहे. तर एका दिवसात ९१ रुग्णांनी कोरोनामुळे आपला जीव गमावल्याने राज्यातील कोरोनाबळींची संख्या ३ हजार ६० इतकी झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णींवर पुण्यात हल्ला
भारतीय जनता पार्टीच्या कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्यावर पुण्यात हल्ला झाल्याची घटना घडली आहे. कोथरुडमधील सहजानंद सोसायटी भागात दारु पित बसलेल्या तरुणांना जाब विचारणाऱ्या दोघा व्यक्तींवर पहिले हल्ला करण्यात आला. याच परिसरात राहत असणाऱ्या मेधा कुलकर्णी यांनी घटनास्थळावर जाऊन काय झालं म्हणून विचारणा केल्यानंतर त्यांच्यावरही दारु पिणाऱ्या तरुणांनी हल्ला केला.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये तेजीचे संकेत; मिळेल मजबूत परतावा - NSE: ADANIPOWER
-
Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही; 22 टक्के अपसाईड परतावा मिळेल - NSE: VEDL
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सवर टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, 78 रुपये टार्गेट प्राईस जाहीर - NSE: SUZLON