29 April 2024 12:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

बहिण-भावाच्या हत्येने औरंगाबादमध्ये खळबळ

The killing of a sister and brother, Aurangabad

औरंगाबाद, १० जून: मंगळवारी रात्री उघडकीस आलेल्या दुहेरी हत्याकांडाने पूर्ण औरंगाबाद हादरले आहे. बहिण-भावाची गळा चिरुन हत्या करण्यात आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. जिल्ह्याच्या सातारा परिसरातील एमआयटीजवळ ही घटना घडली. सौरभ खंदाडे आणि किरण खंदाडे अशी मृत युवकांची नावं असून त्यांच्या हत्येप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारेकऱ्यांनी घरातील दीड किलो सोने आणि रोख साडेसहा हजार पळवले असल्याचीही माहिती आहे.

किरण ही पुण्यात उच्च शिक्षण घेत होती, तर सौरभ हा दहावीत शिकत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयटीसमोरील अल्फाईन हॉस्पिटलच्या पाठीमागे दोन मजली बंगल्यात लालचंद खंदाडे भाड्याने राहतात. शेतीच्या कामानिमित्त ते जालनात गेले होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि एक मुलगी गेली होती. तर त्यांची मोठी मुलगी किरण आणि मुलगा सौरभ हे दोघेच घरी होते.

मंगळवारी रात्री आठच्या सुमारास लालचंद राजपूत घरी परतले. यावेळी वाहनाचा हॉर्न वाजवूनही घरातून प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी वाहन उभे करून घरात पाहिले असता बाथरूममध्ये बहीण-भावाचे मृतदेह पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांनी आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात पाठविण्यात आले असून दोघांच्या हत्येचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही.

या घटनेची माहिती त्यांनी फोन करुन गावी असलेल्या लालचंद यांना आणि पोलिसांना कळविण्यात आली. पोलीस अधिकाऱ्याची घटनास्थळी धाव या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त डॉ . राहुल खाडे , पोलीस उपायुक्त मीना मकवाना , सहायक आयुक्त हनुमंत भापकर , सातारा ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र माळाले , गुन्हेशाखेचे निरीक्षक अनिल गायकवाड आणि अन्य अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली . सोबत ठस्से तज्ज्ञ पथक आणि न्याय वैद्यक शाखेचे पथकाला पाचारण केले . याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

 

News English Summary: The whole of Aurangabad has been shaken by the double murder that came to light on Tuesday night. The killing of a sister and brother by slitting their throats has caused a stir in the area. The incident took place near MIT in Satara area of the district.

News English Title: The killing of a sister and brother by slitting their throats has caused a stir in the area News latest Updates.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x