महत्वाच्या बातम्या
-
सांगलीत तब्बल १२ जणांना कोरोनाची लागण; परीसरातील सर्व सिमा सील
महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. राज्यात आज एकूण १७ नवीन रुग्ण आढळले आहे. सांगलीमध्ये आज नवे १२ रुग्ण आढळले आहे. तर नागपूरमध्ये ५ रुग्ण आढळले असून राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्याही तब्बल १४७ वर पोहोचली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना व्यतिरिक्तही अनेक आजार आहेत याचा डॉक्टरांना विसर..घाबरून स्थानिक क्लीनिक्स बंद
कोरोनामुळे देशभरात भीतीचं वातावरण असताना या आजाराला घाबरून आपल्या क्लिनिकवर गर्दी होऊ नये म्हणून स्थानिक डॉक्टर्स त्यांचे दवाखाने बंद ठेवून आहेत. मात्र त्यामुळे इतर रोजचे आजार आणि त्यांच्या निदानासाठी जायचं तरी कुठे असा प्रश्न सामन्यांना पडला आहे. राज्यातील करोनाच्या रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढतच असून आज त्यात पाच जणांची भर पडली आहे. करोना रुग्णांचा आकडा आता १३५ झाला आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. तसंच, खासगी डॉक्टरांनी आपल्या क्लिनिक सुरू ठेवाव्यात, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
5 वर्षांपूर्वी -
राज्य सरकारकडून भारतीय लष्कराला वैद्यकीय मदतीसंदर्भात लेखी पत्रं
कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कर देखील मैदानात उतरले आहे. कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी लष्कराने ‘ऑपरेशन नमस्ते’ लॉन्च केल असून सरकारला मदत करणे ही आमची प्राथमिकता असल्याचे लष्कर प्रमुख लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी म्हटले आहे.
5 वर्षांपूर्वी -
पिंपरी-चिंचवडमधील ३ करोनामुक्त झालेल्या व्यक्तींना डिस्चार्ज; स्टाफकडून टाळ्या
पिंपरी-चिंचवडमधील तीन करोनामुक्त झालेल्या व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. परंतु, त्यांना आणखी दोन आठवडे होम क्वारंटाइनमध्ये राहण्यास सांगितले आहे अशी माहिती डॉ. विनायक पाटील यांनी दिली आहे. गेल्या १४ दिवसांपासून पाटील हे त्यांच्यावर उपचार करत होते. आज तिघांना रुग्णवाहिकेतून घरी सोडण्यात आले असून त्यापूर्वी तिघांचे आणि डॉ. विनायक पाटील यांचे पोलीस, आरोग्य कर्मचारी आणि इतर स्टाफने टाळ्या वाजवून उत्साह वाढवला.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होणार: शरद पवार
देश आणि राज्यावर आलेलं करोनाचं संकट अत्यंत गंभीर आहे. केवळ माणसांवरच नाहीतर पशू-पक्ष्यांवरही त्याचा परिणाम होणार आहे, असं सांगतानाच करोनामुळे देशाच्या आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेवर दीर्घकालीन परिणाम होणार असून प्रत्येकाचं आर्थिक गणितही बिघडणार आहे. या संकटाचा अर्थव्यवस्थेवर वर्षे-दीड वर्षे परिणाम राहील, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं.
5 वर्षांपूर्वी -
डोंबिवली: तो तरुण कोरोना पॉझिटिव्ह असून हळदी व लग्नाला गेला...नंतर मेसेंजरवर मित्रांना
महाराष्ट्रात कोरोना रुग्णावर मेडिकल एज्युकेशन अँन्ड ड्रग्स विभागाने अभ्यास केला. त्यांच्या अहवालानुसार यात १२२ रुग्णांचा समाविष्ट करण्यात आला आहे. यामधील ३३ रुग्णांचे वय ३१ ते ४० वयोगटातील आहे. तर २१-३० आणि ४१-५० वयोगटातील रुग्णांची संख्या प्रत्येकी २४ इतकी आहे. तर ५१ ते ८० वयोगटातील संख्या ३१ आणि १ ते २० वयोगटातील संख्या १० आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज यांचं विधान सत्य ठरलं; पोलिसांच्या छाप्यात मशिदीतून ११ तुर्कस्तानी मौलवी ताब्यात
एकाबाजूला देशात कोरोना आपत्तीने धुमाकूळ घातलेला असताना आणि पोलीस यंत्रणा देखील त्यात व्यस्त असताना राज्यातील इतर काही घटना पोलीस व्यवस्थेचा ताण वाढविण्यास कारणीभूत ठरू शकतात. सध्या राज्यातील प्रत्येक कोपऱ्यात पोलीस रस्त्यावर पहारा देत असून, लॉकडाउन असल्याने लोकांच्या संबंधित घटनांकडे देखील लक्ष ठेवून आहेत.
5 वर्षांपूर्वी -
ज्यांच्यासाठी थाळ्या-घंटानाद केला; त्यांच्यावरच फिल्मी देशभक्तांकडून घर खाली करण्यासाठी दबाव
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा धोका वाढतोच आहे. दिवसभरात दुसऱ्या मृत्यूची नोंद झाली आहे. रुग्णांची संख्याही वाढून १२५ झाली आहे. मुंबईत कस्तुरबा रुग्णालयात दाखल असलेल्या ६३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यापूर्वी नवी मुंबईत एकीचा मृत्यू झाल्यामुळे कोरोना मृत्यूंची संख्या राज्यात ५ झाली आहे. सकाळी वाशीमध्ये एका खासगी रुग्णालयात कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान राज्यात सर्वाधिक चिंताजनक स्थिती असताना डॉक्टर्स, नर्सेस आणि पोलीस यंत्रणा अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
कर्तव्यावर हजारोंशी संपर्क; वनरुम'च्या घरात बाबा चिमुकल्यांना लांब ठेऊन जेवतो अन पुन्हा..
देशव्यापी लॉकडाऊनचा आज दुसरा दिवस असून देशभरात करोनाची लागण झालेल्या रुग्णांची सख्या वाढत असल्याचे दिसत आहे. देशभरात आतापर्यंत ६०६ जणांना करोना विषाणूची लागण झाली आहे, तर या आजारात ११ जणांचा बळी गेला आहे. देशात सर्वाधिक रुग्ण संख्या महाराष्ट्रात १२२ इतकी आहे.
5 वर्षांपूर्वी -
अमेरिकेसारखी लष्कराची मदत घेण्याची वेळ येऊ देऊ नका; अजित पवार संतापले
‘लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी अमेरिकेत लष्कराची मदत घेण्यात आली आहे. आपल्या राज्यात ती वेळ येऊ न देणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे’, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. ‘कोरोना प्रतिबंधक कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस, वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याच्या घटना कदापिही सहन केल्या जाणार नाहीत, असे हल्ले करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन कायद्यानुसार कारवाई केली जाईल’, असा कडक इशाराही अजित पवार यांनी दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतोय; राज्यात एकूण १२४ रुग्ण
महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची आणि मृतांची संख्या वाढत चालली आहे. वाशीमध्ये एका खासगी रुग्णालयात झालेला महिलेचा मृत्यू हा कोरोनामुळे झाला असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनामुळे मृत झालेल्यांची संख्या ४ वर पोहोचली असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. दुसरीकडे आज पुन्हा दोन अंकांनी कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रभर पसरतोय कोरोना; रुग्णांची संख्या १२२ वर पोहोचली
राज्यात कोरोनाचं थैमान दिवसेंदिवस वाढत चाललं असून, रुग्णांची संख्यादेखील ११६वरून १२२वर गेली आहे. आज सकाळी सांगली येथील एकाच कुटुंबातील ५ सदस्य संसर्गातून बाधित आढळून आले आहेत. मुंबईतल्या ४ जणांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच मुंबईत नव्याने ५ आणि ठाणे येथे १ रुग्ण असे सहा रुग्ण आढळून आले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा ११६ वर...तर १४ सदस्य डिस्चार्जच्या प्रक्रियेत
राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ११६ वर गेला आहे. बुधवारी सकाळी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे एकाच कुटुंबातील पाच जण कोरोनाग्रस्त असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अवघ्या काही तासांत मुंबईत आणखी चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. राज्याच्या दृष्टीने ही अत्यंत चिंताजनक बाब आहे.
5 वर्षांपूर्वी -
शुभ गुढीपाडवा; राज्यातील पहिल्या कोरोनाबाधित दाम्पत्याला डिस्चार्ज
पुण्यातील पहिल्या दोन रुग्णांना आज डिस्चार्ज मिळणार आहे. दोंघाचे १४ दिवसानंतर सलग दोनदा घेतलेले सँपल निगेटिव्ह आले आहेत. या दाम्पत्याला ९ मार्च रोजी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं होतं. कोरोनाचे महाराष्ट्रात सापडलेले हे पहिले रुग्ण आहेत. दुबई प्रवास करून आल्यानंतर त्यांना लक्षणं आढळली होती.
5 वर्षांपूर्वी -
मोदीजी केंद्राचा निधी, लस, हॉस्पिटल, औषधावर बोला; टाळ्या-थाळ्या नको..प्लिज
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी ट्विट करत सांगितले की, ‘कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावासंदर्भात देशवासियांना काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे. २४ मार्चला रात्री ८ वाजता मी देशाला संबोधित करेल.’, तर, याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी देशाला संबोधित करत जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. मोदींनी आवाहन केलेल्या जनता कर्फ्यूला जनतेने चांगला प्रतिसाद दिला होता.
5 वर्षांपूर्वी -
सर्व राज्यातील रुग्णांचा टेस्टिंग व औषधांचा खर्च केंद्राने उचलावा - मंत्री जितेंद्र आव्हाड
राज्यात मंगळवारी कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. राज्यात कोरोना पॉझिटिव्ह असलेले आणखी ४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. पुण्यातील ३ तर साताऱ्यात १ नवा रुग्ण आढळून आला आहे. या रुग्णांमुळे महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या आकड्याने शतक पूर्ण केले आहे. या नव्या रुग्णांसह महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा १०१ वर गेला आहे. कोरोनाग्रस्तांचा वाढत असलेला आकडा पाहता महाराष्ट्रासमोरील चिंतेत भर पडत असल्याचे दिसत आहे.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO - पुण्यातील कंपनीच्या कोविड-१९ स्वस्त चाचणी किटला केंद्रांची मंजुरी
कोरोना विषाणू शोध चाचणीसाठी पुण्यातील मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन्सच्या किटला केंद्र सरकारच्या सेंट्रल ड्रग्ज स्टॅण्डर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने मंजुरी दिली आहे. कंपनीनेच ही माहिती दिली. सध्या केंद्र सरकार बाहेरील देशांमधून हे किट आयात करते. ते महागही आहे पण त्याच्या खर्चापेक्षा एक चतुर्थांश कमी खर्चात कंपनीचे किट उपलब्ध होणार आहे. याचा देशातील नागरिकांना फायदा होणार आहे. या किटच्या साह्याने केलेल्या चाचणीचे निकाल बिनचूक असणार आहेत, असेही कंपनीने स्पष्ट केले.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईत कोरोनाचा चौथा बळी; मृत्यू पावलेल्या व्यक्तीचं वय ६४ वर्ष
कोरोनाची लागण दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत १०१ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईत कोरोनाचा चौथा बळी गेला आहे. ६४ व्यक्तीचा यामध्ये मृत्यू झाला आहे. यूएईवरून मुंबईत ही व्यक्ती आला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने संचारबंदीचा निर्णय घेतला. पण लोकं या निर्णयाचे तीन तेरा वाजवताना दिसत आहे. अद्याप नागरिकांना या कोरोनाची दाहकता लक्षात येत नाही, ही खंत सगळ्यांकडूनच व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत देशभरात दहा जणांचा बळी गेला आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात चिंता वाढली, कोरोना रुग्णांची संख्या १०१ वर
भारतामध्ये एकीकडे ३७ कोरोनाचे रुग्ण बरे होऊन आज घरी जाणार आहेत तर दुसरीकडे महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा वाढला आहे. कालपर्यंत कोरोनाच्या रुग्णांची संख्या ९७ होती पण आता कोरोनाचे आणखी ४ पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले आहेत. पुण्यात 3 तर साताऱ्यामध्ये कोरोनाचा १ असे चार नवे रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या १०१ झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
सौदीहून परतलेल्या सांगलीतील ४ जणांना कोरोनाची बाधा; रुग्णांचा आकडा वाढला
करोनाचा प्रादुर्भाव भारतात वाढतो आहे. भारतासाठी आणि महाराष्ट्रासाठी ही चिंतेची बाब आहे. कारण भारतात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या ही ४१८ वर पोहचली आहे. तर महाराष्ट्रात ही संख्या ८९ वर पोहचली आहे. देशातल्या सर्व राज्यांपैकी महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे ८९ रुग्ण आहेत. हाच धोका लक्षात घेऊन महाराष्ट्रात आजपासून संचारबंदीही लागू करण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सवर टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, 78 रुपये टार्गेट प्राईस जाहीर - NSE: SUZLON
-
HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO
-
Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER