महत्वाच्या बातम्या
-
शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी पवारांचं मुख्यमंत्र्यांना प्रतिउत्तर
पात्रता नसताना राज्य सहकारी बँकेनं काही लोकांना कर्ज दिलं. बँकेने वेगवेगळ्या प्रकारचे ठराव केले. पैसा चुकीच्या पद्धतीनं वाटला, संपत्ती विकली, कोणालाही कर्ज दिलं अशा काही ठरावांमध्ये शरद पवार यांच्या निर्देशानुसार हे करण्यात आल्याची नोंद केली आहे. याव्यतिरिक्त काही पत्रदेखील आहेत. ज्यामध्ये शरद पवार यांनी काही व्यक्तींना कर्ज देण्याची विनंती केली आहे. त्यामुळं अशा पत्राची आणि कर्जाची चौकशी करण्यात येत आहे. याचा तपास ईडीकडून सुरु आहे,” अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
6 वर्षांपूर्वी -
हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर अज्ञातांचा हल्ला
कन्नडचे अपक्ष आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर बुधवारी मध्यरात्री अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. यात जाधव यांच्या गाडीची व घरांच्या काचांची नासधूस झाली आहे. हल्ल्याच्या वेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणा दिल्या जात होत्या. त्यामुळं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचं बोललं जात आहे. मात्र, अद्याप त्यास अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
6 वर्षांपूर्वी -
१३ वर्ष मंत्रीपद दिल्यानंतर काम करता येणार नसेल तर बांगड्या भरा: शरद पवार
विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आल्यानं आरोप-प्रत्यारोपांना धार चढली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सर्वाधिक आक्रमकपणे सत्ताधाऱ्यांवर हल्ले चढवत आहेत. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार व माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्यावर तोफ डागताना पवार यांनी आज त्यांना बांगड्या भरण्याचा सल्ला दिला.
6 वर्षांपूर्वी -
रविकांत तुपकर यांची घरवापसी; पुन्हा येणार स्वाभिमान पक्षात
काही दिवसांपूर्वीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेची साथ सोडलेले राजू शेट्टी यांचे खंदे समर्थक रविकांत तुपकर पुन्हा घरवापसी करणार आहेत. आज, सायंकाळी ते स्वाभिमान पक्षात पुन्हा प्रवेश करणार आहेत. काही दिवसांपूर्वी तुपकर यांनी स्वाभिमानीला सोडचिठ्ठी देऊन सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांतीमध्ये प्रवेश केला होता. मात्र काही दिवसांमध्येच ते पुन्हा आपल्या मुळ घरी परतणार असल्याने राजू शेट्टींना दिलासा मिळाला आहे.
6 वर्षांपूर्वी -
ओमराजे निंबाळकरांवर हल्ला करणारा भाजपचा आयटी सेलचा तालुका अध्यक्ष
जिल्ह्यातील शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर भर प्रचारात चाकू हल्ला झाल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. मात्र या हल्ल्यामागे जिल्ह्यातील स्थानिक राजकारणाची पार्श्वभूमी असल्याची माहिती समोर येत आहे. हल्लेखोर अजिंक्य टेकाळे हा तरुण हल्ल्यानंतर फरार झाला होता. मात्र आता त्याला पोलिसांनी अटक केली आहे. टेकाळे हा भाजपचा कट्टर कार्यकर्ता असून गेल्या काही दिवसांपासून तो ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात फेसबुक पोस्ट टाकत होता. विधानसभेसाठी भाजप-सेना युती झाल्यानंतर निंबाळकर यांनी युतीविरोधात भूमिका घेतली होती. त्यामुळेच अजिंक्य टेकाळे नाराज होता.
6 वर्षांपूर्वी -
गुजरातमधील उत्तर भारतीयांवरील हल्ल्यांवेळी अज्ञातवासात गेलेले नेते महाराष्ट्रात प्रकटले
गुजरातमधील एका घटनेनंतर संपूर्ण गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवरून संतापाच वातावरण झाल्यानंतर हजारो परप्रांतीयांवर हल्ले करण्यात आले होते. विशेष म्हणजे त्यानंतर हजारो उत्तर भारतीयांनी रातोरात गुजरातमधून पलायन केलं होतं. मात्र या संपूर्ण घटनेनंतर भारतीय जनता पक्षातील आणि काँग्रेसमधील सर्व उत्तर भारतीय नेते अज्ञातवासात गेल्याचे दिसले होते.
6 वर्षांपूर्वी -
विरोधकांचा प्रश्न राज्यातील मूलभूत मुद्द्यांवर बोलण्याचा; मोदींनी थेट राज्यातील शहीद जवानांशी संबंध जोडला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये कलम ३७० वरून शरद पवारांसह विरोधी पक्षांना पुन्हा एकदा टीकेचे लक्ष्य केले आहे. कलम ३७० हटवल्याने देशातील जनता आनंदी आहे. मात्र या निर्णयामुळे काही जणांचा चेहरा उतरला आहे. त्यांना त्रास होत आहे. अशी मंडळी कलम ३७० चा महाराष्ट्राशी काय संबध आहे, असा सवाल विचारत आहेत. कलम ३७० चा महाराष्ट्राशी संबंध काय असे विचारणाऱ्यांनो डूब मरो, असा हल्लाबोल नरेंद्र मोदींनी केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
लोकसभेत CRPF जवानांच्या अन विधानसभेत राज्यातील जवानांच्या बलिदानाचा उल्लेख करत मतं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये कलम ३७० वरून शरद पवारांसह विरोधी पक्षांना पुन्हा एकदा टीकेचे लक्ष्य केले आहे. कलम ३७० हटवल्याने देशातील जनता आनंदी आहे. मात्र या निर्णयामुळे काही जणांचा चेहरा उतरला आहे. त्यांना त्रास होत आहे. अशी मंडळी कलम ३७० चा महाराष्ट्राशी काय संबध आहे, असा सवाल विचारत आहेत. कलम ३७० चा महाराष्ट्राशी संबंध काय असे विचारणाऱ्यांनो डूब मरो, असा हल्लाबोल नरेंद्र मोदींनी केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर हल्ला; निंबाळकर सुखरुप
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर कळंब तालुक्यातील नायगाव पाडोळी येथे भर प्रचार सभेत चाकू हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे उस्मानाबाद जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. ओमराजे निंबाळकर प्रचार करत असताना एका युवकाने त्यांच्याशी येऊन हात मिळवला आणि नंतर दुसऱ्या हाताने त्यांच्यावर चाकू हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र निंबाळकर यांनी आपल्या हाताने हा हल्ला अडवला. यामध्ये त्यांच्या हाताला जखम झाली असून हल्ला करणारा तरूण फरार झाला आहे. दरम्यान जखमी निंबाळकर यांना उपचारासाठी रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे.
6 वर्षांपूर्वी -
टीकेची पातळी घसरली; हर्षवर्धन जाधवांची उद्धव ठाकरेंवर अश्लिल भाषेत टीका
शिवसेनेचे माजी आमदार आणि आता शिवस्वराज्य बहुजन पक्षातून कन्नडच्या मैदानात उतरलेल्या हर्षवर्धन जाधवांची उद्धव ठाकरेंवर टीका करताना जीभ घसरली. जर शिवसेनेला मुस्लिमांचं वावडे आहे तर मग सत्तारांना शिवसेनेत कसे घेतले, असा सवाल करताना त्यांनी उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह विधान केले. त्यांच्या या भाषणाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.
6 वर्षांपूर्वी -
PMC बँक: नोटबंदीप्रमाणेच लोकांचे जीव जात आहेत; पण मोदी सभेत भाष्य करणार का?
घोटाळ्याच्या विळख्यात अडकलेल्या पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादल्यानंतर या बँकेच्या प्रामाणिक खातेदारांवर मोठा आघात झाला असून आपली आयुष्याची कमाई बुडाल्याच्या भीतीने खातेधारक व त्यांचे कुटुंबीय गलितगात्र झाले आहेत. धक्कादायक म्हणजे गेल्या दोन दिवसांत या बँकेच्या दोन खातेधारकांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने या संकटाला वेगळंच वळण लागलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
यशस्वी लोकशाहीसाठी विरोध पक्ष अत्यंत महत्त्वाचा आणि राज ठाकरे एक सक्षम नेते आहेत: गडकरी
भारतीय जनता पक्षातील दिलखुलास आणि राजकारणापलीकडे जाऊन मत व्यक्त करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ख्याती आहे. मात्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना खुद्द नितीन गडकरी यांनी राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येते आहे.
6 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे एक सक्षम नेते; जनतेने त्यांचा विचार करायला हवा: नितीन गडकरी
भारतीय जनता पक्षातील दिलखुलास आणि राजकारणापलीकडे जाऊन मत व्यक्त करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ख्याती आहे. मात्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना खुद्द नितीन गडकरी यांनी राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येते आहे.
6 वर्षांपूर्वी -
#VIDEO: सांगली-कोल्हापूरचा महापूर आणि मनसेचं हे योगदान चंद्रकांत पाटलांचे डोळे उघडेल? सविस्तर
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती असताना सत्ताधारी निवडणुकांच्या प्रचारात मग्न होते तर खुद्द मुख्यमंत्री महाजानदेश यात्रेत मग्न होते. त्यादरम्यान काय झालं? राज्यात एवढा पूर आला की कोल्हापूरचा एक मंत्री वाहत पुण्यात आला, असं म्हणत राज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे, ते पुण्यातल्या कसब्यातील सभेत बोलत होते. कोथरूड मतदारसंघातून यंदा भाजपानं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. पाटील हे मूळचे कोल्हापूरचे असल्याने बाहेरचा उमेदवार कोथरूडकरांवर लादल्याची टीका करण्यात येत होती. मनसेने कोथरूडमधून किशोर शिंदे यांना उमेदवारी दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
भाजपच्या प्रचार पोवाड्यात महाराजांचा पुतळा राष्ट्रवादीने उभारलेला अन मेट्रो काँग्रेसच्या काळातील
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात रंगत येत असताना सत्ताधारी अन् विरोधक एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक पक्ष प्रचार गीत देखील प्रसिद्ध करत आहेत. त्यात भाजप सर्वात आघाडीवर असल्याचं दिसत आहे. विधानसभेच्या रणधुमाळीत राज्यातील मतदाराला भावनिक साद घालण्यासाठी भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रगतीची घौडदौड दाखवण्यासाठी शिवछत्रपतींच्या महाराष्ट्राचा विजय असो अशा आशयाचा व्हिडीओ समाज माध्यमांवर पोस्ट केला आहे. त्यानंतर एनसीपीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावर टीका केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: राज ठाकरेंचा दावा सत्य! टोलमुक्त महाराष्ट्र करण्याचं वचन उद्धव ठाकरेंनी दिलेलं; त्याचा हा पुरावा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या प्रचार सभांमध्ये शिवसेनेच्या मागील वर्षीच्या जाहीरनाम्याची आणि घोषणांची आठवण मतदाराला करून देत आहेत. तत्पूर्वी मनसेने केलेल्या अनेक आंदोलनांचे दाखले आणि त्यातून निष्पन्नं झालेले सकारात्मक परिणाम देखील ते सभांमधून मांडताना दिसत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
भाषणात बेरोजगारीवर भाष्य नाही आणि जाहीरनाम्यात नव्या एक कोटी रोजगारांचा मुद्दा
राज्य विधानसभा निवडणुकीचे मतदान आठ दिवसांवर आल्यानं प्रचाराला जोर चढला आहे. सर्वच पक्षांचे प्रमुख नेते प्रचारात उतरले असून राज्याच्या कानाकोपऱ्यात जाहीर सभा, रोड शो आणि भाषणांचा धडाका सुरू आहे. सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. या रणधुमाळीमध्येच भाजपनं आज निवडणुकीसाठी आपलं संकल्पपत्र प्रकाशित केलं.
6 वर्षांपूर्वी -
त्याच विषयावर दोन निवडणुका; २०१४ नंतर पुन्हा २०१९ मध्ये शिव स्मारकाचा समावेश
राज्य विधानसभा निवडणुकीचे मतदान आठ दिवसांवर आल्यानं प्रचाराला जोर चढला आहे. सर्वच पक्षांचे प्रमुख नेते प्रचारात उतरले असून राज्याच्या कानाकोपऱ्यात जाहीर सभा, रोड शो आणि भाषणांचा धडाका सुरू आहे. सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. या रणधुमाळीमध्येच भाजपनं आज निवडणुकीसाठी आपलं संकल्पपत्र प्रकाशित केलं.
6 वर्षांपूर्वी -
विधानसभेसाठी भाजपाचं ‘संकल्पपत्र’ प्रकाशित
राज्य विधानसभा निवडणुकीचे मतदान आठ दिवसांवर आल्यानं प्रचाराला जोर चढला आहे. सर्वच पक्षांचे प्रमुख नेते प्रचारात उतरले असून राज्याच्या कानाकोपऱ्यात जाहीर सभा, रोड शो आणि भाषणांचा धडाका सुरू आहे. सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. या रणधुमाळीमध्येच भाजपनं आज निवडणुकीसाठी आपलं संकल्पपत्र प्रकाशित केलं.
6 वर्षांपूर्वी -
सत्ता जाण्याच्या भीतीनेच मोदींच्या ९, शहांच्या २०, फडणवीसांच्या ५० सभा: शरद पवार
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सभेत प्रश्न उपस्थित केला की, विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षांशी कोणताही सामना नाही हे भाजपला वाटत असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणावर सभा का आयोजित करत आहात?. चाळीसगाव येथे सभेला संबोधित करताना पवार म्हणाले की, सत्ताधारी भाजप भाजप झोपेत आहे आणि त्यामुळेच ते गंभीर विषयांकडे दुर्लक्ष करत आहे. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या घटनेतील कलम ३७० रद्द केल्याबद्दल पवारांनी केंद्र सरकारचे अभिनंदन केले.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
TCS Share Price | टाटा ग्रुपचा शेअर मालामाल करणार, केव्हाही बिनधास्त करावा असा शेअर - NSE: TCS
-
Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Infosys Share Price | आयटी शेअरबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा जाणून घ्या - NSE: INFY
-
IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Mazagon Dock Share Price | मल्टिबॅगर शेअर रेकॉर्ड हाय लेव्हलवर, आता मोठ्या तेजीचे संकेत, टार्गेट अपडेट - NSE: MAZDOCK
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक स्टॉक पुन्हा फोकसमध्ये; किती रिटर्न मिळेल जाणून घ्या - NSE: TATATECH
-
IREDA Share Price | मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार, स्वस्तात खरेदी करा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IREDA