महत्वाच्या बातम्या
-
मुंबई महानगरपालिकेच्या 132 अधिकाऱ्यांच्या बढतीचा प्रस्ताव शिवसेनेने का अडवला? - आशिष शेलारांचा प्रश्न
भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलारांनी शिवसेनेला सुनावलं आहे. मुंबई महापालिकेतील एससी, एसटीच्या 132 अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीवरून भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेला घेरलं आहे. या अधिकाऱ्यांच्या बदल्या का रखडवल्या आहेत? मंत्रालयातली बदल्यांप्रमाणे महापालिकेतही वसुली केली जात आ हे का?, असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
ते वक्तव्य राज ठाकरेंच्या अज्ञानातून | त्यांना जातीव्यवस्थेचा इतिहास माहित नसावा - राष्ट्रवादीचं प्रतिउत्तर
आगामी महापालिका निवडणुकांवरून राज्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील या निवडणुकांमध्ये नवी राजकीय समीकरणे समोर येण्याची शक्यता आहे. अशातच एका मराठी वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
राठोड यांची महिलेच्या आरोपांवर पत्रकार परिषद | यापूर्वी राष्ट्रवादीच्या विटेकरांवर आरोप करणाऱ्या महिलेवर ब्लॅकमेलिंगचा गुन्हा दाखल होता
शिवसेना नेते संजय राठोड यांनी शरीरसुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप एका महिलेने केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाल्याने राठोड यांनी पत्रकार परिषद घेऊन हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. संस्थेत नोकरी मिळावी म्हणून माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यात आले आहेत. या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही. सध्या या संस्थेशीही माझा संबंध नाही. केवळ वैफल्यातून हे आरोप करण्यात आले आहेत. माझं राजकीय करिअर संपवण्याचा हा प्रयत्न आहे, असा दावा संजय राठोड यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
नवी मुंबईत स्वतःच्या माणसांमार्फत गजानन काळे पालिकेतील अधिकारी-कंत्राटदारांकडून लाखोंची वसुली करायचे - पत्नीचा आरोप
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्याविरोधात त्यांच्या पत्नीनेच गंभीर आरोप करताना तक्रार दाखल केली आहेत. गजानन काळे यांच्या पत्नी संजीवनी काळे यांनी पतीविरोधात अनेक गंभीर आरोप करत नेरुळ पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
50 टक्केच्या मर्यादेवर न बोलता भाजपातील मराठ्यांनी अवसानघात केला | शिवसेनेचा घणाघाती आरोप
50 टक्क्यांच्या मर्यादेचा तिढा कायम ठेवून केंद्र व भाजप आरक्षणाचा विजयोत्सव साजरा करीत आहे, पण मराठा समाज सर्वकाही जाणतो. संसदेत मराठा आरक्षणप्रश्नी धुवांधार चर्चा सुरू असताना महाराष्ट्रातील भाजपचे ‘मऱ्हाटा’ पुढारी हे मौन बाळगून बसले होते की, त्यांची तोंडे बंद केली होती? स्वतः कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांना मराठा आरक्षणावर बोलण्यापासून रोखले होते, पण छत्रपतींचेच वंशज ते! ते बोलायला उभे राहिलेच, पण भाजपातील इतर मराठय़ांचे काय? त्यांनी तर तसा अवसानघातच केला, अशी टीका शिवसेनेने पक्षाचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीसांच्या काळातील 14 मंत्र्यांच्या नावे 41 कंपन्या | फडणवीसांसहित भाजप नेत्यांच्या उद्योग-बांधकाम क्षेत्रात कंपन्या
महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांच्या खासगी आणि कौटुंबिक कंपन्यांच्या “विकासा’प्रमाणेच मागील सरकारमधील भारतीय जनता पक्षाच्या माजी मंत्र्यांच्या कंपन्यांची संख्याही कमी नाही. माजी मंत्र्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात जाहीर केलेले व्यवसाय आणि त्यांच्या नावावर मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स या विभागाकडे दाखल कंपन्यांबाबत प्रसार माध्यमांनी पडताळणी केली. आघाडी सरकारमधील मंत्र्यांप्रमाणे मागील मंत्रिमंडळातही “शेती व उद्योग’ हाच व्यवसाय बहुतांश मंत्र्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केला होता.
4 वर्षांपूर्वी -
आता जाहीर सभांमधून शरद पवार यांचे व्हिडीओ लागणार बहुधा..| राज आणि पवारांनाही टोला
आगामी महापालिका निवडणुकांवरून राज्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील या निवडणुकांमध्ये नवी राजकीय समीकरणे समोर येण्याची शक्यता आहे. अशातच एका मराठी वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
चिक्की घोटाळ्यात अजून FIR का नाही? | कोर्टाच्या प्रश्नाने फडणवीस आणि पंकजा मुंडेंच्या अडचणी वाढणार
भारतीय जनता पक्षाच्या तत्कालिन महिला आणि बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी 2015 मध्ये शालेय विद्यार्थ्यांना चिक्की वाटप करण्यासाठी, काही कंत्राटदारांना कंत्राट दिले होते. मात्र त्यासाठी नियमित निविदा प्रक्रिया न राबवता, कंत्राट देण्यात आले आणि विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाच्या चिक्कीचे वाटप करण्यात आले असा आरोप झाला होता. याबाबत जनहित याचिका न्यायालयात दाखल केली होती.
4 वर्षांपूर्वी -
शाळांच्या फी मध्ये 15 टक्के कपात | राज्य सरकारकडून GR, पालकांना मोठा दिलासा
राज्य सरकारने खासगी शाळांच्या फीमध्ये 15 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला होता. पण या निर्णयाचा जीआर काढण्यात आला नव्हता. अखेर या निर्णयाचा जीआर काढण्यात आला आहे. त्यामुळे या जीआरनुसार आता 2021-2022 या शैक्षणिक वर्षात 15 टक्क्यांची फी कपात करण्यात आली आहे. त्याचबरोबर ज्या पालकांनी पूर्ण फी भरली आहे त्यांना शाळेकडून 15 टक्के फी परत मिळेल. त्यामुळे पालकांना आता मोठा दिलासा मिळाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
संभाजीराजेंना आरक्षण विधेयकावर सविस्तर बोलता येऊ नये म्हणून यादीतून 'वक्ता' असा उल्लेख गायब केला?
आरक्षण विधेयकावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांना बोलू न दिल्याने राज्यसभेत मोठा गोंधळ झालेला पाहायला मिळाला होता. रीतसर विनंती करूनही भाजपच्या यादीत वक्ता म्हणून संभाजीराजे यांचे नाव नव्हते. सभागृहात चर्चा संपत असताना विरोधी पक्षनेते बोलण्याआधी संभाजीराजे उठून उभे राहिले आणि त्यांनी निषेध नोंदवला.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Yojana | अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल योजना - सविस्तर माहिती
अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल योजना सविस्तर माहिती पण सदर लेखात वाचू शकता. योजनेसंदर्भात सविस्तर माहिती या लेखात देण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
केंद्राच्या बचावासाठी मेटेंचं धक्कादायक विधान | म्हणाले, 50 टक्क्यांच्या आतच मराठा समाजाला आरक्षण देता येईल
केंद्रातील मोदी सरकारने 102 वी घटना दुरुस्ती केली आहे. त्यामुळे आता संभ्रम दूर झाला आहे. मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. कायद्यामुळे आता राज्यांना अधिकार असणार आहेत. ठाकरे सरकारने इच्छाशक्ती दाखवली तर मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते, असं सांगतानाच ठाकरे सरकारने इच्छाशक्ती दाखवावी, असं आवाहन शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
MHT CET 2021 | एमएचटीसीईटी परीक्षेची नोंदणी पुन्हा सुरु | असा करा अर्ज
राज्य सरकारने विविध विद्याशाखांमधील प्रवेश प्रक्रिया सुरु केली आहे. शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटी 2021 साठी अर्ज नोंदणी करण्यास पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली आहे. अर्जाची नोंदणी ही ऑनलाईन पद्धतीने होईल. https://mhtcet2021.mahacet.org या वेबसाईटला भेट देऊन विद्यार्थी आपली नोंदणी करु शकतील.
4 वर्षांपूर्वी -
रोहिणी खडसेंनी घेतली प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट | नेमकं काय कारण?...
माजी महसूलमंत्री राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांची कन्या व जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे-खेवलकर यांनी आज राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील यांची मुंबई येथे भेट घेतली.
4 वर्षांपूर्वी -
महिला खासदारांना धक्काबुक्की | 55 वर्षाच्या संसदीय कारकिर्दीत असं कधीच पाहिलं नव्हतं | पवारांची नाराजी
राज्यसभेत घटना दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्यानंतर विमा विधेयकावर चर्चा सुरू झाली. त्याला विरोधकांनी विरोध केला असता संसदते महिला खासरांना धक्काबुक्की करण्यात आली. यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संतपा व्यक्त केला आहे. माझ्या 55 वर्षाच्या संसदीय कारकिर्दीत मी असं कधीच पाहिलं नव्हतं, असं शरद पवार म्हणाले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
School reopen | 17 ऑगस्ट पासून शाळा सुरु करण्याच्या निर्णयाला स्थगिती | राज्य सरकारचा निर्णय
शालेय शिक्षण विभागाने 17 ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याच्या काढलेल्या जीआरला सरकारने स्थगिती दिली आहे. टास्क फोर्सच्या बैठकीनंतर निर्णय घेण्यात आला असून शाळा सुरु होण्यासाठी शासनाच्या नव्या आदेशाची वाट पाहावी लागणार आहे. शालेय शिक्षण विभागानं दोन दिवसांपूर्वी कोरोना संसर्ग कमी झालेल्या ग्रामीण भागातील पाचवी ते सातवी आणि शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग 17 ऑगस्टपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला होता.
4 वर्षांपूर्वी -
मनसे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळेंवर पत्नीकडून अनैतिक संबंध, छळ व मारहाणीचे आरोप | अटकेची शक्यता
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्याविरोधात त्यांच्या पत्नीनेच गंभीर आरोप करताना तक्रार दाखल केली आहेत. गजानन काळे यांच्या पत्नी संजीवनी काळे यांनी पतीविरोधात अनेक गंभीर आरोप करत नेरुळ पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
चंद्रकांतदादांच्या नेतृत्वात भाजप पुण्यातही बहुमत गमावणार | गिरीश बापट यांना पुढे करण्याची रणनीती?
विद्यमान विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यकाळात भारतीय जनता पक्षाने काबीज केलेल्या पुणे महानगरपालिकेची आगामी निवडणूक पक्षासाठी अवघड ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. आगामी पालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बहुमताचा आकडा गाठता येणार नाही, असा निष्कर्ष एका सर्वेक्षणातून पुढे आला आहे. विशेष म्हणजे हे सर्वेक्षण भारतीय जनता पक्षाकडूनच करण्यात आले होते. त्यामुळे भाजपच्या गोटात सध्या अस्वस्थता पसरली आहे.
4 वर्षांपूर्वी -
५० हजार कोटीं खर्चून समुद्रमार्गे मुंबई-दिल्ली हायवे वरळी सी-लिंकला जोडणार - नितीन गडकरी
नगरकरांबरोबरच औरंगाबादकरांचाही पुणे प्रवासाचा वेळ वाचणार आहे. अहमदनगरमधून थेट पुण्यापर्यंत १०० किमीचा ३ मजली उड्डाणपूल तयार होणार असून त्याच्या आराखड्याला मंजुरीही मिळाली आहे. अशा प्रकारचा हा भारतातील पहिलाच तीनमजली पूल असणार आहे. त्यासाठी प्राथमिक सविस्तर अहवाल तयार करण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत खासगी संस्थेला देण्यात येणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | स्मार्ट कल्याण डोंबिवली डेव्हलपमेंट कोर्पोरेशनमध्ये 31 जागांसाठी भरती | करा अर्ज
स्मार्ट कल्याण डोंबिवली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2021. स्मार्ट कल्याण डोंबिवली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने अधिकृत भरती अधिसूचना जारी केली आहे आणि 31 विविध पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार 25 ऑगस्ट 2021 रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज सादर करू शकतात.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER